Marathi govt jobs   »   Maharashtra State GK Quiz

Maharashtra State GK Quiz

Maharashtra State GK Quiz_2.1

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. आपण एमपीएससी आणि इतर परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला क्विझ देण्याचे महत्त्व माहित असलेच पाहिजे. बर्‍याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुरेसे तास दिले जात असतानाही त्यांना या परीक्षांची पूर्तताही करता आली नाही कारण ते त्यांचे परीक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत आणि संशोधन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या संबंधित विषयाची किंवा विषयाची क्विझ देणे कारण आपण या मार्गाने कव्हर करू शकता कमी वेळात जास्तीत जास्त विषय.  दैनिक क्विझ देऊन तुम्ही तुमच्या तयारीची पातळी तपासू शकता .महाराष्ट्र राज्य संदर्भात आपला एकूण किती अभ्यास झालेला आहे ह्याची पूर्तता करण्यासाठी घेऊन येत आहोत Maharashtra State GK Quiz प्रश्न व संपूर्ण मराठीत स्पष्टीकरणासह.

 

Q1. चेनईजवळ एन्नोर हे बंदर नव्याने विकसित झालेआहे. हे देशातील ……. वे मोठे बंदर असून पूर्व किनाऱ्यावरील….. वे मोठे बंदर आहे.
(a) 12 व 6
(b) 8 व 20
(c) 22 व 6
(d) 4 व 9

 

Q2. भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती?
(a) हिमसागर एक्सप्रेस-जम्मूतावी ते कन्याकुमारी
(b) विवेक एक्सप्रेस – डिग्रुगढ ते कन्याकुमारी
(c) टेन जम्मू एक्सप्रेस – तिरूनेल्वेली ते जम्मू
(d) नवयुग एक्सप्रेस मालोर ते जम्मू

 

Q3. खालील नमुद जिल्ह्यांचे घरगुती चिजेच्या दरडोई वापरा प्रमाणे उतरत्या क्रमाने क्रम लावा:
1. नागपूर जिल्हा
2. अहमदनगर जिल्हा
3. वर्धा जिल्हा
3. पूणे जिल्हा
5. ठाणे जिल्हा
पर्यायी उत्तरे :
(a) 4, 5, 2, 1, 3
(b) 5, 4, 1, 3, 2
(c) 5, 4, 2, 1, 3
(d) 5, 2, 4, 1, 3

 

Q4. योग्य जोड्या जुळवा.
खनिजे                   स्त्रोत जिल्हे
1. दगडी कोळसा (i) कोल्हापूर
2. चूनखडी          (ii) भंडारा
3. मँगनीज           (iii) नांदेड
4. बॉक्साईट         (iv) वर्धा
पर्यायी उत्तरे :
(a) iv iii ii i
(b) i ii iii iv
(c) ii iii iv i
(d) iii iv i ii

 

Q5. महाराष्ट्रातील बॉक्साईट खनिजसंपत्तीचे मुख्यक्षेत्रे कोणती?
1. सिंधुदुर्ग-रत्नागिरी
2. नागपूर-भंडारा
3. कोल्हापूर-ठाणे
4. गोंदिया -गडचिरोली
पर्यायी उत्तरे :
(a) 1 आणि 2 बरोबर ओहत
(b) 2 आणि 4 बरोबर आहेत.
(c) 1 आणि 3 बरोबर आहेत.
(d) 2 आणि 3 बरोबर आहेत

.
Q6. खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो?
(a) अन्थ्रासाईट
(b) बिटूमिनस
(c) लिग्नाईट
(d) पीट

 

Q7. 1. महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 22% क्षेत्रात खनिजसंपत्ती आढळते. हयाची ही दोनच मुख्य क्षेत्रे आहेत.
2. पूर्व विदर्भात, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया, तट कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व कोल्हापूर अशी क्षेत्रे आहेत.
पर्यायी उत्तरे :
(a) 1 आणि 2 बरोबर
(b) 1 बरोबर 2 चूक
(c) 1 चूक 2 बरोबर
(d) 1 आणि 2 चूक

 

Q8. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे?
1. कोल्हापूर – लघु इंजिनिअरिंग उद्योग
2. बल्लारपूर – कागद निर्माण उद्योग
3. सोलापूर – पावर लूम आणि हातमाग उद्योग .
4. इचलकरंजी – रासायनिक उद्योग
पर्यायी उत्तरे :
(a) 1, 2 आणि 3
(b) 1 आणि 2
(c) फक्त 4
(d) फक्त 1

