Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   Maharashtra Police Constable 2024 Question Paper

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका -07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका – 07 जुलेे 2024

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका – 07 जुलेे 2024: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 ची पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक 7 जुलेे 2024 व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक 14 जुलेे 2024 रोजी घेण्याचे होणार आहे. 7 जुलेे 2024 रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही परीक्षा पार पडली आहे. या लेखात आपण आज महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका – 07 जुलेे 2024 पाहणार आहोत. येथे आम्ही ही प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या विस्तृत विश्लेषणासह सोडवून दिली आहे. ज्याचा फायदा तुम्हाला आगामी काळातील परीक्षांमध्ये नक्कीच होणार आहे.

अहिल्यानगर (अहमदनगर) पोलीस भरती पेपर 2024

Q1. जितेंद्रिय – समासाचा प्रकार ओळखा.

(a) प्रादिबहुव्रीही समास

(b) सहबहुव्रीही समास

(c) नञ् बहुव्रीही समास

(d) समानाधिकरण बहुव्रीही समास

Q2. संधी निग्रह करा – कवीच्छा

(a) कवी + इच्छा

(b) कवि + इच्छा

(c) कवि + ईच्छा

(d) कवी + ईच्छा

Q3. “ऋ” वर्णाचे उच्चार स्थानावरून वर्गीकरण करा.

(a) कंठ्य

(b) तालव्य

(c) मूर्धन्य 

(d) दंत्य

Q4. अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती ?

(a) व्

(b) र्

(c) द्

(d) ग्

Q5. संधी करा – षट्+अंग

(a) षटंग

(b) षदंग

(c) पडंग

(d) षधंग

Q6. “वरची खोली लहान आहे” अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

(a) नाम

(b) क्रियापद

(c) शब्दयोगी अव्यय

(d) अव्ययसाधीत विशेषण

Q7. “आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली” अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

(a) नाम

(b) सर्वनाम

(c) क्रियापद

(d) विशेषण

Q8. सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. “बाईमाणूस”

(a) पुल्लिंग

(b) स्त्रीलिंग

(c) नपुंसकलिंग

(d) यापैकी नाही

Q9. ईकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन _____ होते.

(a) एकारान्त

(b) वाकारान्त

(c) तेच राहते

(d) याकारान्त

Q10. “गुणेश म्हणजे सर्वज्ञ. त्याला काय माहीत नसते !” अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

(a) प्रश्नार्थक

(b) सामान्य

(c) दर्शक

(d) आत्मवाचक

Q11. विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. “-आत”

(a) चतुर्थी

(b) पंचमी

(c) षष्ठी

(d) सप्तमी

Q12. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. “वडीलांनी मुलाला शाळेत घातला.”

(a) कर्तृ-कर्म संकर प्रयोग

(b) कर्म-भाव संकर प्रयोग

(c) कर्तृ-भाव संकर प्रयोग

(d) भाव-कर्तरी प्रयोग

Q13. पुढील वाक्यातील समास ओळखा. “शैवाले गुंतले तरि पंकज हे शोभते”

(a) विभक्ती तत्पुरूष समास

(b) अलुक् तत्पुरूष समास

(c) उपपद तत्पुरूष समास

(d) नञ् तत्पुरूष समास

Q14. शब्दाचा प्रकार ओळखा. “नदी”

(a) तत्सम शब्द

(b) तद्भव शब्द

(c) देशी शब्द

(d) परभाषीय शब्द

Q15.  “महिना” हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

(a) इंग्रजी

(b) अरबी 

(c) फारसी

(d) पोर्तुगीज

Q16. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. “ढोलके वाजणे”. 

(a) मोठ्याने रडणे

(b) फसवणे

(c) गुप्त गोष्ट उघड करणे

(d) गाजावाजा होणे

Q17. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. “कानामागे टाकणे”

(a) दुर्लक्ष करणे

(b) सहज ऐकू येणे

(c) चाहूल घेणे

(d) लक्षपूर्वक ऐकणे

Q18. समानार्थी शब्द ओळखा. “खूण”

(a) वध

(b) काळजी

(c) भांडण

(d) चिन्ह

Q19. अलंकारीक शब्दाचा अर्थ सांगा. “ईडलिंबू”

(a) मनातल्या भावना

(b) अत्यंत रागीट मनुष्य

(c) अति धनवान व्यक्ती

(d) आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती

Q20. लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा.

(a) पोलीस

(b) पुर्वार्ध

(c) पुज्य

(d) पुस्तीका

Q21. “सुर्य डोंगराआड गेला.” अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

(a) कर्मपूरक

(b) विधानपूरक

(c) आधारपूरक

(d) यापैकी नाही

Q22. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. वाक्याचा प्रकार ओळखा.

