Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   महाराष्ट्र सरकार होमगार्डच्या तब्बल 9000 रिक्त...

महाराष्ट्र सरकार होमगार्डच्या तब्बल 9000 रिक्त जागा भरणार

खुशखबर !  महाराष्ट्र सरकार होमगार्डच्या तब्बल 9000 रिक्त जागा भरणार 

महाराष्ट्रात गृहरक्षक दलात (होमगार्ड) रिक्त असलेल्या 9 हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. काही गुणांनी पोलिस भरती पासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात ही चांगली संधी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे होमगार्डचा आहार भत्ता वाढविण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली आहे. राज्यात गृहरक्षक दलामध्ये एकूण 54000 जागा मंजूर आहेत. त्यापैकी 9000 इतक्या जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्या गेल्याने पोलिसांना याची बंदोबस्तामध्ये अधिक मदत होणार आहे. यासाठी ही होमगार्ड रिक्त जागांची भरती प्रक्रिया राज्यात राबवली जाणार आहे.

महाराष्ट्र सरकार होमगार्डच्या तब्बल 9000 रिक्त जागा भरणार : विहंगावलोकन

महाराष्ट्र सरकारतर्फे आगामी काळात होमगार्डच्या तब्बल 9000 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. होमगार्ड भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

महाराष्ट्र सरकार होमगार्डच्या तब्बल 9000 रिक्त जागा भरणार: विहंगावलोकन
श्रेणी नोकरी
विभागाचे नाव गृहरक्षक 
भरतीचे नाव महाराष्ट्र सरकार होमगार्डच्या तब्बल 9000 रिक्त जागा भरणार
पदाचे नाव

होमगार्ड

रिक्त पदांची संख्या 9000 

होमगार्डला सध्या प्राप्त असलेले मानधन

  1. दिवसाचे 670 रुपये मानधन
  2. 100 रुपये आहार भत्ता

होमगार्डला आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण

  • सर्व 9000 होमगार्डांना आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • विशेषतः पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, पाण्यातून बाहेर काढणे, मदत केंद्रांची उभारणी करणे,इत्यादी सारख्या गोष्टींमध्ये ते असणार आहे. 
  • यानुसार होमगार्डांना प्रशिक्षित केले जाणार आहे. 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!