Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   महाराष्ट्र पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे 2024

महाराष्ट्र पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे 2024, आवश्यक कागदपत्रांची यादी तपासा

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. आत्तापर्यंत विविध जिल्ह्यांतील एकूण 17641 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन 

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

पदाचे नावे
  • पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई चालक
  • कारागृह शिपाई
  • सशस्त्र पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई बँड्समन
रिक्त पदे 17641
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (हिंगोली)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (SRPF कुसडगाव, दौंड कॅम्प)

गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय शुद्धिपत्रक

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसूचना 01 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 05 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 मार्च 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 05 मार्च 2024 रोजी सक्रीय होईल.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय)

महाराष्ट्र पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे 2024

सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

  •  SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र,
  • जन्म दाखला,
  • रहिवाशी प्रमाणपत्र,
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र,
  • संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT),
  • खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती (शासन निर्णय दि.13/3/2017 व दि. 11/03/2019 प्रमाणे),
  • नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रः (वि.जा-अ, भ.ज-ब, भ.ज-क, भ.ज-ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी, इडब्लूएस प्रवर्गातील पुरूष व महिलांकरीता आरक्षीत असलेल्या पदांवरील निवडीकरीता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांचेबाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दि. 04/05/2023 मधील तरतूद क्र.4 नुसार),
  • माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र,
  • गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, (जाहिरात दिनांकास 1095 दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल),
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,
  • भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र,
  • पोलीस पाल्य प्रमाणपत्र,
  • अनाथाबाबतचे प्रमाणपत्र,
  • अंशकालीन प्रमाणपत्र,
  • इ.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र,
  • NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.

उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्या नंतर तपासण्यात येतील.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पोलीस भरती जयहिंद बॅच
पोलीस भरती जयहिंद बॅच

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी जाहीर झाली