Marathi govt jobs   »   Study Materials   »   विभक्ती

विभक्ती : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

विभक्ती

Title 

Link  Link 

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना 

Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan

अँप लिंक वेब लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

अँप लिंक वेब लिंक

विभक्ती: नामे सर्वनाम यांचा क्रियापदाशी व इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

नामाचा क्रियापदाशी किवा इतर शब्दांशी असणारा संबंध एकूण आठ प्रकारचा असतो म्हणून विभक्तीचे आठ प्रकार मानले जातात तर कार्यकार्थ एकूण सहा मानले जातात. कार्यकार्थात षष्टी व संबोधन यांचा समावेश होत नाही.

विभक्ती प्रत्ययाचा तक्ता
विभक्ती विभक्तीचे प्रत्यय कारकार्थ
एकवचन अनेकवचन
प्रथमा कर्ता
व्दितीया स, ला, ते स, ला, ना, ते कर्म
तृतीय ने, ए, शी नी, शी, ई, ही करण (साधन)
चतुर्थी स, ला, ते स, ला, ना, ते संप्रदान (दान/भेट)
पंचमी ऊन, हुन ऊन, हुन अपादान (दुरावा/वियोग)
षष्टी चा, ची, चे, च्या चा, ची, चे, च्या संबंध
सप्तमी त, ई, आ त, ई, आ अधिकरण (स्थळ/वेळ)
संबोधन नो हाक

प्रथमा  विभक्ती 

  1. तो राक्षस होता .
  2. श्रीकांतनी दहा पोती गहू पिकविले .
  3. मी पन्नास मैल पळतो .
  4. पाणी वीस रुपये लिटर मिळते .
  5. सुवर्णा म्हैस बांधते .

द्वितीया  विभक्ती 

  1. संजुने रामाला बोलावले.
  2. माधवीने चोरास पाहिले .
  3. शंकर फिरायला चालला.
  4. दगडू शेळीला चालवतो .
  5. संकल्प किरणला मारतो .

तृतीया  विभक्ती 

  1. श्याम शहाणपणाने सांगतो.
  2. गाडी पाण्याने भिजली .
  3. रिया मनाने प्रेमळ आहे .
  4. गुरुजी किलोने सफरचंद घेतात.
  5. अर्जुन पायरीशी बसला .

चतुर्थी  विभक्ती 

  1. वधू कार्यक्रमाला नाही.
  1. शुभमला बहीण आहे .
  2. सुनीता बसला लटकून गेली .
  3. राधा श्रीकृष्णाला भेटते .
  4. सविता कामाला जाते.

पंचमी  विभक्ती

  1. पुण्याहून सोलापूर लांब आहे .
  2. त्याच्याहून तो मोठा आहे.
  3. समीरहून माधव हुशारआहे .
  4. वाघ जंगलातून मारला गेला .
  5. श्री च्या हातून लिहिले गेले.

षष्ठी  विभक्ती

  1. सुरज मामाच्या गावाला गेला.
  2. तिला रेशीमची साडी आवडते .
  3. हा श्यामचा मित्र आहे .
  4. ती मुलीची काकू आहे .
  5. सर्वांचे अभिनंदन झाले .

सप्तमी  विभक्ती

  1. वरुण अभ्यासात पुढे आहे .
  2. सर्वांनी जोरात आंबा धरला .
  3. माणिकची मुलगी सर्वात सुंदर आहे .
  4. मुकुंद गावी नाही.
  5. कुणाल पायी गेला.

संबोधन 

ज्या नामाने हाक मारली जाते, त्यास संबोधन असे म्हणतात. संबोधनाला अनेकवचनात प्रत्यय लागतात . त्याचबरोबर त्यांचा विकारही होतो . सर्वनामांना हाक मारता येत नाही , त्यामुळे त्यांची संबोधन विभक्ती होत नाही .

  • मुलींनो सरळ चाला.
  • श्यामा, गाडी ने.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

विभक्तीचे प्रकार किती ?

विभक्तीचे प्रकार 8 आहेत.

इतका महत्त्वाचा लेख कुठे मिळेल?

Adda 247 मराठीच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांच्या सूचना, अभ्यासक्रम, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यास साहित्य मिळेल.