Marathi govt jobs   »   Maharashtra State GK Daily Quiz in...

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-15th July

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-15th July_2.1

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. आपण एमपीएससी आणि इतर परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला क्विझ देण्याचे महत्त्व माहित असलेच पाहिजे. बर्‍याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुरेसे तास दिले जात असतानाही त्यांना या परीक्षांची पूर्तताही करता आली नाही कारण ते त्यांचे परीक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत आणि संशोधन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या संबंधित विषयाची किंवा विषयाची क्विझ देणे कारण आपण या मार्गाने कव्हर करू शकता कमी वेळात जास्तीत जास्त विषय.  दैनिक क्विझ देऊन तुम्ही तुमच्या तयारीची पातळी तपासू शकता. महाराष्ट्र राज्य संदर्भात आपला एकूण किती अभ्यास झालेला आहे ह्याची पूर्तता करण्यासाठी घेऊन येत आहोत Maharashtra State GK Quiz प्रश्न व संपूर्ण मराठीत स्पष्टीकरणासह.

 

Q1. अजिंठा रेंज पूर्वेच्या टोकाला दोन शिंगात विभागली गेली आहे.
(1) परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाणारी दक्षिणेकडील सातमाळ रेंज
(2) यवतमाळ जिल्ह्यातून जाणारी उत्तरेकडील निर्मल रेंज. वरील कोणते विधान बरोबर आहे?
(a) केवळ (1) बरोबर आहे.
(b) केवळ (2) बरोबर आहे.
(c) न (1) बरोबर न (2)
(d) दोन्ही (1) व (2) बरोबर

Q2. आकडेवारी नुसार महाराष्ट्रात एकूण फळफळावळाचे सर्वात जास्त क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून त्यानंतर अनुक्रमे या जिल्ह्याचे क्रम लागतात.
(a) जळगाव, रत्नागिरी, सोलापूर व अमरावती
(b) रत्नागिरी, सोलापूर अमरावती व जळगाव
(c) सोलापूर, अमरावती, जळगाव व रत्नागिरी
(d) अमरावती, सोलापूर, रत्नागिरी व जळगाव

Q3. खालीलपैकी कोणते /कोणती विधान/विधाने बरोबर नाही/त?
(1) 15 ऑगस्ट 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले
(2) हिंगोली कयाधू नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे
(3) वसमत तालुका परभणी जिल्ह्यात आहे
पर्यायी उत्तरे
(a) विधान (1)
(b) विधान (1) आणि (2)
(c) विधान (1) आणि (3)
(d) विधान (1), (2) आणि (3)

Q4. महाराष्ट्रातील पुढील शिखरांना त्यांच्या उंचीच्या चढत्या क्रमाने लावा :
(a) राजगड, तोरणा, हरिश्चंद्रगड, त्र्यंबकेश्वर
(b) राजगड, त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड
(c) त्र्यंबकेश्वर, राजगड, तोरणा, हरिश्चंद्रगड
(d) त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड, राजगड

Q5. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
(1) भात संशोधन संस्था कर्जत, खोपोली, रत्नागिरी येथे स्थापन केल्या गेल्या आहेत परंतु सावंतवाडीत नाही.
(2) पश्‍चिम बंगालमध्ये वर्षात भाताची तीन पिके घेण्यात येतात.
(a) केवळ (1)
(b) केवळ (2)
(c) दोन्ही
(d) एकही नाही

Q6. खालील विधाने पहा
(1) औरंगाबाद शहर जालना शहराच्या पश्‍चिमेस आहे.
(2) उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्ह्याच्या उत्तरेस आहे.
(3) महाराष्ट्रामधील फक्त 6 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे.
पर्यायी उत्तरे :
(a) फक्त विधान (1) बरोबर आहे.
(b) फक्त विधान (3) बरोबर आहे.
(c) विधाने (1), (2) आणि (3) चूक आहेत.
(d) विधाने (2) आणि (3) बरोबर आहेत.

