Marathi govt jobs   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
Top Performing

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024, अर्ज करण्याच्या कालावधीत मुदतवाढ

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: महाराष्ट्र कारागृह विभागाने महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 साठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे.  महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 जाहीर केली होती. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दि. 01 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 25 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: विहंगावलोकन 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्रात शासन, कारागृह विभाग
भरतीचे नाव  महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
पदांचे नाव विविध संवर्गातील पदे
एकूण रिक्त पदे 255 
अर्ज सुरूवात करण्याची तारीख  01 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवठची तारीख  21 जानेवारी 2024 25 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र 
अधिकृत संकेतस्थळ www.mahaprisons.gov.in

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र कारागृह विभाग 2024 संबंधी अर्ज प्रक्रिया आणि महाराष्ट्र कारागृह विभाग भरती  संबंधित सर्व महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर होतील.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महत्वाच्या तारखा 
कार्यक्रम  तारीख 
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसुचना 01 जानेवारी 2024
महाराष्ट्र कारगृह विभाग अर्ज सुरूवात करण्याची तारीख 01 जानेवारी 2024
महाराष्ट्र कारागृह विभाग अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024

25 जानेवारी 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसूचना 

दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसूचना डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसूचना

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 रिक्त पदांची संख्या 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 मध्ये एकूण 255 पदे भरली जाणार आहेत. रिक्त पदांचा तपशील खालील तकत्यात प्रदान करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 रिक्त पदे 
पदाचे नाव  पद संख्या 
लिपिक 125
वरिष्ठ लिपिक 31
लघुलेखक निम्न श्रेणी 04
मिश्रक 27
शिक्षक 12
शिवणकाम निदेशक 10
सुतारकाम निदेशक 10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
बेकरी निदेशक 04
ताणाकार 06
विणकाम निदेशक 02
चर्मकला निदेशक 02
यंत्र निदेशक 02
निटिंग अँड विव्हिंग निदेशक 01
करवत्या 01
लोहारकाम निदेशक 01
कातारी 01
गृह पर्यवेक्षक 01
पंजा व गालीचा निदेशक 01
ब्रेललिपी निदेशक 01
जोडारी 01
प्रिप्रेटरी 01
मिलिंग पर्यवेक्षक 01
शारीरिक कवायत निदेशक 01
शारीरिक शिक्षक निदेशक 01
एकूण 255

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज लिंक

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज लिंक

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी असून खालील तक्त्यात दिलेली आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
लघुलेखक निम्न श्रेणी स एस सी किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण तसेच शॉटहँड उत्तीर्ण स्पीड 100 प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -40 प्रति शब्द मि.
मिश्रक एसएससी/एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायीक म्हणून Bombay state Pharmacy council ला नांव नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य)
शिक्षक एसएससी/एचएससी किंवा तत्सम, व शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पुर्वानुभव असल्यास प्राधान्य)
शिवणकाम निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
सुतारकाम निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ भौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इन्टरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
बेकरी निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असैलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
ताणाकार एसएससी/एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
विणकाम निदेशक शासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे. (प्रथम आणि व्दितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य )
चर्मकला निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
यंत्र निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.
निटिंग अँड विव्हिंग निदेशक एसएससी/एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्य
करवत्या चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.
लोहारकाम निदेशक एसएससी/एच एस सी, महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
कातारी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
गृह पर्यवेक्षक एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. (प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य.
पंजा व गालीचा निदेशक एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
ब्रेललिपी निदेशक एसएससी/ शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक
जोडारी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक.
प्रिप्रेटरी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वापिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
मिलिंग पर्यवेक्षक एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
शारीरिक कवायत निदेशक एसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदीवली, अथ्वा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र.
शारीरिक शिक्षक निदेशक एसएससी/ शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 आवश्यक वयोमर्यादा 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 साठी आवश्यक वयोमर्यादा खाली दिलेली आहे.  

  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 01/01/2024 राहील.
  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्ष
  • मागर्वर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्ष
  • पदवीधर अंशकालीन प्रवर्गासाठी – 18 ते 55 वर्ष
  • खेळाडू प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्ष
  • दिव्यांग प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्ष
  • प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त प्रवर्गासाठी- 18 ते 45 वर्ष

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 परीक्षेचे स्वरूप खाली सविस्तरपणे दिले आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 परीक्षेचे स्वरूप
पदाचे नाव मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक  चाचणी / अंकगणित एकूण वेळ
प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण
लिपिक 25 50 25 50 25 50 25 50 100 200 120 मिनिट
वरिष्ठ लिपिक 25 50 25 50 25 50 25 50 100 200 120 मिनिट
लघुलेखक निम्न श्रेणी 15 30 15 30 15 30 15 30 60 120 80 मिनिट
बाकी सर्व पदे 15 30 15 30 15 30 15 30 60 120 80 मिनिट
  • लघुलेखक निम्न श्रेणी व तांत्रिक संवर्गातील उक्त नमुद क्र 4 ते 25 मधील सर्व पदांकरिता 80 गुणांची व्यवसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार प्रथम परिक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यवसायिक चाचणी देता येईल.
  • परिक्षा कालावधी :-
    • ऑनलाईन परिक्षा :- 1 तास 20 मिनिटे (80 मिनिटे)
    • व्यवसायिक चाचणी :- 40 मिनिटे
  • परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 02 गुण ठेवण्यात येतील.
  • महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13- अ दि. 4 मे 2022 मधील तरतुदीनुसार लिपिक व वरिष्ठ लिपिक पदासाठी पदवी हि कमीत कमी शैक्षणिक अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान राहील. परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) च्या दर्जाच्या समान राहील व परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकुण 200 गुणांची ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येईल.
  • परीक्षा ही Computer Based Test पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आल्या तर सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची कठिण्याता तपसाण्यात येऊन त्योच समानीकरण करण्याचे (Normalization) पद्धतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करण्यात येईल. (Normalization) बाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील. याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज शुल्क 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024
GMC नागपूर भरती 2024 SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024, अर्ज करण्याच्या कालावधीत मुदतवाढ_4.1

FAQs

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 कधी जाहीर झाली आहे?

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 01 जानेवारी 2024 रोजी जाहिर झाली.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 मध्ये किती रिक्त पदे आहेत?

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023 मध्ये 255 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.