Table of Contents
Maharashtra Etymology: Many people have searched for the origin of the name Maharashtra. There are also many different thoughts about Maharashtra Etymology. It is very important to understand the mystery of Maharashtra Etymology. In this article, we are going to see information about Maharashtra Etymology i.e. how the name of the state of Maharashtra came about.
Maharashtra Etymology: Overview
Dr. Bhandarkar has opined that the Sanskrit form of the word ‘Rattha’ is national and ‘Bhoj’ used to call himself Mahabhoj. Also ‘Rashtrik’ used to call you Maharashtrik. Get detailed information about Maharashtra Etymology in the table below.
Maharashtra Etymology: Overview | |
Category | Study Material |
Subject | History of Maharashtra |
Useful for | All Competitive Exams |
Name | Maharashtra Etymology |
Maharashtra Etymology
Maharashtra Etymology: महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. भारतातील एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र या नावाची उत्पत्ती कशी झाली याचा शोध आजपर्यंत खूप जणांनी केला आहे. त्याबद्दल खूप वेगवेगळे मतप्रवाह देखील आहेत. प्रत्येक देशाच्या नावातील रहस्य समजून घेणे फार महत्वाचे आहे. जगातील प्रत्येक राष्ट्राच्या कितीतरी ऐतिहासिक कोड्यांचा उलगडा हा त्या राज्याचा नामाभिधानावरुन झालेला आपल्याला दिसून येतो. MPSC नागरी सेवा परीक्षा 2023 (MPSC Civil Services 2023), MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (MPSC Non Gazetted Services Exam 2023) तसेच महाराष्ट्रातील सरळ सेवा जसे कि, तलाठी भरती (Talathi Bharti 2023), कृषी विभाग भरती (Krushi Vibhag Bharti 2023) व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा घटक फार महत्वाचा आहे. आज या लेखात आपण Maharashtra Etymology म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे नाव कसे पडले याबद्दल माहिती पाहणार आहे.
Maharashtra Etymology | महाराष्ट्र राज्याचे नाव कसे पडले
Maharashtra Etymology: महाराष्ट्र हे नाव तसं फार जुनं नाही. वराहमिहिराच्या ग्रंथात (इ.स. 505) आणि सत्याश्रय पुलकेशी याच्या इ.स. 611 सालातील बदामीच्या शिलालेखात महाराष्ट्राचा प्रथम उल्लेख सापडतो. आपण हल्ली ज्या प्रदेशाला महाराष्ट्र म्हणतो, तो पूर्वी दक्षिणापथ या नावानं ओळखला जात असे. दक्षिणापथ म्हणजे दक्षिणेकडील मार्ग व दक्षिणेच्या मार्गावरील प्रदेश होय. महाराष्ट्र राज्याला सुमारे तीस हजार वर्षाची परंपरा दिसून येते. रामायण ते महाभारतात महाराष्ट्रातील विविध स्थळांचा उल्लेख होतो. जसे रामायणात नाशिक च्या जवळील पंचवटी या स्थळाचा उल्लेख आढळतो. या लेखात या विविध तर्कांपैकी काही महत्वाच्या तर्कांचा उल्लेख केला आहे.
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015
Maharashtra Etymology (Marhatt) | महाराष्ट्र राज्याचे नाव मरहट्ट यावरून तयार झाले असावे
Maharashtra Etymology (Marhatt): आधुनिक मराठी भाषा महाराष्ट्री प्राकृत मधून विकसित झाली. मरहट्टा हा शब्द (पुढे मराठ्यांसाठी वापरला गेला) जैन महाराष्ट्री साहित्यात आढळतो. महाराष्ट्र हा शब्द महाराष्ट्री, मराठी आणि मराठा सोबत एकाच मुळापासून आला असावा. तथापि, त्यांची नेमकी व्युत्पत्ती अनिश्चित आहे.
भाषिक विद्वानांमध्ये सर्वात व्यापकपणे स्वीकारलेला सिद्धांत असा आहे की मराठा आणि महाराष्ट्र हे शब्द शेवटी महा आणि राष्ट्रीय यांच्या संयोगातून आले आहेत. एक पर्यायी सिद्धांत सांगते की हा शब्द महा (“महान”) आणि रथ पासून आला आहे, जो दक्षिणेकडे या भागात स्थलांतरित झालेल्या कुशल उत्तरेकडील लढाऊ शक्तीचा संदर्भ देतो. पर्यायी सिद्धांत सांगते की हा शब्द महा (“महान”) आणि राष्ट्र (“राष्ट्र”) या शब्दापासून आला आहे.
