Marathi govt jobs   »   Study Materials   »   Maharashtra Budget 2022-23

Maharashtra Budget 2022-23, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23

Maharashtra Budget 2022-23: In this article, you will get detailed information about Maharashtra Budget 2022-23, Key Highlights of Maharashtra Budget 2022-23 which helps in your upcoming competitive exams.

Maharashtra Budget 2022-23
Category Study Material
Useful for Exam All Competitive Exam
Name Maharashtra Budget 2022-23
Maharashtra Budget 2022-23 Presented by Hon. Min. Shri Ajit Pawar
Date 11th March 2022

Maharashtra Budget 2022-23

Maharashtra Budget 2022-23: महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिनांक 11 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आर्थिक वर्षाचे विवरण मांडतात ज्यालाच अर्थसंकल्प म्हणतात. याआधी 10 मार्च 2022 रोजी सादर झालेले महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey 2022) याविषयी महत्वपूर्ण मुद्दे आपण पहिले. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), सरळसेवा भरतीच्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 (Maharashtra Budget 2022-23) यावर प्रश्न विचारल्या जातात त्यामुळे याचा अभ्यास असणे गरजेचे आहे. आज या लेखात आपण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 (Maharashtra Budget 2022-23) चे परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहे.

Maharashtra Budget 2022-23 | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23

Maharashtra Budget 2022-23: 11 मार्च 2022 रोजी सादर झालेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 (Maharashtra Budget 2022-23) हा मुख्यत्वे पंचसुत्रीवर अवलंबून होता. विकासाची पंचसूत्री -कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. आज या लेखात आपण या पंचसूत्रीनुसार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 (Maharashtra Budget 2022-23) समजावून घेणार आहे.

Maharashtra Budget 2022-23 | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23
महाराष्ट्राचा अर्थ संकल्प

Maharashtra Budget 2022-23: Key Points | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23: प्रमुख मुद्दे

Maharashtra Budget 2022-23: Key Points: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 (Maharashtra Budget 2022-23) मधील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • शेतकरी कल्याणासाठी अधिक अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
  • दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पासाठीच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली.
  • कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली.
  • पंतप्रधान सिंचन योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
  • जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
  • भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
  • शेततळ्यासाठी अनुदानात वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. आता 75 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
  • देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार
  • प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प
  • या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार
  • एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्यं
  • मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
  • 11 हजार 199 कोटी रूपये आदिवासी विकास कल्याण निधी
  • गडचिरोली माडिया भवन उभारणार
  • 3000 कोटी सामाजीक कल्याण विभागाला
  • 2400 कोटी महिला आणि बाल विकास विभागाला
  • 2472 कोटी रूपये महिला व बालकल्ण्यान विभागाला दिले जातील
  • एसआरएच्या धर्तीवर मुंबईबाहेर झोपड्यांच्या दुरूस्तीसाठी 100 कोटी रूपये
  • 7718 कोटी रुपये ग्रामविकास मंत्रालयाला
  • ग्रामीण भागात 6550 किमीचे रस्ते बांधले जातील.
  • 500 कोटी रुपये कोकण सागरी महामार्गासाठी
  • समृद्धी महामार्गाचे 77 टक्के काम पूर्ण
  • पुढे गडचिरोली गोंदीया पर्यंत वाढवण्यात येत आहे
  • 15773 कोटी रुपये MSRDC ला रस्ते विकासासाठी देणार
  • वसई, भाईंदर जलमार्गाने जोडणार 330 कोटी रूपये
  • मुंबई मेट्रो 3 लाईन नेव्ही नगर पर्यंत विस्तारणार
  • शिवडी नाव्हाशिवा प्रकल्पाचे 64 टक्के काम पूर्ण
  • 3000 पर्यावरण पुरक बस पुरवणार
  • ST महामंडळासाठी 3003 कोटी रुपये
  • नगरविकास विभागाला 8 हजार कोटी
Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

Maharashtra Budget 2022-23: First Element of Panchasutri (Agriculture and allied services) | पंचसूत्री पहिले सूत्र (कृषी व संलग्न)

Maharashtra Budget 2022-23: First Element of Panchasutri: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 (Maharashtra Budget 2022-23) मधील 5 पंचसूत्री तील पहिले सूत्र कृषी विभागाशी निगडीत आहे. यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे

