Table of Contents
Maharashtra Politics: Maharashtra state is one of the leading and most important states in India. A total of 48 MPs are elected from Maharashtra in the Lok Sabha elections. And the Legislative Assembly of Maharashtra has a total of 288 MLAs. State Legislatures (Maharashtra Legislature) came into existence under Article 168. In this article, we are going to see detailed information about Maharashtra Politics.
Maharashtra Politics | |
Category | Study Material |
Subject | Indian Polity |
Useful for | All Competitive Exams |
Article Name | Maharashtra Politics |
Maharashtra Politics
Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य भारतातील एक आघाडीचे व महत्वाचे राज्य आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकूण 48 खाजदार निवडले जातात. आणि महाराष्ट्राची विधानसभा एकूण 288 आमदारांची आहे.कलम 168 अन्वये राज्यांची विधानमंडळे (Maharashtra Legislature) अस्तित्वात आली. वेगवेगळी विचारधारा असणारे विविध पक्ष महाराष्ट्रात आहे. दर 5 वर्षांनी महाराष्ट्रात निवडणुका होत असतात. महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेत भारतीय राज्यघटना या विषयात Maharashtra Politics वर हमखास प्रश्न येतो. परीक्षेमध्ये आपणस Maharashtra Politics मधील कलम आणि Political Parties in Maharashtra यावर प्रश्न विचारल्या जातात. आज या लेखात आपण Maharashtra Politics बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Maharashtra Politics: Maharashtra Legislature | महाराष्ट्राचे विधानमंडळ
Maharashtra Legislature: महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला (Maharashtra Legislature) 138 वर्षाचा प्रदीर्घ व वैभवशाली इतिहास आहे. ब्रिटिश कारकिर्दीत मुंबई इलाखा होता. त्यावेळच्या मुंबई प्रांतामध्ये मराठवाडा व विदर्भाचा भाग वगळून आताच्या महाराष्ट्रासह बेळगाव, कारवार, विजापूर हे भाग तसेच भारताची फाळणी होण्यापूर्वीचा सिंध प्रांत व सध्याचे गुजरात राज्य यांचा समावेश होता. सध्या महाराष्ट्राचे 15वे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्र विधीमंडळाचे दोन सभागृह आहेत. वरिष्ठ सभागृह – विधान परिषद व कनिष्ठ सभागृह विधान सभा. महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत. Maharashtra Legislature बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Maharashtra Politics: Political Parties in Maharashtra | महाराष्ट्रातील राजकीय पक्ष
Political Parties in Maharashtra: राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष अशा दोन मुख्य प्रकारात पक्ष वर्गवारी करण्यात आलेली आहे. राज्य पातळीवर काम करणारे पक्ष हे प्रादेशिक पक्ष म्हणून संबोधले जातात आणि देश पातळीवर काम करणारे पक्ष हे राष्ट्रीय पक्ष म्हणून संबोधले जातात.
ज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी 16 मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता 48 ऐवजी 190 मुक्त चिन्हे निश्चित केली आहेत. त्यापैकी ज्या पक्षांना (Maharashtra Politics) Election Commission of India ने Reconize केलेल्या त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे
Chief Minister Role and Function
Maharashtra Politics: Bharatiya Janata Party | भारतीय जनता पक्ष
Maharashtra Politics: Bharatiya Janata Part: पहिले भारतीय जनसंघ नंतर जनता पार्टी शेवटी भारतीय जनता पार्टी असा या पक्षाचा प्रवास आहे. सर्वात आधी जनसंघाची स्थापना करण्यात आली, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाग होता. 1951 साली जनसंघाची स्थापना झाली. त्यानंतर 1977 साली समविचारांचे पक्ष (Maharashtra Politics) एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. नंतर जनता पक्ष बरखास्त झाला आणि 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे प्रथम अध्यक्ष होते. हिंदुत्व आणि राष्ट्रवाद हे दोन मुख्य उद्देश आहेत. सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे चिन्ह नांगर खांदयावर घेतलेला माणूस हे होते, भारतीय जनता पक्ष स्थापन झाल्यानंतर कमळ हे चिन्ह देण्यात आले. महाराष्ट्र भाजपा बद्दल माहिती खालीलप्रमाणे
पक्षाचे नाव | भारतीय जनता पार्टी |
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष | श्री चंद्रकांत पाटील |
सभागुह नेता | श्री, देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) |
निवडणूक चिन्ह | कमळ |
Maharashtra Politics: Shivsena | शिवसेना
Maharashtra Politics: Shivsena: सन 1966 मध्ये शिवसेना या पक्षाची स्थापना मुंबई येथे केली गेली. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी (Maharashtra Politics) सोबत युती करून महाराष्ट्रात सत्तेत समाविष्ट झालेली आहे. शिवसेना हे संघटना म्हणून कार्यरत होती, काही काळाने पक्षात रूपांतर करण्यात आले.