Maharashtra Etymology (Dakshinpath) | दक्षिणपथ
Maharashtra Etymology (Dakshinpath): दक्षिणापथ हे नाव तसं पुरातन आहे आणि ते विंध्यपर्वताच्या दक्षिण परिसराच्या खालच्या प्रदेशास लावण्याचा प्रघात होता. ख्रिस्तपूर्व काळातील पेरिप्लुस (सागरी मार्गाचे नकाशे) या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. त्यांत दक्षिणापथ या देशास Dakhinabhades असं नाव देऊन त्यांत भडोचपासून द्रविड देशातील व्यापारी पेठेच्या शहरांपर्यंतचा अंतर्भाव केलेला आहे. पुढचा 600 वर्षांनंतरचा राजशेखर (इ.स. 900-940) नावाचा ग्रंथकार हा आर्यावर्त आणि दक्षिणापथ या दोन प्रदेशांच्यामधील मर्यादा रेवा नदी असल्याचं सांगतो. याच काळातला चालुक्य कुळातील पहिला राजरज (इ. स. 985) हा दक्षिणापथाची मर्यादा नर्मदेपासून रामाच्या सेतूपर्यंत नेऊन या दोन्हींमधील प्रदेश पहिल्या विष्णुवर्धनाने (इ.स.600) जिंकल्याचं सांगतो.
List of First in India: Science, Governance, Defence, Sports
Maharashtra Etymology (Konkan) | कोकण
Maharashtra Etymology (Konkan): कोकण या नावाची उपपत्ती आजपर्यंत पुष्कळांनी निरनिराळ्या प्रकारांनी दिली आहे. जुन्या संस्कृत आणि फारसी ग्रंथांत कोकण हा शब्द निरनिराळ्या प्रकाराने लिहिलेला आढळतो. संस्कृतात कुकुण, कुङ्कुण, कोङ्कण, कोंकण ही रूपं दिसतात, तर फारसीमध्ये केङ्केम, कंकण, कोंकम् ही रूपं दिसतात. या कोकण शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक मतप्रवाह दिसतात. कोकण हा शब्द द्राविडी भाषेतून घेतला असावा. कानडीत कोङ्कु असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ उंचसखल जमीन असा आहे.
Maharashtra Etymology (Vidarbh) | विदर्भ
Maharashtra Etymology (Vidarbh): कौंडिण्य नावाचा ऋषी, भीष्मकाची राजधानी, नलदमयंतीचा विवाह वगैरे सर्व गोष्टी पौराणिक माहितीत मोडतात. दक्षिणेकडील प्रदेशांचं आर्यीकरण सुरू झालं ते प्रथम विदर्भातच, म्हणून विदर्भाचा संबंध आर्यांच्या ग्रंथांत यावा हे साहजिकच आहे. यदुवंशापैकीच भोज या नावाची जी एक शाखा होती, त्या शाखेचं राज्य विदर्भ प्रांतावर होतं. त्या शाखेत विदर्भ भोज नावाचा एक राजा होऊन गेला व त्याच्यावरूनच या प्रदेशाला विदर्भ हे नाव मिळालं. ऋषभदेव नावाचा जो राजा होता त्याला नऊ मुलगे होते व त्यानं आपल्या नऊ पुत्रांना स्वत:चं भरतखंडाचं राज्य वाटून दिलं. जो देश ज्या पुत्रास मिळाला त्या देशास त्या मुलाच्या नावावरून नाव मिळालं. कुशावर्त, इलावर्त इत्यादी मुलांमध्ये विदर्भ नावाचाही एक मुलगा होता
विदर्भास वर्हाड असंही म्हणतात. वर्हाड हा शब्द विदर्भावरून आला असावा, असं वाटणं साहजिक आहे, परंतु वर्हाड आणि विदर्भ हे दोन्ही शब्द वर्णपरिणतीच्या दृष्टीनं एकच समजणं अवघड आहे. अबूल फजल हा आपल्या ऐनेअकबरी या ग्रंथात वर्धातट हे या प्रांताचं नाव देतो. वाचस्पत या ग्रंथात विगता: दर्भा: – कुशा: यत: असा विदर्भ या शब्दाचा विग्रह केला आहे. राजवाडे हे त्या शब्दाचे वर्धा + आहार असे दोन भाग पाडून वर्हाड या शब्दाची व्युत्पत्ती सांगतात.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |