Marathi govt jobs   »   Maharashtra State GK Quiz

Maharashtra State GK Quiz

Maharashtra State GK Quiz_2.1

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. आपण एमपीएससी आणि इतर परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला क्विझ देण्याचे महत्त्व माहित असलेच पाहिजे. बर्‍याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुरेसे तास दिले जात असतानाही त्यांना या परीक्षांची पूर्तताही करता आली नाही कारण ते त्यांचे परीक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत आणि संशोधन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या संबंधित विषयाची किंवा विषयाची क्विझ देणे कारण आपण या मार्गाने कव्हर करू शकता कमी वेळात जास्तीत जास्त विषय.  दैनिक क्विझ देऊन तुम्ही तुमच्या तयारीची पातळी तपासू शकता .महाराष्ट्र राज्य संदर्भात आपला एकूण किती अभ्यास झालेला आहे ह्याची पूर्तता करण्यासाठी घेऊन येत आहोत Maharashtra State GK Quiz प्रश्न व संपूर्ण मराठीत स्पष्टीकरणासह.

 

MAHARASHTRA STATE GK QUIZ

 

Q1. जोडया लावा.
स्तंभ – I.                                 स्तंभ – II
(पर्यटण ठिकाण)                    (तालुका)
1. अकलोली उष्ण पाणी झरे.  (i) मोखाडे
2. सूर्यमाळ                           (ii) भिवंडी
3. गणेश मंदिर                      (iii) अंबरनाथ
4. अंबरेश्वर मंदिर.                 (iv) टिटवाळा
पर्यायी उत्तरे :
(a) iv iii ii i
(b) i ii iv iii
(c) ii i iv iii
(d) ii iii iv i

Q2. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
(a) मुंबई
(b) कोल्हापूर
(c) पुणे
(d) नागपूर

Q3. पुणे जिल्ह्यातील कोणते किल्ले पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत?
1. वनदूर्ग वासोटा
2. शिवनेरी
3. राजमाची
4. प्रतापगड
5. हरिश्चंद्रगड
पर्यायी उत्तरे :
(a) 1, 3
(b) 2, 3
(c) 3, 5
(d) 4, 5

Q4. खालील दोन विधान/विधाने कोणते अयोग्य आहे/ आहेत?
1. छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई हे भारतातील दुसरे व्यस्त एयरपोर्ट आहे.
2. वरील एअरपोर्ट दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट सहित दक्षिण आशियाचा एक तृतीयांश हवाई वाहतूक हाताळतात.
पर्यायी उत्तरे :

(a) केवळ (a)
(b) केवळ (b)
(c) न (a) व न (b).
(d) दोन्ही (a) व (b)

Q5. खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील अयोग्य
जोडी ओळखा.
(a) नदी परिक्रमा पर्यटन – कोलाड
(b) आदिवासी निवास – कडूस
(c) भू-भोौतिक पर्यटन – सावंतवाडी
(d) स्कयुबा डायव्हिंग – तारकर्ली

Q6. फ्लेमिंगो (रोहित) पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात?
(a) थळघाट
(b) बोरघाट
(c) माळशेज घाट
(d) खंबाटकी घाट

Q7. पुढील दोन विधनांपैकी कोणते योग्य आहे?
1. माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठे अभयारण्य आहे.
2. इतक्यात या अभयारण्याचे क्षेत्र वाढवले गेले आहे माळढोक पक्ष्यांच्या. संख्येतील वाढीमुळे नव्हे तर सर्वव्यापी काळवीटांमुळे.
पर्यायी उत्तरे :
(a) केवळ 1
(b) केवळ 2
(c) दोन्ही
(d) एकही नाही

Q8. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
1. महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत.
2. वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.
पर्यायी उत्तरे :
(a) केवळ 1
(b) केवळ 2
(c) दोन्ही 1 आणि 2
(d) एकही नाही

Q9. नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अॅथोरिटीच्या च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यांचा उतरत्या क्रमाचा योग्य पर्याय निवडा:

(a) कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र
(b) उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र , तामिळनाडू
(c) मध्यप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र
(d) कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्यप्रदेश

Q10. गेंडयाच्या शिंगाचा प्रमुख औषधीयुक्‍्त उपयोग काय समजला जातो?
(a) कर्करोगावर औषध
(b) लैंगिक इच्छा वाढविणे
(c) रक्‍त शुद्धी
(d) रेचक

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

 

S1. Ans.(c)
Sol. विश्लेषण :
अंबरेश्वर मंदिर – ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ येथे प्रसिद्ध शिवालय आहे.
जागृत महागणपती ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे हे प्रसिद्ध मंदिर आहे.
अकलोली, सालीवली, गणेशपुरी, वज़ेश्वरी ही चारही गरम पाण्याची झरे ठाणे जिल्ह्यातील (भिवंडी)
आहेत
सूर्यमाळ हे एक मोखाडा तालुका (पालघर)मधील थंड हवेचे ठिकाण आहे. त्याजवळ सिद्धीविनायक मंदिर
प्रसिद्ध आहे.