Maharashtra Budget 2022-23 | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23
कृषी व संलग्न
  • नियमित कर्जफेड करणाऱ्या 20 लाख शेतकयांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान १० हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे.
  • भूविकास बँकेच्या 34 हजार 788 कर्जदार शेतकन्यांची 964 कोटी 25 लाख रुपयांची कर्जमाफी, बँकेच्या कर्मचान्यांची 2105 कोटी 40 लाख रुपये एवढी देणी अदा करणार.
  • सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजनेसाठी 3 वर्षात 1 हजार कोटी रुपये निधी देण्यात येणार.
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ करून ते 75 हजार रुपये केले.
  • बाजार समित्यांनी (306) पायाभूत सुविधांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची १००
  • टक्के परतफेड करण्यासाठी सहाय रु. 10,000 कोटी गुंतवणूक अपेक्षित
  • किमान आधारभूत किमतीनुसार शेतमाल खरेदी करिता 6 हजार 552 कोटी रुपयांची तरतुद
  • कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य,
  • 20 हजार 761 प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांचे (PACS) संगणकीकरण करण्याकरिता 150 कोटी रुपयांची गुंतवणूक
  • दोन वर्षात 28 सिंचन प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला असून येत्या दोन वर्षात १०४ प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन
  • गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी सन 2022-23 मध्ये 853 कोटी 45 लाख रुपये निधी
  • मृद व जलसंधारणाची दोन वर्षात 4 हजार 885 कामे पूर्ण करण्याचे नियोजन, 4 हजार 774 कोटी रुपये खर्च प्रस्तावित
  • सन 2022-23 मधे 60 हजार कृषिपंपांना वीज जोडणीचे उद्दीष्ट.
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमध्ये केळी, ड्रॅगन फ्रुट, एव्हॅकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश
  • देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा.

Maharashtra Budget 2022-23: Second Element of Panchasutri (Health) | पंचसूत्री दुसरे सूत्र (आरोग्य)

Maharashtra Budget 2022-23: First Element of Panchasutri: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 (Maharashtra Budget 2022-23) मधील 5 पंचसूत्री तील दुसरे सूत्र आरोग्याशी निगडीत आहे. यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे

Maharashtra Budget 2022-23 | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23
आरोग्य
  • नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारणार.
  • 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या तीन वर्षात लिथोट्रिप्सी उपचार पद्धती सुरु करणार.
  • मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आधुनिक ‘फेको’ उपचार पद्धती सुरु करणार..
  • 50 खाटांच्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई संयंत्रे व 30 खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता यंत्रे देणार.
  • मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा देणार.
  • हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार
  • जालना येथे 365 खाटांचे नवीन प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याकरिता 60 कोटी रुपये उपलब्ध करणार.
  • मुंबई येथे सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर संस्था, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था येथे पदव्युत्तर संस्था स्थापन करण्यात येणार.
  • अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरणासाठी 2 वर्षात 100 कोटी उपलब्ध करणार
  • पुणे शहराजवळ अत्याधुनिक ‘इंद्रायणी मेडिसीटी’ उभारण्यात येणार
  • रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माणासाठी 500 कोटी रुपये खर्चून ‘इनोव्हेशन हब’ स्थापन करण्यात येणार.

Maharashtra Budget 2022-23: Third Element of Panchasutri (Human Resource) | पंचसूत्री तिसरे सूत्र (मनुष्यबळ विकास)

Maharashtra Budget 2022-23: First Element of Panchasutri: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 (Maharashtra Budget 2022-23) मधील 5 पंचसूत्रीतील तिसरे सूत्र मनुष्यबळ विकासाशी निगडीत आहे. यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे

Maharashtra Budget 2022-23 | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23
मनुष्यबळ विकास
  • 1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ई शक्ती योजनेतून मोबाईल सेवा देणार.
  • बालसंगोपनाच्या अनुदानात 1125 रुपयांवरुन 2500 रुपयांपर्यंत वाढ.
  • प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारणार.
  • नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्रे सुरु करणार.
  • शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्सींग मशिन,

Maharashtra Budget 2022-23: Fourth Element of Panchasutri (Transport) | पंचसूत्री चौथे सूत्र (दळणवळण)

Maharashtra Budget 2022-23: First Element of Panchasutri: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 (Maharashtra Budget 2022-23) मधील 5 पंचसूत्रीतील चौथे सूत्र दळणवळण विकासाशी निगडीत आहे. यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे

Maharashtra Budget 2022-23 | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23
दळणवळण
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ अंतर्गत 10,000 कि.मी. लांबीच्या रस्त्याकरिता 7500 कोटी रूपये तरतुद.
  • 6550 कि.मी. लांबीच्या पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा-३ चा प्रारंभ.
  • हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भंडारा गोंदिया, नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार.
  • 16039 कोटी रुपयांच्या नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन
  • सुरु.
  • मुंबईतील मेट्रो मार्गिका क्रमांक 3, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गिकेचा विस्तार कफ परेडपासून नेव्हीनगरपर्यंत.
  • पुण्यातील स्वारगेट ते कात्रज व पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट मेट्रो प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु.
  • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 3000 नवीन बसगाड्या व 103 बसस्थानकांच्या आधुनिकीकरण यासाठी भांडवली अर्थसहाय्य.
  • शिर्डी, रत्नागिरी, अमरावती व कोल्हापूर विमानतळाच्या कामांसाठी तरतूद गडचिरोलीला नवीन विमानतळ

Maharashtra Budget 2022-23: Fifth Element of Panchasutri (Industry) | पंचसूत्री पाचवे सूत्र (उद्योग)