(a) मिश्र वाक्य

(b) केवल वाक्य

(c) संयुक्त वाक्य

(d) यापैकी नाही

Q23.  “मीठभाकर” या समासाचा प्रकार ओळखा.

(a) इतरेतर द्वंद्व समास

(b) वैकल्पिक द्वंद्व समास

(c) समाहार द्वंद्व समास

(d) यापैकी नाही

Q24. “तू लाडू खाल्लास.” या वाक्यातील प्रयोग ओळखा,

(a) कर्तृ-भाव संकर प्रयोग

(b) कर्म-भाव संकर प्रयोग

(c) कर्तृ-कर्म संकर प्रयोग

(d) भावे प्रयोग

Q25. विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा.

(a) प्रथमा – कर्ता

(b) तृतीया – करण

(c) चतुर्थी – अपादान

(d) द्वितीय – कर्म

Q26. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?

(a) 1 नोव्हेबर 1956

(b) 1 डिसेंबर 1960

(c) 1 मे 1960

(d) 15 ऑगस्ट 1947

Q27. ‘रोशा’ जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्हयात मोठ्या प्रमाणावर आढळते? 

(a) धुळे, नंदुरबार, जळगाव

(b) सातारा, सांगली, कोल्हापुर

(c) नागपूर, वर्धा, भंडारा

(d) लातूर, नांदेड, परभणी

Q28. एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्हयात आहे ?

(a) चंद्रपूर

(b) बीड

(c) नागपूर

(d) नाशिक

Q29. सिध्दटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे ?

(a) पुणे

(b) अहमदनगर

(c) रायगड 

(d) सोलापूर

Q30. चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो ?

(a) पुणे ते नाशिक

(b) आळेफाटा ते कल्याण 

(c) पुणे ते मुंबई

(d) पुणे ते सातारा 

Q31. ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावी खालील पैकी कोणता रोग होतो ?

(a) बेरीबेरी

(b) स्कर्वी 

(c) मुडदुस

(d) रातआंधळेपणा

Q32. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?

(a) राजाराम मोहनरॉय

(b) स्वामी विवेकानंद

(c) दादाभाई नौरोजी 

(d) बंकीमचंद्र चॅटर्जी

Q33. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा दयावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे?

(a) पंतप्रधान

(b) उपपंतप्रधान

(c) उपराष्ट्रपती

(d) लोकसभा उपसभापती

Q34. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला ?

(a) 6 जुलै 1837

(b) 3 जानेवारी 1831

(c) 6 जानेवारी 1812

(d) 18 फेब्रुवारी 1823

Q35. टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालील पैकी कोणता देश यजमान होता ?

(a) भारत

(b) पाकिस्तान

(c) न्यूझीलंड

(d) अमेरिका

Q36. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

(a) कुस्ती

(b) नेमबाजी

(c) लांबउडी

(d) क्रिकेट

Q37. तराजूचे कार्य ______ नुसार चालते. 

(a) परीवलाचे तत्व

(b) संवेग अक्षव्यतेचा नियम

(c) बलांचा चतुष्कोनाचा नियम

(d) ऊर्जेच्या अक्षव्यतेचा नियम

Q38. सर्व सामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो ?

(a) 120/80

(b) 140/120

(c) 150/70

(d) 100/60 

Q39. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे ?

(a) आइन्स्टाइन

(b) साल्क

(c) चेडविक

(d) लुई पाश्चर

Q40. चोंडी हे अहिल्या देवींचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?

(a) कर्जत

(b) जामखेड

(c) श्रीगोंदा

(d) पाथर्डी

Q41. संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ खालीलपैकी कोठे आहे ?

(a) शेवगाव

(b) पैठण

(c) मोझरी

(d) मंगळवेढा

Q42. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

(a) गोवा

(b) तमिळनाडू

(c) गुजरात

(d) हिमाचल प्रदेश

Q43. पंडीत हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वादय वाजविण्यासाठी प्रसिध्द आहेत ?

(a) संतुर

(b) सरोद

(c) बासरी

(d) शहनाई

Q44. बालकवी हे कोणत्या कवीचे टोपणनाव आहे ?

(a) प्रल्हाद केशव अत्रे

(b) राम गणेश गडकरी

(c) नारायण मुरलीधर गुप्ते

(d) त्र्यंबक बापुजी ठोंबरे

Q45. अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?

(a) 8

(b) 12

(c) 15

(d) 17

Q46. भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे ?