 

S2. Ans.(c)
Sol. विश्लेषण :
पुणे:
देशातील नवव्या क्रमांकाचे जास्त लोकसंख्येचे शहर,
मुठा नदीवर वसलेले आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे संबोधले जाले. शिक्षणासाठी पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते.
मुंबई – महाराष्ट्राची राजधानी :
2011च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 124 लाख
आहे. (मुंबई शहर-उपनगर)
2008 मध्ये अल्फा वर्ल्ड सिटी असे म्हटले गेले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत मुंबईतील
तीन स्थळांची नोंद आहे.
1. घारापुरी लेणी 2. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
3. The victorian gothic and art Deco Ensembles
of Mumbai.
कोल्हापूर :
कुस्ती या खेळाचे पारंपरिक जतन

गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिध्द.
कोल्हापूर कातडी चप्पल प्रसिद्ध.
पंचगंगा नदीवर वसलेले आहे.

 

S3. Ans.(2)
विश्लेषण :
पुणे
कठीणगड (तुंग), वितंडगड (तिकोना), धनगड, विसापूर, तोरणा (प्रचंडगड), पुरंदर, राजगड, राजमाची,
रोहिडेश्वर, रायरेश्वर, रोहिडा (विचित्रगड), लोहगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड (कोंढाणा), पर्वतगड
(हडपसर), प्रचंडगड, भैरवगड, इत्यादी.
सातारा :
अजिंक्यतारा, कल्याणगड, प्रतापगड, पांडवगड, मकरंदगड, वासोटा, सज्जनगड, वारगड, महिपतगड,
चंद्रगड, रसाळगड, सुमारगड, संतोषगड (ताथवडा), वसंतगड.
अहमदनगर :
कळसुबाई, बहादूरगड, रतनगड, हरिश्चंद्रगड, अहमदनगरचा गड, पेडगाव, खर्डा, मुंगी.

 

S4. Ans.(b)
Sol. विश्लेषण :
छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल विमानतळ, मुंबई हे भारतातील दुसरे व्यस्त एअरपोर्ट आहे.
मुंबई एअरपोर्ट, दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टसहित, दक्षिण अशियाचे एकूण 1/2 हवाई
वाहतूक हाताळतात.
भारतातील पहिली दहा सर्वात जास्त व्यस्त एअर पोर्टस
1.इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, दिल्ली
2.छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई
3.काम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट, बंगलोर
4.चेन्नई इंटरनॅशनल एअरपोट, चेन्नई
5.नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट, कोलकाता
6.राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, हैद्राबाद
7.कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट, केरळ
8.सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट, अहमदाबाद 9.पुणे एअरपोर्ट, पुणे
10 .दाबोलिन/गोवा एअरपोर्ट, गोवा.

 

S5. Ans.(c)
Sol. विश्लेषण :
सावंतवाडी :- शिल्पग्राम म्हणून प्रसिद्ध. लाकडी खेळणीसाठी/समुद्र किनारा प्रसिद्ध.
आजरा, कोल्हापूर – रोझरी चर्च
चिंचोली, सोलापूर – होजीअरी
मुलचेरा, गडचिरोली – पहिल्या शतकातील मंदिराचे अवशेष
झाडपापडा, गडचिरोली – डोंगरातील गुहेत आदिवासी दैवत आढळतात
दरकेसा, गडचिरोली – डोंगरातील गुहा प्रसिद्ध

बत्तीस शिराळा, सांगली – जिवंत नागांची नागपंचमी
फतिमा, रायगड – ख्रिश्चनधर्मियांची वार्षिक यात्रा
ठाणेगाव, गडचिरोली – शंकराचे हेमाडपंथी मंदिर
वणी, यवतमाळ – चुन्याच्या व्यापाराचे केंद्र
येवले, नाशिक – पैठणी /पितांबर
रावळगाव, नाशिक – चॉकलेटचा उद्योग
सातपाटी, पालघर. – मच्छीमारी प्रशिक्षण संस्था
बाळापूर, अकोला – मिर्झाराजा जयसिंगची छत्री व किल्ला बाळापूर देवीचे मंदिर
शैंडूरजनाघाट, अमरावती – विदर्भातील सर्वात मोठी हळद व मिरची बाजारपेठ
मेळघाट, अमरावती – कोकर आदिवासी जमात

 

S6. Ans.(c)
Sol. विश्लेषण :
फ्लेमिंगो (रोहित) पक्षी : उष्ण कटिबंधात आढळतात.
भारतात कच्छच्या रणात आढळतात.
कच्छला रोहित पक्षांचे शहर म्हणतात.
वैशिष्ट्यपूर्ण चोच- चिखलातील खाद्य खाते.
सहा जातींपैकी भारतात फी-मायनर (लहान) सापडते.
आढळ :
1. नांदूर, मधमेश्वर अभयारण्य (नाशिक)
2. माळशेज घाट, नाशिक
3. उजनी धरण, पुणे