Q7. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रीत झालेले आहे?
(1) गोदावरी
(2) भिमा
(3) कृष्णा
(4) पंचगंगा
पर्यायी उत्तरे :
(a) फक्त (1) विधान बरोबर आहे.
(b) (1) आणि (2) विधाने बरोबर आहेत.
(c) फक्त (3) विधान बरोबर आहे
(d) (1) आणि (3) विधाने बरोबर आहेत

Q8. महाराष्ट्रात अथोमुखी व ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ ——- येथे अहमदनगर जिल्ह्यात आढळतात.
(a) कान्हूर
(b) राहुरी
(c) कर्जत
(d) शिरूर

Q9. खालील नदीचे नाव ओळखा :
(1) मध्य प्रदेशात उगम.
(2) वर्धा नदीशी संगम झाल्यावर प्राणहिता म्हणून ओळख
(3) चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या उत्तर-दक्षीण सीमांची निर्मिती
(4) पेंच व बाघ ह्या उपनद्या
पर्यायी उत्तरे
(a) प्राणहिता
(b) इंद्रावती
(c) वर्धा

(d) वैनगंगा

Q10. महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात —— या महिन्यांत जास्त येतात.
(a) एप्रिल आणि जुलै
(b) एप्रिल आणि मे
(c) मे आणि जून
(d) जून आणि जुलै

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

SOLUTIONS
S1. Ans.(c)
Sol. सातमाळा पवर्तताची रांग पश्चिमेकडून पूर्वकडे जात असताना दोन रांगेत रुपांतर होते.
1. परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या रांगेस निर्मल रांग म्हणतात.
2. उत्तरेस असणारी रांग यवतमाळ जिल्ह्यातून जाते तिला अजिंठा रांग असे म्हणतात.

S2. Ans.(a)
Sol. महाराष्ट्रातील एकूण फळफळावळाचे सर्वात जास्त क्षेत्र असलेली जिल्हे.(2013-14 नुसार)
नाशिक – 13.4%
अमरावती 9.85%
सिंधुदुर्ग 8.44%
रत्नागिरी 7.97%
सोलापुर 7.94 %
रोजगार हमी योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकारने फळविकासासाठी फलोत्पादन योजना 21 जुन 1990 पासुन सुरु केली आहे.
महाराष्ट्राच्या एकूण शेती उत्पादनापैकी 25% उत्पादन फलोत्पादना पासुन मिळते.
महाराष्ट्रात फळ पीकाखालील क्षेत्र 13 लाख हेक्टर इतके असुन सर्वात जास्त क्षेत्र आंबा या पीकाचे आहे.

S3. Ans.(c)
Sol. परभणी व हिगोली जिल्ह्यातील तालुके :
परभणी (9) :- परभणी, जिंतूर, पाथरी गंगाखेड, सोनपेठ, मानवत, सेलू, पालम, पूर्णा.
हिंगोली (5):- हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव

S4. Ans.(c)
Sol. महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे (उंचीनुसार)
कळसूबाई – 1646 मी. अहमदनगर
साल्हेर – 1567 मी नाशिक
महाबळेश्वर -1438 मी सातारा
हरिश्चंद्रगड – 1424 मी अहमदनगर
सप्तशृंगी – 1416 मी नाशिक
तोरणा- 1404 मी पुणे
राजगड – 1376 मी पुणे
अस्तंभा – 1325 मी नंदूरबार
त्र्यंबकेश्वर – 1304 मी नाशिक

S5. Ans.(d)
Sol. राज्यात भात शेतीची प्रगती व्हावी आणि हेक्टरी उत्पादन वाढवावे म्हणून खालील भात संशोधन केंद्र सुरू करण्यात आली.
भारतामध्ये विशेषतः पश्चिम बंगालमध्ये एका वर्षात दोन-तीनदा भात पीक घेतले जाते.
रायगड – कर्जत, पनवेल.
पालघर – पालघर
भंडारा – साकोली
कोल्हापूर – राधानगरी
पुणे- लोणावळा
नाशिक – इगतपुरी
उस्मानाबाद – तुळजापूर

