Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 भरती

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 भरती प्रक्रिया पध्दती

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 भरती प्रक्रिया पध्दती –  सन 2022 व सन 2023 मधील पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेली पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिध्द करुन दिनांक 05.03.2024 ते 15.04.2024 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अॅप्लीकेशन मागविण्यासाठी policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली होती. भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक 19.06.2024 पासून सुरु होणार आहे. या लेखात महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 भरती प्रक्रिया पध्दती बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 भरती प्रक्रिया पध्दती – विहंगावलोकन

या लेखात महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 भरती प्रक्रिया पध्दती बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. ज्याचा फायदा आपणास आगामी काळातील परीक्षेत नक्की होईल.

 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 भरती प्रक्रिया पध्दती : विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभागाचे नाव महाराष्ट्र शासन
भरतीचे नाव महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23
पदांची नावे
  • पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई चालक
  • पोलीस शिपाई बॅण्डस्मन
  • राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई
  • कारागृह शिपाई
लेखाचे नाव महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 भरती प्रक्रिया पध्दती
लेखातील प्रमुख मुद्दे
  1. शारीरिक चाचणी पध्दती
  2. लेखी परीक्षा पध्दती
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

सन 2022 व 2023 ची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया खालील टप्प्यांप्रमाणे राबविण्यात येणार आहे:

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 भरती प्रक्रियेमध्ये प्रथम उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे व त्यानंतर लेखी परीक्षा पार पडणार आहे.

  1. शारीरिक चाचणी
पदे  शारीरिक चाचणी गुण 
पोलीस शिपाई 50 गुण
पोलीस शिपाई चालक 50 गुण
पोलीस शिपाई बॅण्डस्मन 50 गुण
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई 100 गुण
कारागृह शिपाई 50 गुण

चालक पोलीस शिपाई पदासाठी कौशल्य चाचणी :-

शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. 

कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश आहे :-

(a) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी – 25 गुण 

(b) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी – 25 गुण 

कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्याकरीता, समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

2. लेखी परीक्षा 

पदे  वेळ   गुण 
पोलीस शिपाई 90 मि 100 गुण
पोलीस शिपाई चालक 90 मि 100 गुण
पोलीस शिपाई बॅण्डस्मन 90 मि 100  गुण
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई 90 मि 100  गुण
कारागृह शिपाई 90 मि 100  गुण

लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :-

  1. अंकगणित;
  2. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी;
  3. बुध्दीमत्ता चाचणी;
  4. मराठी व्याकरण

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 भरती प्रक्रिया पध्दती PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 भरती प्रक्रिया पध्दती_4.1