Maharashtra Budget 2022-23: First Element of Panchasutri: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 (Maharashtra Budget 2022-23) मधील 5 पंचसूत्रीतील पाचवे सूत्र उद्योग विकासाशी निगडीत आहे. यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे

Maharashtra Budget 2022-23 | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23
उद्योग

उद्योग

  • मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 98 गुंतवणूक करारातून 1 लाख 89 हजार कोटी रूपये गुंतवणूक आणि रोजगाराच्या ३ लाख ३० हजार नवीन संधी.
  • ई-वाहन धोरणांतर्गत सन 2025 पर्यंत वाहन नोंदणीत इलेक्ट्रीक वाहनांचा हिस्सा 10 टक्के व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा 25 टक्के करण्याचे उद्दिष्ट, 5000 चार्जिंग सुविधा उभारणार.
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 30,000 हून अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे १ लाख रोजगार संधी.
  • कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 100 टक्के व्याज परताव्याची पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना.
  • मौजे कौडगाव व मौजे शिंदाळा (जि. लातूर), मौजे साक्री (जि. धुळे), वाशीम, मौजे कचराळा (जि. चंद्रपूर) आणि यवतमाळ येथे एकूण 577 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प, राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेचे नवीन सौर ऊर्जा पार्क.
  • मुंबईत पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी 11,530 कोटी रुपयाचे 5 प्रकल्प.
  • ‘भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय’ स्थापित करण्यासाठी 100 कोटी रुपये निधी राखीव.
  • खराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमीत्त वढु बुद्रुक व तुळापूर, व ता. हवेली, जि. पुणे या परिसरात स्मारकासाठी 250 कोटी रुपये निधी उपलब्ध करणार.
  • छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करणार.
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरुषांशी संबंधित गावांतील 10 शाळांकरिता 10 कोटी रुपये निधी.
  • मुंबई, पुणे व नागपूर येथे स्वातंत्र्यलढ्याशी निगडीत स्थळांचा ‘हेरिटेज वॉक’.
  • रायगड किल्ला व परिसर विकासाकरिता 100 कोटी, राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी 14 कोटी, मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी 7 कोटी प्रस्तावित.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमी कावा युद्ध पद्धतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव दाखल करणार.
  • ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत 500 कोटीची तरतूद, स्वातंत्र्य सैनिकांना निवासी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मासिक उत्पन्नाची 10 हजार रुपयांची मर्यादा 30 हजार रुपये..
  • औरंगाबाद येथील अमृतमहोत्सवी वंदे मातरम् सभागृहांकरिता 43 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.
  • अष्टविनायक विकास आराखड्याकरिता 50 कोटी रुपये.
  • पंढरपूर देवस्थान मंदिर विकासासाठी 72 कोटी 80 लाख रुपये रकमेचा आराखडा
  • मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमासाठी 75 कोटी रुपये. स्मारक
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले च महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक उभारणार, महाराणी सईबाई स्मृतीस्थान विकास आणि श्री संत जगनाडे महाराज स्मारकांसाठी निधी उपलब्ध करून देणार.
  • पंतप्रधान आवास योजना ग्रामीण भागातील 5 लाख घरकुल बांधकामाकरिता 6000 कोटी रुपये उपलब्ध करुन देणार.
  • मुंबईबाहेरील झोपडपट्टयांमधील सुधारणांची मुलभूत कामे करण्यासाठी 100 कोटी रूपये उपलब्ध करुन देणार.
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

पर्यटन

  • कोयना, जायकवाडी व गोसीखुर्द येथे जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित.
  • जव्हार जि. पालघर, फर्दापूर जि. औरंगाबाद, अजिंठा, वेरूळ, महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरिता सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान.
  • पुरातत्व स्मारकांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हानिहाय महावारसा सोसायटीची स्थापना.
  • बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन सफारी करणार, सुरु
  • पुणे वन विभागात बिबट्या सफारी सुरु करणार. महामंडळे
  • चार्टी, सारथी, महाज्योती या संस्थाना विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी 250 कोटी रुपये.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधीत्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोगाची स्थापना.
  • मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा 500 कोटी रुपयांवरुन बाढवून 700 कोटी रुपये.

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम खूप जास्त आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देत रहा. यामुळे तुम्हाला MPSC च्या आगामी सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

Latest Posts:

FAQs: Maharashtra Budget 2022-23

Q1. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 कधी सादर झाला?

Ans. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23, 11 मार्च 2022 रोजी महाराष्ट्राच्या विधानभवनात सादर झाला.

Q2. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 कोणी सादर केला?

Ans. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23, 11 मार्च 2022 रोजी वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला.

Q3. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 किती पंचसूत्रीत विभागणी केली गेली?

Ans. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23, 5 पंचसूत्रीत विभागणी केली गेली.

Q4. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 पंचसूत्रीचे भाग कोणते?

Ans. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23, पंचसूत्रीचे भाग कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग हे भाग आहेत.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

 

Sharing is caring!

Maharashtra Budget 2022-23 Know about Maharashtra Budget 2022-23 in detail_12.1