 

Q9. कोळशांच्या साठयाकरीता ओळखले जाणारे नदी खोरे ——
(a) कृष्णा खोरे
(b) वैनगंगा आणि वर्धा खोरे
(c) पूर्णा खोरे
(d) वैतरणा खोरे

 

Q10. मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीमध्ये युद्धनौका बांधल्या जातात?
(a) इंदिरा गोदी
(b) ससून गोठी
(c) माझगाव गोदी
(d) प्रिन्सेस गोदी

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

 

Solutions
S1. Ans.(c)
Sol. स्पष्टीकरण :- एन्नोर हे देशातील सर्वात मोठे 12 वे तर पूर्व किनाऱ्यावरील 6 वे मोठे बंदर आहे. हे पहिलेच महामंडळीय बंदर अहे एन्नोर बंदर चेन्नई जवळ तामिळनाडू येथे आहे. तामिळनाडूमध्ये तुतिकोरीन व चेन्नईसहीत आता तीन मोठी बंदरे आहेत.

 

S2. Ans.(b)
Sol. स्पष्टीकरण – विवेक एक्सप्रेस दिब्रूगड ते कन्याकुमारी ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे तसेच जगातील 9 वा लांब पल्ल्याचा हा रेल्वेमार्ग आहे. भारतात यापूर्वी हिमसागर एक्सप्रेस [जम्मू तावी ते कन्याकुमारी (3745 किमी)] ही सर्वांत लाब पल्ल्याची रेल्वे होती. स्वामी विवेकानंदांच्या 150 व्या जन्मदिनानिमित्त या रेल्वेमार्गाला "विवेक एक्सप्रेस’असे नामकरण करण्यात आले, लांबी 4286 किमी.

 

S3. Ans.(b)
Sol. विश्लेषण :
महाराष्ट्रातील विजेची स्थापित क्षमता :
1. खाजगी क्षेत्र – 57 %
अ) पारंपरिक – 36 % ब) नविकरणीय 51%
2. सार्वजनिक क्षेत्र – 36 %
3. सार्वजनिक-खाजगी क्षेत्र – 6.9 %
क्षेत्रनिहाय विजेचा वापर (अनुक्रमे) :
1. औद्योगिक 2. कृषी
3. घरगुती 4. वाणिज्यिक
विभागानुसार एकूण विजेचा वापर (अनुक्रमे)
1. कोकण. 2. पुणे 3. औरंगाबाद
4. नाशिक 5. नागपूर 6. अमरावती

 

S4 Ans.(a)

Sol. विश्लेषण :
दगडी कोळसा : काळा हिरा असे संबोधले जाते. उद्योगधंद्यांची जननी असेही म्हटले जाते.महाराष्ट्रामीधल दगडी कोळसा हा अकोकक्षम आहे. स्तरीत खडकाच्या प्रकारात आढळतो.
मँगनीज:- नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग. मँगनीजचा वापर लोह व स्टील उत्पादनात, पॅट उद्योग, कीटकनाशके, पेस्टीसाईट, फोटोग्राफी, कोरड्या बॅटरी इत्यादी ठिकाणी होतो.
बॉक्साईट:- कोल्हापूर, रायगड, सातारा, रत्नागीरी, ठाणे(पालघर), सांगली. महाराष्ट्राचा बॉक्साईट उत्पादनात
भारतात तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राचा भारतात बॉक्साईट उत्पादनात वाटा १२% एवढा आहे.

 

S5. Ans.(c)
Sol. विश्लेषण : बॉक्साईट:- कोल्हापूर, रायगड, सातारा, रत्नागीरी, ठाणे(पालघर), सांगली महाराष्ट्राचा बॉक्साईट उत्पादनात भारतात तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राचा भारतात बॉक्साईट उत्पादनात वाटा १२% एवढा आहे.