(a) गोदावरी

(b) प्रवरा

(c) मुळा

(d) मुठा

Q47. संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला ?

(a) पुरंदर

(b) शिवनेरी

(c) रायगड

(d) राजगड

Q48. अँनी बेझंट व _____ यांनी होमरुल चळवळ सुरु केली.

(a) गोपाळ कृष्ण गोखले

(b) लाला लजपतराय

(c) लोकमान्य टिळक

(d) महात्मा गांधी

Q49. दिक्षाभुमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे ?

(a) नागपूर

(b) वर्धा

(c) अमरावती

(d) मुंबई

Q50. आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

(a) लोकमान्य टिळक 

(b) गोपाल कृष्ण गोखले

(c) गणेश आगरकर

(d) स्वामी दयानंद सरस्वती

Q51. जर 2x = 3y= 4z, तर x:y:z = ?

(a) 6:4:3

(b) 2:3:4

(c) 4:3:2

(d) 3:4:2

Q52. एक संख्या 45% नी वाढवली, तेव्हा तिची किंमत 116 होते. तर ती संख्या कोणती ?

(a) 82

(b) 80

(c) 90

(d) 85

Q53. आठवडयाची सुटटी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाइकस्वारी करतो. कामाच्या ठिकाणी जा – ये करताना तो दररोज 120 किमी अंतर कापतो. बारा आठवडयानंतर त्याच्या वाहनाने 9000 किमी प्रवास नोंदवला. तर बारा आठवडयाच्या कालावधीत कामावर जाता-येता केलेल्या प्रवासाव्यतिरीक्त नितीनने केलेला प्रवास दर्शविणारा पर्याय निवडा?

(a) 1600 किमी

(b) 1400 किमी

(c) 1800 किमी

(d) 1200 किमी

Q54. जर A : B= 3 : 4 आणि  B : C= 5 : 6 तर A:C बरोबर किती ?

(a) 5:8

(b) 1:2

(c) 3:8

(d) 5:9

Q55. खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

13/21, 11/17, 9/13, 17/11

(a) 13/21

(b) 11/17

(c) 9/13

(d) 17/11

Q56. दिलेल्या संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.

2, 8, 26, 80, ?

(a) 262

(b) 316

(c) 286

(d) 242

Q57. विसंगत घटक ओळखा. 

(a) 24-21

(b) 44-22

(c) 62-23

(d) 84-24

Q58. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती ?

(a) 85

(b) 95

(c) 105

(d) 115

Q59. पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल ?

26, 50, 82, ?

(a) 122

(b) 170

(c) 145

(d) 101

Q60. जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

(a) मंगळवार 

(b) बुधवार

(c) शुक्रवार

(d) गुरुवार

Q61. एका सांकेतिक भाषेत INDIA हा शब्द 13416 व WORLD हा शब्द 75284 असा लिहितात. तर DONALD हा शब्द कसा लिहाल ?

(a) 453684

(b) 455842

(c) 453674

(d) 456384

Q62. प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे, तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा.

(a) 3 वर्षे

(b) 4 वर्षे

(c) 5 वर्षे

(d) 7 वर्षे

Q63. प्रश्नाचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 

KI, LH, MG, NF, ?

(a) PA 

(b) OE

(c) YC

(d) UB

Q64. जर A = E , B = F, C = G तर GOAHEAD चे सांकेतिक रुप तुम्ही कसे कराल?

(a) KSFLIFH

(b) KSELIEH

(c) KSELIGH

(d) KSELIFG

Q65. माधवीने मशिनरीसाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयांची गुंतवणुक केली. तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक आहेत, तर तिने किती रुपये खर्च केले ?

(a) रु. 10100

(b) रु. 10000

(c) रु. 10200

(d) रु. 10101

Q66. अचुक श्रेणी निवडा.

R_TU_S_UR_TU

(a) SUST

(b) RTSS

(c) SRTS

(d) SRST

Q67. दिलेल्या संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या ऐवजी योग्य पर्याय निवडा.

4,13, 38, ?, 168, 289, 458

(a) 72

(b) 87

(c) 103

(d) 129

Q68. C ही A ची एकुलती एक नणंद आहे. C ही B ची आत्या आहे. हा D हा C चा एकुलता एक भाऊ आहे, तर A ही D ची कोण आहे ?

(a) भाची 

(b) भावजय

(c) पत्नी

(d) मेहुणी

Q69. सहा जणांच्या रांगेत D आणि C हे E चे लगतचे शेजारी आहेत. B हा फक्त A चा शेजारी आहे. A हा F पासुन चौथा आहे तर दोन टोकांना कोण आहेत ?

