Table of Contents
महाराष्ट्र पोलीस भरती 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: दिनांक 05 मार्च 2024 पासून महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 असणार आहे. महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. आत्तापर्यंत विविध जिल्ह्यांतील एकूण 17471 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 पात्रता निकष बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन
महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महाराष्ट्र शासन, गृह विभाग |
भरतीचे नाव |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 |
पदाचे नावे |
|
रिक्त पदे | 17471 |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mahapolice.gov.in/ |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (हिंगोली)
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (SRPF कुसडगाव, दौंड कॅम्प)
कारागृह शिपाई पदासाठी पात्रता निकष
कारागृह शिपाई पदासाठी सविस्तर पणे पात्रता निकष जसे कि वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता तपशील खाली सविस्तर पणे दिला आहे.
वयोमर्यादा
प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
खुला | 18 वर्ष | 28 वर्ष |
मागासवर्ग | 18 वर्ष | 33 वर्ष |
माजी सैनिक | 18 वर्ष | उमेदवाराचा सशस्त्र दलात झालेला कालावधी अधिक 3 वर्ष |
अनाथ | 18 वर्ष | 33 वर्ष |
पदवीधर अंशकालीन | 18 वर्ष | 55 वर्ष |
भूकंपग्रस्त | 18 वर्ष | 45 वर्ष |
प्रकल्पग्रस्त | 18 वर्ष | 45 वर्ष |
शैक्षणिक अर्हता
महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965 (सन 1965 चा महा. अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत) (12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्षबाबतचे गृह विभाग शासन पत्र क्र. आरसीटी-0305/ सीआर-266/पोल-5अ, दिनांक 29/06/2005 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार).
शारीरिक पात्रता
महिला उमेदवारांकरिता | पुरुष उमेदवारांकरिता | तृतीय पंथी (ट्रान्सजेंडर) | |
अ) उंची | 155 से.मी. पेक्षा कमी नसावी | 165 से.मी. पेक्षा कमी नसावी. | (अ) स्वतःची लिंग ओळख महिला / तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी :- 155 से.मी. पेक्षा कमी नसावी
(ब) स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तीसाठी 165 से.मी. पेक्षा कमी नसावी. |
ब) छाती | ——— | न फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 से.मी. पेक्षा कमी नसावा. | स्वतःची लिंग ओळख महिला / पुरुष / तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी आवश्यक नाही |
सूट:
I) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईलः
a) उंची : 4.0 सें.मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी.
b) छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.
II) टीपः महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 मधील नियम 3 चा उपखंड (क) नुसार विहित केलेल्या शारिरीक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमदेवारांच्या बाबतीत वरीलप्रमाणे शिथील करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील.
III) खेळाडू उमेदवारासाठीः आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 सें.मी. इतकी सूट देय राहील.
IV) पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबतः पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिका-यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचा-यांच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस दलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल.
a) उंची: 2.5 सें.मी. पुरुष व महिला उमेदवारांसाठी.
b) छातीः 2 सें.मी. न फुगवता व 1.5 सें.मी. फुगवून पुरुष उमेदवारांसाठी.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महत्वाच्या तारखा | |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसूचना | 01 मार्च 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात | 05 मार्च 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
31 मार्च 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 05 मार्च 2024 रोजी सक्रीय झाली आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय)
महाराष्ट्र पोलीस भरती 2024शी संबंधित इतर लेख
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
RRB तंत्रज्ञ भरती 2024 | महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 |
सिडको भरती 2024 | पुणे महानगरपालिका भरती 2024 |