Table of Contents
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विविध संवर्गातील एकूण 153 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 जाहीर केली आहे. सदर भरतीची अधिकृत अधिसुचना दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार आपले अर्ज दिनांक 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 ची अधिसुचना, रिक्त पदे, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: विहंगावलोकन
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी आणि कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी या पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कार्यालय | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक |
भरतीचे नाव | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 |
पदाचे नाव |
|
एकूण रिक्त पदे | 153 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.mscbank.com |
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 अधिसूचना | 10 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची सुरवात | 10 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख |
30 ऑक्टोबर 2023 |
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 अधिसूचना
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी आणि कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 ची अधिसुचना डाऊनलोड करू शकता.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 अधिसूचना PDF
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: रिक्त पदाचा तपशील
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी आणि कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी च्या एकूण 153 रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी भरतीसाठी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: रिक्त पदे |
|
पदाचे नाव | रिक्त पदे |
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी | 45 |
लिपिक प्रशिक्षणार्थी | 107 |
कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी | 1 |
Total Vacancies | 153 |
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: अर्ज शुल्क
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: अर्ज शुल्क | |
पदाचे नाव | अर्ज शुल्क |
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी | रु. 1770 |
लिपिक प्रशिक्षणार्थी | रु. 1180 |
कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी | रु. 1770 |
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: पात्रता निकष
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी आणि कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी पदांना लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता:
- लिपिक प्रशिक्षणार्थी: कोणत्याही शाखेतील किमान 50% गुणांसह पदवीधर आणि मराठी विषयासह शालांत परीक्षा उत्तीर्ण.
- कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी: उमेदवाराकडे सर्व सेमिस्टर/वर्षांच्या एकूण किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी विषयासह शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी रिक्त पदांसाठी JAIIB आणि CAIIB उत्तीर्ण होणे श्रेयस्कर असेल.
- कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी: कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी विषयासह शालांत परीक्षा उत्तीर्ण. उमेदवाराला मराठी लघुलेखनमध्ये 80/100 आणि लिप्यंतरणामध्ये 40 शब्द प्रती मिनिट च्या वेगाने चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. उमेदवारांची संगणक अनुप्रयोग (वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेड शीट) मध्ये प्रवीणता असणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीनंतर इंग्रजी स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकणे आवश्यक आहे, ते अयशस्वी झाल्यास, त्यांचे प्रोबेशन बँकेद्वारे मंजूर केले जाणार नाही.
वयोमर्यादा:
- लिपिक प्रशिक्षणार्थी: 31.08.2023 रोजी किमान 21 वर्षे आणि कमाल 28 वर्षे.
- कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी: 31.08.2023 रोजी किमान 23 वर्षे आणि कमाल 32 वर्षे.
- कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी: 31.08.2023 रोजी किमान 23 वर्षे आणि कमाल 32 वर्षे.
अनुभव:
- लिपिक प्रशिक्षणार्थी: अनुभव असणे आवश्यक नाही.
- कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी: 2 वर्षांपर्यंत. बँकिंग क्षेत्रात शक्यतो अर्बन/डीसीसी बँकेत अधिकारी म्हणून .
अनिवार्य- उमेदवार हे महाराष्ट्र राज्यात वास्तव्यास असले पाहिजेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: अर्ज करण्यासाठी लिंक
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी आणि कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 असून उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज करू शकता.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023, ऑनलाइन अर्जाची लिंक
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड ऑनलाइन (लेखी) चाचणी/परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत याद्वारे केली जाईल.
- उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी लेखी परीक्षेत किमान 60% म्हणजे 120 गुण पात्रता गुण मिळणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुपमहाराष्ट्राचा महापॅक