(a) F आणि B

(b) B आणि D

(c) C आणि F

(d) F आणि C

Q70. जर गाडीने स्वताःची गती ताशी 5 किमी ने वाढवली असती तर 210 किमी प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता. तर गाडीचा सुरवातीचा वेग किती?

(a) 25 किमी ताशी

(b) 32 किमी ताशी

(c) 30 किमी ताशी

(d) 35 किमी ताशी

Q71. पिशवीत फक्त एकरंगी असणारे चार भिन्न रंगाचे चेंडु आहेत. नेमके 12 वगळून सर्व चेंडु निळे आहेत. नेमके 21 वगळून सर्व चेंडु पिवळे आहेत, नेमके 20 वगळुन सर्व चेंडु लाल आहेत, नेमके 19 वगळुन सर्व चेंडू हिरवे आहेत. तर पिशवीत एकूण किती चेंडु आहेत ?

(a) 72

(b) 24

(c) 48

(d) 36

Q72. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा.

(a) 47

(b) 37

(c) 48

(d) 49

Q73. 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किमी वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल ?

(a) 36 सेकंद

(b) 40 सेकंद

(c) 50 सेकंद

(d) 45 सेकंद

Q74. एका रक्कमेचे 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे रु. 1800 व रु. 1890 आहे. तर ती रक्कम द.सा.द.शे किती व्याज दराने ठेवली होती ?

(a) 10 %

(b) 9 %

(c) 12 %

(d) 15 %

Q75. संख्याच्या मांडणीवरुन अनुक्रमे Y व Z ची किंमत काढा.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_3.1

(a) 6 व 9

(b) 9 व 8

(c) 8 व 9

(d) 9 व 6

Q76. ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो ? 

(a) मेंदु

(b) कान

(c) डोळे

(d) अस्थी

Q77. आंतरराष्ट्रीय न्यायालयांचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

(a) हेग

(b) पॅरीस

(c) बर्लिन

(d) वॉशिंग्टन

Q78. धरमतरची खाडी कोणत्या जिल्हयात आहे ?

(a) नांदेड

(b) रत्नागिरी

(c) सिंधुदुर्ग

(d) रायगड

Q79. तंबाखू मध्ये ____ हे धोकादायक रसायन असते.

(a) युरिया

(b) निकोटीन

(c) युरिक आम्ल

(d) कॅल्शियम कार्बोनेट

Q80. वस्तू व सेवा कराशी (GST) संबंधित घटना दुरुस्ती कोणती ?

(a) 98 वी

(b) 96 वी

(c) 105 वी

(d) 101 वी

Q81. लक्षद्वीप बेटे ____ येथे आहेत.

(a) प्रशांत महासागर

(b) अरबी समुद्र

(c) बंगालचा उपसागर

(d) भूमध्य समुद्र

Q82. महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो ?

(a) ग्रामसेवक

(b) तहसीलदार

(c) BDO

(d) तलाठी

Q83. जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात ?

(a) मुख्य कार्यकारी अधिकारी

(b) जिल्हाधिकारी

(c) निवासी उपजिल्हाधिकारी

(d) जिल्हयाचे पालकमंत्री

Q84. महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो ?

(a) गोविंदाग्रज

(b) शाहीर विठ्ठल उमाप

(c) वि. वा. शिरवाडकर

(d) वि. स. खांडेकर

Q85. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?

(a) पंडीत जवाहरलाल नेहरु

(b) सरोजिनी नायडू

(c) एस. राधाकृष्णन

(d) इंदिरा गांधी

Q86. भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला ?

(a) 2004

(b) 2005

(c) 2008

(d) 2010

Q87. मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते ?

(a) भूम

(b) वेरुळ

(c) जांब

(d) पैठण

Q88. B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे, पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही. D ही Aची बहीण आहे तर D चे C शी काय नाते आहे ?

(a) बहिण 

(b) आत्या

(c) मावशी 

(d) मामी

Q89. सोडवा.

a_baa_a_b_ab

(a) abaa

(b) bbaa

(c) aaba

(d) abab

Q90. 23, 28, 38, 53, 73, 98, ?

(a) 128

(b) 72

(c) 74

(d) 136

Q91. परस्परसंबंध ओळखा. 9 : 29 :: 11 : 

(a) 37

(b) 35

(c) 39

(d) 38

Q92. एका रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11 असल्यास रांगेत एकूण लोक किती आहे ?

(a) 22

(b) 23

(c) 21

(d) 24

Q93. 1, 2, 3, 6, 9, 18, 27, 54, ?

(a) 56

(b) 108

(c) 27

(d) 81

Q94. एका थैलीत एक-रुपया, 50 पैसे व 25 पैसे यांची 5:6:8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकुण किंमत 420 रु असेल तर 50 पैशांची किती नाणी आहेत ?

(a) 210

(b) 126

(c) 252

(d) 70

Q95. घडयाळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे दुपारचे 2 वाजलेले दाखवणेसाठी तासकाटा किती अंशातुन फिरेल ?

(a) 180

(b) 150

(c) 210

(d) 90

Q96. 16 वस्तुंचे सरासरी वजन 32 आढळले पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तुंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 अशी नोंदवलेले आढळले. तर दिलेल्या पर्यायातुन अचुक सरासरी निवडा.

(a) 29.50

(b) 33

(c) 33.25

(d) 32.50

Q97. मुंबईहुन पुण्याला जाणाऱ्या दोन बस गाडयांपैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता ताशी 80 किमी वेगाने सुटली त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 किमी वेगाने सुटली. तर त्या दोन्ही गाडया एकमेकास किती वाजता भेटतील ?

(a) सकाळी 11

(b) सकाळी 12

(c) दुपारी 2

(d) दुपारी 1

Q98. अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. उरलेल्यापैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात 600 रु जमा केले तर त्याचा पगार किती ?

(a) रु. 6000

(b) रु. 6500

(c) रु. 5000

(d) रु. 4000

Q99. A शहरात 52000 लोकांपैकी 0.30% व्यक्तीकडे मोटारकार आहे. B शहरात 4800 लोकांपैकी 0.25% व्यक्तींकडे मोटारकार आहे. C शहरात 50000 लोकांपैकी 300 व्यक्तींकडे मोटार कार आहे तर खालीलपैकी कोणत्या सांकेतीक चिन्हाने यांचे संबंध दर्शवता येतील ?

(a) A >B >C

(b) B < A < C

(c) C < A < B

(d) B < C < A

Q100. जर A आणि B या दोन संख्येंची सरासरी 20 आहे. B व C यांची सरासरी 19, तसेच C व A ची सरासरा 21 आहे तर A ची किंमत काय?

(a) 24

(b) 22

(c) 20

(d) 18

Solutions

S1. Ans. (d)

Sol. 

जितेंद्रिय – समानाधिकरण बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. जिंकीले इंद्रिये ज्याने असा म्हणजे मारुती.

S2. Ans. (b)

Sol. 

कवीच्छा हा संस्कृत शब्द आहे. कवि + इच्छा, 

इ + इ = ई, ऱ्हस्व + ऱ्हस्व = दीर्घ

S3. Ans. (c)

Sol. 

ऋ मध्ये र् येतो. र् हा मूर्धान्य असल्यामुळे ऋ हा मूर्धान्य आहे.

S4. Ans. (c)

Sol. 

द् हा अर्धे होऊ न शकणारे व्यंजन आहे.

S5. Ans. (c)

Sol.

ट् समोर मृदु स्वर आल्याने ट् चा ड होतो म्हणून पर्याय क्रमांक c .

S6. Ans. (d)

Sol. 

वर हा अव्यय आहे म्हणून अधोरेखित शब्द वाक्यात अव्ययसाधीत विशेषणाचे कार्य करतो.

S7. Ans. (a)

Sol. 

वाहवा हा मूळात अव्यय आहे परंतु वाक्यात तो नामाचे काम करतो म्हणून हे अव्ययसाधीत नाम आहे.

S8. Ans. (c)

Sol. 

बाईमाणूस हा जोडशब्द आहे. शेवटचा शब्द माणूस याला ते प्रत्यय लागतो 

(मो.रा. वाळिंबे सरांच्या पुस्तकाचा संदर्भ) म्हणून तो नपुसंकलिंगी शब्द आहे.

S9. Ans. (c)

Sol. 

ईकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन तेच राहते. (मो.रा. वाळिंबे सरांच्या पुस्तकाचा संदर्भ)

S10. Ans. (b)

Sol. 

काय, कोण हे प्रश्नार्थक व सामान्य सर्वनामाचे प्रकार आहेत. या वाक्यात काय ने प्रश्न विचारला नाही तर त्याला काय माहित नसते म्हणते त्याला सर्वच माहीत असते म्हणून हे सामान्य सर्वनामाचे उदाहरण आहे.

S11. Ans. (d)

Sol. 

आत हे ठिकाण दर्शविण्याचे काम करतात म्हणून सप्तमी विभक्ती आहे.

S12. Ans. (b)

Sol. 

