Table of Contents
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: दि महाराष्ट्र महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लि. मुंबईने कनिष्ठ लिपील संवर्गातील एकूण 19 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 जाहीर केली आहे. सदर भरतीची अधिकृत अधिसुचना दिनांक 04 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार आपले अर्ज दिनांक 04 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 ची अधिसुचना, रिक्त पदे, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: विहंगावलोकन
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ लिपिक या पदाची भरती होणार आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | बँक नोकरी |
कार्यालय | दि महाराष्ट्र महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लि. मुंबई |
भरतीचे नाव | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 |
पदाचे नाव |
कनिष्ठ लिपिक |
एकूण रिक्त पदे | 19 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.mucbf.in/ |
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 अधिसूचना | 04 नोव्हेंबर 2023 |
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात | 04 नोव्हेंबर 2023 |
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
17 नोव्हेंबर 2023 |
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 अधिसूचना
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023ने दिनांक 04 नोव्हेंबर 2023 रोजी कनिष्ठ लिपिक या पदासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण ममहाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 ची अधिसुचना डाऊनलोड करू शकता.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 अधिसूचना PDF
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: रिक्त पदाचा तपशील
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ लिपिक च्या एकूण 19 रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया नागपूर जिल्ह्यासाठी होणार आहे.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: रिक्त पदे |
|
पदाचे नाव | रिक्त पदे |
कनिष्ठ लिपिक | 19 |
एकूण | 19 |
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: अर्ज शुल्क
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: अर्ज शुल्क | |
पदाचे नाव | अर्ज शुल्क |
कनिष्ठ लिपिक | रु. 944 |
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: पात्रता निकष
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदासाठी लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता:
- कनिष्ठ लिपिक:
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
दि. 01.11.2023 रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेद्वार अर्ज करण्यास पात्र असतील.
परीक्षेचा निकाल जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अद्ययावत केला गेला असेल किंवा वेब- आधारित प्रमाणपत्र प्रदान केले गेले असेल, तर उमेद्वाराने त्यासंदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील आणि त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्याने सदरहू उमेद्वार परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून स्वाक्षरी करणे आवश्यक राहील.
वयोमर्यादा:
01.11.2023 रोजी किमान 22 वर्षे आणि कमाल 35 वर्षे.
प्राधान्य:
- वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर यांना प्राधान्य देण्यात येईल.
- कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: अर्ज करण्यासाठी लिंक
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 असून उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज करू शकता.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 ऑनलाइन अर्जाची लिंक
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023: निवड प्रक्रिया
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023 साठी सविस्तरपणे निवड प्रक्रिया खाली दिलेली आहे.
1. ऑफलाईन परीक्षा :
कनिष्ठ लिपिक पदाकरिता 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल. बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांमध्ये गणित, इंग्रजी व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौधिक चाचणी, बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. तद्नंतर 100 पैकी प्राप्त गुणांचे 90 च्या गुणोत्तरामध्ये रुपांतर करण्यात येईल.
2. कागदपत्रके पडताळणी:
उमेद्वारास ऑफलाईन परीक्षेतील गुणांच्या उतरत्या क्रमवारीनुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक कागदपत्रके पडताळणीसाठी बोलविण्यात येईल. त्यावेळी उमेद्वाराने मूळ कागदपत्रके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रके पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेद्वारास बँक धोरणाप्रमाणे बँकेकडून मुलाखतीस बोलविण्यात येईल.
3. मुलाखत:
कनिष्ठ लिपिक पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेद्वारांना बँकेच्या धोरणानुसार भरावयाचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेचे गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलविण्यात येईल. मौखिक मुलाखतीकरिता 10 गुण (शैक्षणिक पात्रतेकरिता 5 गुण व मौखिक मुलाखतीकरिता 5 गुण) राहतील. मुलाखतीस गैरहजर राहिल्यास संबंधित उमेदवार अंतिम निवडीस (परीक्षेत उत्तीर्ण झालेला असला तरी) पात्र राहणार नाही.
4. उमेद्वाराची अंतिम निवड सूची:
उमेद्वाराचे ऑफलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |