2019 पासून स्थगित असलेली महाराष्ट्र पोलीस भरती बद्दल नवीन माहिती आली आहे: महाराष्ट्र पोलिस आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचनाद्वारे परीक्षा तारखा आणि परीक्षे बद्दल महत्वाची माहिती प्रदान करत असतात. राज्यात जम्बो पोलिस पदासाठी भरती प्रक्रीया राबविण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. आता 11 जून 2021 रोजी नवीन GR आले आहे जे OMR Vendors च्या निवडीबद्दल माहिती देत आहे. याचा अर्थ असा की आता लवकरच पोलीस भरतीच्या परीक्षा तारखा आपल्या समोर येणार आहेत. 21 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित झालेल्या GR अनुसार एकूण 12528 पदांच्या पोलीस भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्या परिपत्रकानुसार 5297 पदांची भरतीस 100% मान्यता देण्यात आली होती. बाकी उर्वरित 7232 पदांची भरतीसाठी लवकरच नवीन परिपत्रक प्रकाशित होणार आहे. हा महत्वाचा अपडेट आपल्या सर्व मित्रांना शेयर करा.
11 जून 2021 रोजीच्या GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ही वेळोवेळी तुमच्यासाठी या भरतीसाठी आवश्यक असलेली सगळी माहिती, नवीन परीक्षा पेपर नमुना, परीक्षा अभ्यासक्रम, माघील वर्षाचे पोलीस भरतीचे पेपर्स ची PDF, इ.प्रदान करू.
उमेदवारांना महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुन्याची (पॅटर्नची) जाण असणे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्याचा थेट परिणाम त्यांच्या लेखी परीक्षेतील कामगिरीवर होईल. तरी हा लेख महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल या परीक्षेसाठी तयारी करण्यार्या सर्व उमेदवारांना चांगली तयारी करण्यास मदत करणार आहे.
महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल परीक्षा 2020 मध्ये दोन टप्प्यांचा म्हणजे लेखी परीक्षा व शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PT) व शारीरिक मानदंड चाचणी (PST) यांचा समावेश आहे.
लेखी परीक्षेमध्ये पुढील विषयांचा समावेश असेल –
विभाग नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
गणित | 25 प्रश्न | 25 गुण | 90 मिनिट |
बौद्धिक चाचणी | 25 प्रश्न | 25 गुण | |
मराठी व्याकरण | 25 प्रश्न | 25 गुण | |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 25 प्रश्न | 25 गुण | |
एकूण | 100 प्रश्न | 100 गुण |
केवळ पात्रता निकष पूर्ण करणारे आणि परीक्षेत आवश्यक असणारी किमान गुणांची नोंद असलेल्या उमेदवारांनाच शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PT) व शारीरिक मानदंड चाचणी (PST). साठी बोलवण्यात येईल.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PT) व शारीरिक मानदंड चाचणी (PST)
शारीरिक चाचणी (50 गुण)
A) पुरुष उमेदवार –
- 1600 मीटर धावणे – 30 गुण
- 100 मीटर धावणे – 10 गुण
- शॉट पुट – 10 गुण
एकूण – 50 गुण
B) महिला उमेदवार –
- 800 मीटर धावणे – 30 गुण
- 100 मीटर धावणे – 10 गुण
- शॉट पुट – 10 गुण
एकूण – 50 गुण.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App YouTube channel- Adda247 Marathi
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)