कर्त्याला प्रत्यय लागलाय. कर्माला प्रत्यय लागला. कर्माप्रमाणे क्रियापद चालते म्हणून हे वाक्य कर्म-भाव संकर प्रयोगाचे आहे.

S13. Ans. (c)

Sol. 

पुढील वाक्यात उपपद ततुरुष समास आहे.

S14. Ans. (a)

Sol. 

नदी हा तत्सम शब्द आहे. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे आलेले शब्द.

S15. Ans. (c)

Sol.

“महिना” हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे.

S16. Ans. (d)

Sol. 

ढोलके वाजणे = गाजावाजा होणे.

S17. Ans. (a)

Sol. 

कानामागे टाकणे = दुर्लक्ष करणे

S18. Ans. (d)

Sol. 

खूण = चिन्ह

S19. Ans. (d)

Sol. 

ईडलिंबू = आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती

S20. Ans. (a)

Sol. 

लेखन नियमानुसार बरोबर शब्द पोलीस हा आहे. पुर्वार्ध – पूर्वार्ध

पुज्य – पूज्य, पुस्तीका – पुस्तिका

S21. Ans. (c)

Sol. 

डोंगराआड स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणून अधोरेखित शब्द वाक्यात आधारपूरक कार्य करतो

S22. Ans. (b)

Sol. 

कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. हे केवल वाक्य आहे.

S23. Ans. (c)

Sol. 

मीठभाकर = समाहार द्वंद्व समास. मीठभाकर म्हणजे भाकरी व तत्संबंधी इतर खाद्यपदार्थ किंवा मिळेल ते जेवण.

S24. Ans. (c)

Sol. 

तू लाडू खाल्लास. या वाक्यात कर्तृ-कर्म संकर प्रयोग आहे. कर्तृ-कर्म संकर प्रयोगात कर्ता हा द्वितीयपुरुषी असतो.

S25. Ans. (c)

Sol.

चतुर्थी – अपादान ही चुकीची जोडी आहे.

चतुर्थी – संप्रदान ही बरोबर जोडी आहे.

S26. Ans. (c)

Sol. 1 मे 1960 रोजी बॉम्बे रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबई महाराष्ट्राची राजधानीं म्हणून घोषित झाली. या दिवशी तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मा. यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व दिले.

S27. Ans. (a)

Sol.  ‘रोशा’ जातीचे गवत महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते.

S28. Ans. (d)

Sol. नाशिक थर्मल पॉवर प्लांट महाराष्ट्रातील नाशिकजवळ एकलहरे गावात आहे. हा पॉवर प्लांट महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीच्या कोळसा आधारित पॉवर प्लांटपैकी एक आहे. 

S29. Ans. (b)

Sol. सिध्दटेक हे अष्टविनायक ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे. सिद्धटेक मंदिर बौद्धकालीन लेण्यांमध्ये बांधले गेले होते आणि नंतर हिंदू मंदिरात रूपांतरित केले गेले. मंदिरात भगवान गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे, जी काळ्या पाषाणाची बनलेली आहे. मंदिराभोवती अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत, ज्यात लेणी, मंदिरे आणि तलाव यांचा समावेश आहे.

S30. Ans. (a)

Sol.  चंदनापुरी घाट पुण्याहून नाशिकला जातांना लागतो.  

S31. Ans. (c)

Sol.  ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावी मुडदुस (Rickets) हा रोग होतो. मुडदुस रोगामुळे हाडे मऊ आणि कमजोर होतात, विशेषतः लहान मुलांमध्ये. ‘ड’ जीवनसत्व हाडांची मजबूती आणि कॅल्शियमच्या शोषणासाठी आवश्यक आहे.

S32. Ans. (a)

Sol. ब्राह्मोसमाज हा हिंदू धर्माचा एक एकेश्वरवादी विभाग होता ज्याची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये केली होती. 

S33. Ans. (d)

Sol. लोकसभेच्या सभापतीना राजीनामा दयावयाचा झाल्यास त्यांनी तो लोकसभेच्या उपसभापतीकडे सादर करणे गरजेचे आहे. 

S34. Ans. (b)

Sol. सावित्रीबाई फुले यांचा जन्म  3 जानेवारी 1831 रोजी नायगाव नावाच्या लहान गावात झाला होता. हे गाव सध्या सातारा जिल्ह्यात आहे, 

S35. Ans. (d)

Sol. 2024 ICC पुरुष T20 विश्वचषक युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडीज यांनी जूनमध्ये सह-यजमानपद भूषवले होते.

S36. Ans. (b)

Sol. अभिनव बिंद्रा हे भारताचे प्रसिद्ध नेमबाज आहेत. त्यांनी 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. ते भारताचे पहिले आणि एकमेव वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आहेत.

S37. Ans. (a)

Sol. तराजूचे कार्य परीवलाच्या तत्वावर चालते. परीवलाच्या तत्वानुसार, जेव्हा दोन्ही बाजूंना समान भार लादला जातो तेव्हा तराजू समतोल राखते. हे तत्व आर्किमिडीजच्या तत्वावर आधारित आहे

S38. Ans. (a)

Sol. सामान्यतः वयस्क व्यक्तीसाठी सामान्य रक्तदाब 120/80 mmHg मानला जातो.

S39. Ans. (b)

Sol. जोनास साल्क यांनी पोलिओची लस शोधून काढली. साल्क हे अमेरिकन व्हायरसशास्त्रज्ञ आणि वैद्यकीय संशोधक होते ज्यांनी 1955 मध्ये पोलिओसाठी पहिली प्रभावी लस विकसित केली.

S40. Ans. (b)

Sol. चोंडी हे अहिल्या देवींचे जन्मस्थान जामखेड तालुक्यात आहे. अहिल्या देवी होळकर या होळकर घराण्याच्या राजमाता होत्या आणि त्यांच्या न्यायप्रिय आणि दानशूर राज्यकारभारासाठी त्या प्रसिद्ध होत्या.

S41. Ans. (d)

Sol. संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ मंगळवेढा येथे आहे.

S42. Ans. (b)

Sol. पोंगल हा सण मुख्यत्वेकरून तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो.

S43. Ans. (c)

Sol.  पंडीत हरिप्रसाद चौरसिया बासरी हे वादय वाजविण्यासाठी प्रसिध्द आहेत.

S44. Ans. (d)

Sol. बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपणनाव आहे. ते मराठीतील एक प्रसिद्ध कवी होते ज्यांनी निसर्गकविता आणि लहान मुलांसाठी कवितांसाठी विशेष प्रसिद्धी मिळवली.

S45. Ans. (b)

Sol. अहमदनगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत.

  1. राहुरी 
  2. शेवगाव – पाथर्डी
  3. कर्जत – जामखेड
  4. पारनेर 
  5. अहमदनगर शहर
  6. श्रीगोंदा 
  7. संगमनेर
  8. शिर्डी 
  9. कोपरगाव
  10. श्रीरामपूर 

11.नेवासा

  1. अकोले    

S46. Ans. (b)

Sol. भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते. प्रवरा नदीवर आणि जमीन सपाटीपासून 150 मीटर उंचीवर आहे. हे धरण भारताच्या पश्चिम किनारपट्टी वर भंडारदरा गावात आहे.

S47. Ans. (a)

Sol. संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर या किल्यावर झाला.

S48. Ans. (c)

Sol. अँनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होमरुल चळवळ सुरु केली

S49. Ans. (a)

Sol. दिक्षाभुमी हे स्थान नागपूर शहरात स्थित आहे. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. 

S50. Ans. (d)

Sol. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे केली.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_4.1

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_5.1

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_6.1

S57. Ans. (c)

Sol. 

पर्याय c वगळता इतर सर्व पर्यायांच्या पहिल्या संख्येच्या अंकांची बेरीज दुसऱ्या संख्याच्या अंकांच्या बेरजेच्या दुप्पट आहे.  

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_7.1

S60. Ans. (d)

Sol. 

5 सप्टेंबर (शिक्षक दिन) = शुक्रवार

2 ऑक्टोबर (गांधी जयंती) = ?

दोन्ही दिवसाच्या दरम्यान एकूण दिवस = 27

विषम दिवस = 6

म्हणून उत्तर हे गुरुवार 

S61. Ans. (a)

Sol. 

INDIA – 13416

WORLD – 75284

तर DONALD – 45684

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_8.1

S63. Ans. (b)

Sol. 

KI, LH, MG, NF, ?

? = OE

(पहिल्या अक्षराच्या समोरचे अक्षर आणि दुसऱ्या अक्षराच्या आधीचे अक्षर) 

S64. Ans. (b)

Sol. 

(A = E , B = F, C = G, येथे प्रत्येक अल्फाबेट मध्ये 4 घर समोर गेले कि कोड मिळत आहे.)

GOAHEAD = KSELIEH

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_9.1

S66. Ans. (c)

Sol. 

RSTU ही मालिका आहे. RSTURSTURSTU

 म्हणून उत्तर पर्याय (c) SRTS

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_10.1

S69. Ans. (a)

Sol.