 

S7. Ans.(a)
Sol. विश्लेषण :
माळढोक अभयारण्य :-
स्थापना – 1989
क्षेत्रफळ – 1229 चौ. किमी.
विस्तार – अहमदनगर-सोलापूर
प्रसिद्ध – माळढोक पक्षी, काळवीट, हरीण.
माळढोक अभयारणला नानज म्हणूनही ओळखले जाते.
सुरूवातीचे क्षेत्रफळ 8486 चौ. किमी होते. ते आता 1229 कमी करण्यात आले आहे.
सर्वाधिक अभयारण्ये – अमरावती विभाग
सर्वात कमी अभयारण्ये – औरंगाबाद विभाग

 

S8. Ans.(a)
Sol. विश्लेषण :-
महाराष्ट्रातील वने
महाराष्ट्रात साधारणतः 62 टक्के उष्ण कटीबंधीय शुष्क
पानझडी अरण्य आहेत
तसेच उष्णकटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण
कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये प्रत्येकी 17 टक्के आहेत.

म्हणजेच हे दोन्ही प्रकार एकत्रितपणे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्याच्या निम्म्यापेक्षा थोडी जास्त
आहेत.
उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने :- या वनांचे पट्टे सलग नसून ती विरळ वृक्षराईच्या स्वरूपात आहेत.
शेतीसाठी सर्वाधिक वृक्षतोड शुष्क पानझडी वनांची झाली आहे. उदा. साग, ऐन, तिवस, खैर, धावडा,
रोहन, सावर, शेंद्री.
दमट/आर्द्र पानझडी अरण्ये (मान्सून वने) : महाराष्ट्रात सुमारे 125 सेमी ते 200 सेंमी पर्जन्य विभागात
समुद्रसपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीपर्यंत आर्द्र पानझडी वने आहेत.
उष्ण कटीबंधीय काटेरी खुरटी वने :
पठारावरील पर्जन्यछायेच्या प्रदेशात कमी पाऊस व सामान्य मृदांमुळे काटेरी-खुरट्या विरळ वनस्पतींची
वाढ होते.
50 सेंमी.पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात आढळतात.

 

S9. Ans.(a)
Sol. विश्लेषण :
वाघांची संख्या :
व्याघ प्रकल्प योजना भारतात सर्वप्रथम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात सुरू झाली.
जनक व संचालक : कैलास सांकला आहेत. त्यांना टायगर मॅन ऑफ इंडिया म्हणतात.
केंद्र सरकारने 1972 मध्ये देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघाची निवड केली.
एप्रिल 1973 व्याघ्र प्रकल्पाची घोषणा – देशात नऊ ठिकाणी वाघांची संरक्षित क्षेत्रे म्हणून जाहीर. त्यापैकी
पहिला महाराष्ट्र व्याघ्रप्रकल्प मेळघाट होता.
भारतात वाघांची संख्या – 2226. (2014 नुसार) – जगाच्या 70 टक्के.
महाराष्ट्रातील वाघांची संख्या – 190 (2014 नुसार)
राज्याचा क्रम (संख्या 2014 नुसार) :
1.कर्नाटक – 406
2.उत्तराखंड – 346
3. मध्यप्रदेश – 308
4. तमिळनाडू – 229
5. महाराष्ट्र – 190 (12.6 टक्के)

 

S10. Ans.(b)
Sol. विश्लेषण :
गेंड्याच्या शिंगांचा प्रमुख औषधीयुक्त उपयोग : लैगिंक इच्छा वाढविणे – Aphrodisiac यामध्ये
अशियामध्ये वायग्राच्या क्रूड स्वरूपात गेंड्याचे शिंग विकले जाते. इतर काही आजारांमध्येही त्याचा
उपयोग केला जातो, गाऊट (gout) , ताप, वात, डोकेदुखी, अन्नविषबाधा इ.
कर्करोगावर औषध : पारंपरिक चीनी औषधांमध्ये आर्टिमिसिनन (Artemisinin) आणि अॅस्ट्रग्लस
झुडुपांचे मुळ (Astraglas) या औषधी वनस्पतींचा उपयोग केला जातो.

रक्त शुद्धी : रक्त शुद्धी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक वनस्पतींमध्ये आवला, मलबेरी, कडुनिंब,
अमरलवेल, दातुरा इत्यादी वनस्पतींचा उपयोग
केला जातो.
रेचक (Luxative) : रेचक हे असे पदार्थ आहेत,
मल बाहेर सोडण्यासाठी वापरले जातात.
सोनमुखी ही एक रेचक औषधी वनस्पती आहे

 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Maharashtra State GK Quiz_3.1