S6. Ans.(a)
Sol. उस्मानाबाद जिल्हा हा जालना जिल्ह्याच्या दक्षिणेस आहे.
वायव्य- दा.न.ह (1)- पालघर
वायव्य – गुजरात (4) – पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार,
उत्तर – मध्य प्रदेश (8) – नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदीया
पूर्व – छत्तीसगड (2) – गोंदिया, गडचिरोली
दक्षिण- तेलंगणा (4) – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
दक्षिण – कर्नाटक (7) – नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
नैऋत्य – गोवा (1) – सिंधुदुर्ग

S7. Ans.(b)
Sol. ज्वारी पिकाचे सर्वाधिक क्षेत्र गोदावरी, भीमा नदी खोऱ्यात एकवटले आहे.
खरीब हंगामाखाली 40 टक्के क्षेत्र असते.
महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मका अशी भरड धान्ये घेतली जातात.
इतर माहिती :
ज्वारीसाठी आवश्यक तापमान – 25° तें 26*°से. असावे ७ पर्जन्य – कमीत कमी 40 ते 45 सेंमी.
क्षेत्र प्रमाणानुसार एकूण :
एकूण ज्वारी :- सोलापूर,अहमदनगर, पुणे, नांदेड, जळगाव
खरीप ज्वारी :- लातूर, नांदेड, जळगाव, बुलढाणा
रब्बी ज्वारी :- सोलापूर, अहमदनगर, पुणे, बीड

S8. And (a)
Sol. लवणस्तंभ :
अधोमुखी व उर्ध्वमुखी लवणस्तंभ हे भुजालाच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होतात.उर्ध्वमुखी लवणस्तंभ व अधोमुखी लवणस्तंभाची लांबी वाढून त्या एकमेकांना मिळतात व त्यानंतर एका अखंड स्तंभाची निर्मिती होते त्यांना कंदार स्तंभ/गुहास्तंभ असे म्हणतात.
1.अधोमुखी : कार्स्ट प्रदेशात चुनखडीच्या भेगामधून झिरपणारे पाणी जेव्हा भूअंतर्गत गुहाच्या छतावरून ठिबकते तेव्हा जी
भूरूपे तयार होतात, त्यांना अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात.
2. उर्ध्वमुखी : चुनखडीच्या भेगांमधून झिरपणारे पाणी जेव्हा भूअंतर्गत गुहेच्या पृष्ठभागावर आदळते तेव्हा
चुनखडी क्षारांचा संचय होऊन उर्ध्वमुखी लवणस्तंभ तयार होतात. या भेगांमधून झिरपणाऱ्या पाण्यात – चुनखडी, कार्बोनिक आम्ल यांचे अस्तित्व असते.

S9. Ans.(d)
Sol. वैनगंगा:
उगम -मैकलपर्वत सातपुडा, शिवणी (मध्यप्रदेश).
महाराष्ट्रातील लांबी 295 कि.मी.
क्षेत्रफळ 38000 चौरस कि.मी.
वैशिष्टे – महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमाकाचे पाणी वाहुन नेणारे नदी खोरे.
डाव्या बाजूच्या उपनद्या – वाघ, गाढवी, चुलबुल.
उजव्या बाजूच्या उपनद्या – कव्हाण, मुल, आंधरी.

S10. Ans.(c)
Sol. महाराष्ट्रात एप्रिल-मे महिन्यात जो पाऊस पडतो, त्याला भारतीय उपखंडातील हवामानाची परिस्थिती बऱ्याच अंशी कारणीभूत आहे.
एप्रिल व मे महिन्यात आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसास आंबेसरी म्हणतात.
एप्रिल व मे महिन्यात अधूनमधून वळवाचा पाऊस पडत असतो.
काही वेळेस ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होऊन वादळी वारे वाहतात

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

Sharing is caring!

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-15th July_3.1