सहा जणांच्या रांगेत D आणि C हे E चे लगतचे शेजारी आहेत. म्हणजे एकतर D E C किंवा C E D, 

A हा F पासुन चौथा आहे म्हणजे F _ _ _ A कारण B हा फक्त A चा शेजारी आहे.

म्हणून अंतिम बैठक व्यवस्था – F D E C A B

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_11.1

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_12.1

S76. Ans. (c)

Sol. ग्लुकोमा (काचबिंदू) हा डोळ्यांचा एक गंभीर आजार आहे. या आजारामध्ये डोळ्याच्या आतील दबाव वाढल्यामुळे डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या दृष्टी तंतूंना (ऑप्टिक नर्व्ह) हानी पोहोचते. 

S77. Ans. (a)

Sol. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हे नेदरलँड्समधील हेग शहरात आहे. हे न्यायालय संयुक्त राष्ट्रसंघाचे एक प्रमुख अंग आहे आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर वाद सोडवण्यासाठी जबाबदार आहे.

S78. Ans. (d)

Sol. धरमतरची खाडी ही महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोंकण मधील सर्वात मोठी खाडी आहे. ही खाडी अरबी समुद्रात आवास गावजवळ उघडते. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून ही खाडी 36 किलोमीटर अंतरावर आहे.

S79. Ans. (b)

Sol. तंबाखू मध्ये निकोटीन हे धोकादायक रसायन असते.

S80. Ans. (d)

Sol. वस्तू व सेवा कर (जीएसटी) ला लागू करण्यासाठी, भारतीय संविधानात 101 वी घटना दुरुस्ती करण्यात आली. वस्तू व सेवा कर 1 जुलै 2017 रोजी लागू झाला.

S81. Ans. (b)

Sol. लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रात आहे. हे बेटसमूह भारताच्या पश्चिमी किनार्‍यापासून सुमारे 200 ते 400 किलोमीटर अंतरावर आहेत. लक्षद्वीप बेटसमूहात 36 बेटे आणि अनेक खडके आहेत. यापैकी 10 बेटे वस्तीमुक्त आहेत. कवरत्ती हे लक्षद्वीपचे राजधानी शहर आहे.

S82. Ans. (d)

Sol. महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर तलाठी सांभाळतो.

S83. Ans. (b)

Sol. जिल्हा नियोजन समितीचे सचिव हे जिल्हाधिकारी (डीएम) असतात. ते समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात आणि समितीचे कार्य सांभाळतात.

S84. Ans. (c)

Sol. वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट मराठी भाषेचे महत्त्व आणि श्रीमंती याची जाणीव करून देणे आणि तिच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे आहे.  

S85. Ans. (a)

Sol. “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” या ग्रंथाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. हे पुस्तक 1944-1946 या काळात अहमदनगर किल्ल्यातील तुरुंगवासाच्या दरम्यान लिहिले गेले होते. या ग्रंथामध्ये भारताच्या इतिहास, संस्कृती, आणि वारसा याबद्दल नेहरूंचे विचार आणि दृष्टीकोन मांडलेले आहेत.

S86. Ans. (b)

Sol. भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 साली लागू झाला. हा कायदा 12 जून 2005 रोजी संसदेने पारित केला आणि 15 जून 2005 रोजी लागू झाला.

S87. Ans. (d)

Sol. मराठवाडयातील पैठण शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_13.1

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_14.1

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_15.1

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_16.1

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_17.1

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_18.1

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पेपर विश्लेषण 7 जुलेे 2024 : प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका

जिल्हा  प्रश्नपत्रिका PDF उत्तरतालिका PDF
अहमदनगर(अहिल्यानगर) PDF PDF
जळगाव PDF PDF
नाशिक ग्रामीण PDF PDF
वर्धा PDF PDF
लातूर PDF PDF
जालना PDF PDF
धुळे PDF PDF
वाशिम PDF PDF
भंडारा PDF PDF
नवी मुंबई PDF PDF
सोलापूर PDF PDF
अमरावती PDF PDF
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण PDF PDF
नाशिक शहर PDF PDF
पालघर PDF PDF
पुणे लोहमार्ग PDF PDF
बीड PDF PDF
मिरा भाईंदर वसई विरार PDF PDF
मुंबई लोहमार्ग PDF PDF
यवतमाळ PDF PDF

  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका - 07 जुलेे 2024 | Maharashtra Police Constable Recruitment 2024 Question Paper -07 July 2024_19.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका मला कोठे मिळतील ?

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 प्रश्नपत्रिका तुम्हाला या लेखात मिळतील.