 

S6. Ans.(a)
Sol. विश्लेषण : दगडी कोळशाचे प्रकार (गुणवत्तेनुसार क्रम) : कार्बनच्या प्रमाणाच्या आधारावर कोळशाचे चार प्रकारांत वर्गीकरण केले जाते.
(a) अँश्रासाईट:- यात कार्बनचे प्रमाण 90-95% असते. तसेच पाण्याच प्रमाण 2-5% असते. हा सर्वोत्कृष्ट प्रकारचा कोळ आहे. हा कोळसा अधिक काळ जळत असतो. ह काळा रंगाचा कोळसा असतो. यातून सर्वोधिक ऊर्जा निर्माण होते व ज्वलनातून धूर कमी प्रमाणात बाहे पडतो.
(b) बिट्युमिनस:- यात कार्बनचे प्रमाण 80-85% असते. तसेच पाण्याचे प्रमाण 25-30% असते, यातून देखील अधिक ऊर्जा निर्माण होते, ज्वलनातून धूर कमी प्रमाणात बाहेर पडतो. यापासून कोक नावाचा पदार्थ तयार होतो.
(c) लिग्नाईट :- यात कार्बनचे प्रमाण 65-75% असते. तसेच पाण्याचे प्रमाण 30-35% असते. हा सर्वसाधारण प्रतीचा कोळसा असतो. यात उजेंचे प्रमाण कमी असून ज्वलनातून धूराचे प्रमाण अधिक असते.
(d) पीट :- यात कार्बनचे प्रमाण 30-50% असते. तसेच पाण्याचे प्रमाण 35-45% असते. हा कमी प्रतीचा कोळसा असतो. यात उर्जेचे प्रमाण सर्वात कमी असुन ज्वलनातून अधिक प्रमाणात धूर बाहेर पडतो.
5.कॅनल :- यात कार्बनचे प्रमाण 40% पेक्षा कमी असते. हा निकृष्ट प्रतीचा कोळसा असतो. यापासून डांबर तयार केले जाते.

 

S7. Ans.(c)
Sol. विश्लेषण :
महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती : महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व व नैक्रत्य भागांत एकवटलेली आहे. कारण महाराष्ट्राचा बराचसा भाग बेसाल्ट या अग्निज खडकाचा बनलेला आहे. अग्निज खडकात , खनिजसंपत्ती फारशी आढळत नाही. महाराष्ट्राच्या नैऋत्य भागात जांभा खडक आढळतो. या खडकात बॉक्साईट, मँगनीज यांसारखी खनिज आढळतात. तर पूर्व भागात रूपांतरित खडकात मॅगनीज, चुनखडक, लोहखनिज इ. खनिजे आढळतात. महाराष्ट्रात 12.33 टक्के खनिजसंपत्ती आहे. मात्र, खनिज उत्पादन 4.5 टक्के होते.

 

S8. Ans.(c)
Sol. विश्लेषण :
इचलकरंजी – हे शहर वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. यास महाराष्ट्राचे मँचैस्टर असेही म्हणतात. बल्लारपूर – हा चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका आहे. बल्लारपूर हे कागद उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर – हे शहर सोलापुरी चादरी व टॉवेल यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच महाराष्ट्रातील बिडीसाठी प्रसिद्ध आहे.

 

S9. Ans.(b)
Sol. विश्लेषण :
वैनगंगा आणि वर्धा नदीचे खोरे हे गोदावरी नदीचे उपखोरे म्हणून ओळखले जाते. या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांनी मध्य व पूर्व विदर्भ व्यापला असून महाराष्ट्रातील सर्वात जास्त खनिजसंपत्ती मध्य व पूर्व विदर्भात आढळते. या मध्ये मॅगजीज, चुनखडी क्रोमाईट, डोलामाईट, दगडी कोळसा या सारखी खनिजेआढळतात. कृष्णा गोदावरी खोरे हे नुकतेच रिलायंन्स कंपनीद्वारे हाती घेतलेल्या तेल व तेलवायू शोध व उत्खननासाठी प्रसिद्ध आहे

 

S10. Ans.(c)
Sol. विश्लेषण
1. माझगाव डॉक:
मुख्यालय – मुंबई
सार्वजनिक उद्योग कंपनी मार्फत चालवली जाते. मुख्यतः युद्धनौका बनवल्या जातात. तसेच पाणबुडी, टँकर, गस्ती नौका बनवल्या जातात.
2.ससून डॉक –
मुंबई हार्बर, दक्षिण मुंबई, कुलाबा येथे आहे. मुंबई मध्ये बांधलेली ही पहिली ओली गोदी होती
3.प्रिन्सेस डॉक –
1880 मध्ये मुंबई येथे याची निर्मिती झाली. अर्ध भरतीसंबंधीचा गोदी

 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!