Table of Contents
महाराष्ट्र पोलीस परीक्षेचे स्वरूप 2024
महाराष्ट्र पोलीस परीक्षेचे स्वरूप 2024: महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची तयारी करताना आधी परीक्षेचे स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही परीक्षेसाठी योग्य तयारी करू शकता. महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. आत्तापर्यंत विविध जिल्ह्यांतील एकूण 17641 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस परीक्षेचे स्वरूप 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन
महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | महाराष्ट्र शासन, गृह विभाग |
भरतीचे नाव |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 |
पदाचे नावे |
|
रिक्त पदे | 17641 |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mahapolice.gov.in/ |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (हिंगोली)
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (SRPF कुसडगाव, दौंड कॅम्प)
गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय शुद्धिपत्रक
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महत्वाच्या तारखा | |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसूचना | 01 मार्च 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात | 05 मार्च 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
31 मार्च 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 05 मार्च 2024 रोजी सक्रीय होईल.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय)
पोलीस शिपाई चालक पदासाठी परीक्षेचे स्वरूप
उमेदवार खाली पोलीस शिपाई चालक पदासाठी परीक्षेचे स्वरूप तपासू शकतात.
शारीरिक चाचणीः
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवा प्रवेश) नियम, 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुदींनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल:
पुरुष उमेदवार | गुण | महिला उमेदवार | गुण |
1600 मीटर धावणे | 30 | 800 मीटर धावणे | 30 |
गोळाफेक | 20 | गोळाफेक | 20 |
एकूण | 50 | एकूण | 50 |
पुरुष/ तृतीयपंथी उमेदवार | गुण | महिला तृतीयपंथी उमेदवार | गुण |
1600 मीटर धावणे | 30 | 800 मीटर धावणे | 30 |
गोळाफेक | 20 | गोळाफेक | 20 |
एकूण | 50 | एकूण | 50 |
कौशल्य चाचणीः
a) शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
b) कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :-
(अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी- 25 गुण
(ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी- 25 गुण
c) कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.
d) वाहन चालविण्यातील कौशल्य चाचणीचे निकष, महासंचालकांकडून वेळोवेळी ठरविण्यात येतील.
e) वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्याकरीता, समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
लेखी चाचणीः
(i) शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील.
(ii) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
(iii) लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल.
(iv) संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरीता एकाच दिवशी लेखी परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेवूनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा.
(v) लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेलः-
a) अंकगणित,
b) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी;
c) बुध्दीमत्ता चाचणी,
d) मराठी व्याकरण
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.