धनुष्यबाण हे पक्षाचे अधिकृत चिन्ह आहे. मुख्यत्वे मराठी माणूस, हिंदुत्व, मुंबई हे मुद्दे/उद्देश आहेत. पक्ष व्यतिरिक्त बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सध्या उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख आहेत.
पक्षाचे नाव | शिवसेना |
प्रमुख | श्री उद्धव ठाकरे |
सभागुह नेता | – |
निवडणूक चिन्ह | धनुष्य बाण |
Maharashtra Politics: Indian National Congress | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
Maharashtra Politics: Indian National Congres: काँग्रेस पक्षाची (Maharashtra Politics) स्थापना ब्रिटिश काळात इ.स. 1885 साली मुंबई येथे झाली. स्थापनेपासून बऱ्याच मंडळींनी महत्वाची भूमिका बजावली आहे. यात लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांचा समावेश होता. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धुरा आली. सुरुवातीच्या काळात गाय आणि वासरू हे पक्षाचे अधिकृत चिन्ह होते, त्यानंतर हाताचा पंजा हे चिन्ह देण्यात आले. भारतातील राष्ट्रीय आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची गणना केली जाते.
पक्षाचे नाव | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस |
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष | नाना पाटोल |
सभागुह नेता | श्री. बाळासाहेब थोरात |
निवडणूक चिन्ह | पंजा |
Chief Minister Role and Function
Maharashtra Politics: Indian Nationalist Congres | राष्ट्रवादी पक्ष
Maharashtra Politics: Indian Nationalist Congres: सन 1919 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. भारतीय काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. संयुक्त पुरोगामी आघाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होतो. भारतातील राष्ट्रीय पक्ष असला तरी महाराष्ट्र राज्यात जास्त प्रभाव दिसून येतो. राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारसरणीने पक्ष प्रेरित आहे.पक्षाचे अधिकृत चिन्ह घड्याळ आहे, स्थापनेपासून यामध्ये बदल झालेला नाही.
पक्षाचे नाव | राष्ट्रवादी कॉंग्रेस |
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष | श्री. जयंत पाटील |
सभागुह नेता | श्री. जयंत पाटील |
निवडणूक चिन्ह | घड्याळ |
Maharashtra Politics: Maharashtra Navnirman Sena | महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Maharashtra Politics: Maharashtra Navnirman Sena: शिवसेना पक्षातून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (Maharashtra Politics) स्थापना केली. मनसे हा एक प्रादेशिक पक्ष आहे. मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र धर्म हे प्रमुख मुद्दे/उद्देश आहे. मनसेचे परप्रांतीय विरुद्ध आंदोलन हे गाजलेले प्रकरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार निवडून आणले, मात्र त्यानंतर फारसे यश मिळाले नाही. मनसे हा महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहे.
पक्षाचे नाव | महाराष्ट्र नवनिर्माण सेना |
पक्षप्रमुख | श्री. राज ठाकरे |
सभागुह नेता | श्री. प्रमोद (राजू) रतन पाटील |
निवडणूक चिन्ह | रेल्वे इंजिन |
See Also