Table of Contents
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे | Maharshi Vitthal Ramji Shinde
| Maharishi Vitthal Ramji Shinde: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाज सुधारणेबरोबरच बेधडक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा हिरिरीने भाग घेतला, त्यामुळे त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. भारतीय समाजातील जातिव्यवस्था ही भारताच्या विकासाच्या व सर्वांगीण प्रगतीतील मोठा अडथळा आहे, हे ओळखून त्यांनी आयुष्यभर जातिव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व व कार्य बहुआयामी होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे | Maharshi Vitthal Ramji Shinde : विहंगावलोकन
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे | Maharshi Vitthal Ramji Shinde याचे विहंगावलोकन खाली दिले आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे | Maharshi Vitthal Ramji Shinde : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC Gazetted Civil Services Exam 2024 व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
विषय | महाराष्ट्रातील समाज सुधारक |
लेखाचे नाव | महर्षी विठ्ठल रामजी शिंदे | Maharshi Vitthal Ramji Shinde |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाज सुधारणेबरोबरच बेधडक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा हिरिरीने भाग घेतला, त्यामुळे त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला.
- भारतीय समाजातील जातिव्यवस्था ही भारताच्या विकासाच्या व सर्वांगीण प्रगतीतील मोठा अडथळा आहे, हे ओळखून त्यांनी आयुष्यभर जातिव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व व कार्य बहुआयामी होते.
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटकातील जमखिंडी येथे झाला.
- त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव यमुनाबाई होते.
- ‘प्रार्थना समाजा’चे प्रचारक व अस्पृश्य वर्गाची सुधारणा व्हावी यासाठी अनेक प्रयत्न करणारे महर्षी वि. रा. शिंदे होत.
- त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते.
- महर्षी वि.रा.शिंदे यांचे मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते.
- फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी बी. ए. ची पदवी मिळविली.
- महर्षी वि. रा. शिंदे यांना डेक्कन मराठा एज्युकेशन असोशिएशनने शिक्षणाकरीता दरमहा 10 रु. दिले.
- 12 ऑक्टोबर 1906 रोजी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना मुंबई येथे केली. त्याच दिवशी एल्फिन्स्टन रोड येथे पहिली शाळा सुरू केली.
- तसेच ठाणे, मालवण, अमरावती, अकोला इ. ठिकाणी शाळा व वसतिगृहे सुरू केली.
- 1901 – अमिरेकेमध्ये सर्व धर्माचा तैलनिक अभ्यास करण्यासाठी प्रार्थना समाजाकडून त्यांची निवड झाली.
- 1912 मध्ये पुण्यात फर्ग्युसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राम्हण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम घेतला.
- मॅचेस्टर मध्ये त्यांनी हिंदूस्थानातील सामाजिक सुधारणेची जादू हा निबंध वाचला.
- 1917 मध्ये मुंबई येथे नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेऊन डॉ. आंबेडकर यांना मानपत्र दयावे अशी मागणी केली.
- 1904 साली आखिल भारतीय आस्तिक परीषदेचे सचिव बनले.
- प्रार्थना समाजातर्फे प्रकाशित होणाऱ्या सुबोध पत्रिकेत ते लेख लिहीत.
- 1905 साली मुंबईत ‘तरुण ब्राम्ह संघ’ नावाची संस्था स्थापन.
- 1934 च्या बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते.
- राजकीय, सामाजिक क्षेत्रात व अस्पृश्यांच्या प्रश्नांसंदर्भात जागृती करण्याचे प्रयत्न त्यांनी केले.
- अशा प्रकारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मोठ्या निष्ठेने व निःस्पृहपणे अस्पृश्यता निवारण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण उद्धार व विकासासाठी अभूतपूर्व कार्य केले.
- 1901 मध्ये मुंबईतील प्रार्थना समाज व कलकत्यातील ब्राम्हो समाज यांच्या साह्याने इंग्लंड मधील मॅनचेस्टर येथे धर्म शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ते गेले.
- अस्पृश्यांच्या मदती सोबतच शेतकरी, शेतमजूर यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली.
- स्त्रियांना सक्तीचे व मोफत शिक्षण याची जागृती निर्माण केली.
- 1905 साली महर्षी शिंदे यांनी पुणे येथे अस्पृश्य मुलांसाठी रात्रशाळा सुरु केल्या.
- महर्षी शिंदे विलायतेत सर्व धर्माचे अध्ययनासाठी गेले असताना बौद्ध धर्माचा व पाली भाषेचा त्यांनी विशेष अभ्यास केला. त्यांनी 1910 साली पुण्यात ‘बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार’ या विषयावर जाहीर व्याख्यान दिले.
- ‘मी बौद्ध आहे’ असे ते म्हणत, बुद्ध जयंती देखील पाळीत. पण केवळ प्रत्यक्ष बौद्ध धर्मात प्रवेश केल्यामुळे दलितांचा प्रश्न सुटेल असे त्यांचे मत नव्हते.
- महर्षी वि. रा. शिंदे यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिल या लेखकाच्या ऑन लिबर्टी व सबजेक्ट ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव होता.
- महात्मा फुले यांना शिंदे हे गुरुस्थानी मानत असे.
- डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया (1906), कौटुंबिक उपासना मंडळ (1924), ब्राह्मोसमाज (1933) या संस्थांची स्थापना त्यांनी केली.
- 1898 साली सातारा येथे प्रार्थना समाजाची दिक्षा घेतली.
- 1930 ला प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून त्यांची निवड झाली. बेळगाव येथून भारत दौरा सुरु केला.
- 14 मार्च, 1907 रोजी त्यांनी सोमवंशीय मित्र समाजाची स्थापना केली. अस्पृश्य लोकांनी स्व-उद्धारार्थ धार्मिक व सामाजिक सुधारणा करवून घेणे हा त्यामागचा हेतू होता.
- साधारणपणे 1903 ते 1910 या काळात त्यांनी एकेश्र्वरवादी तत्त्वज्ञानाचा प्रचार करत प्रार्थना समाजाचे कार्य केले.
- 1910 पासून त्यांनी प्रार्थना समाजाशी असलेले संबंध संपवले.
- 1911 मध्ये मुरळी सोडण्याच्या पद्धतीच्या विरोधामध्ये त्यांनी प्रतिबंधक परिषद बोलावली.
- महर्षी शिंदे यांनी मुरळी सोडणे या प्रथेचा विरोध केला.
- 1920 ला नागपूर येथे त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परीषद बोलावली.
- अहमदनगरजवळील भिंगार या खेडेगावात जन्मलेल्या हजारो अस्पृश्यांसमोर अस्पृश्योध्दासाठी झटण्याची प्रतिज्ञा शिंदेनी केली. या कार्यात त्यांना त्यांच्या भगिनी जनाक्का शिंदे यांची मदत झाली.
- भाई माधवराव बागल यांनी महर्षी शिंदे यांचे वर्णन करताना म्हटले की, ‘त्यांना पाहताच त्यांचे पाय मला धरावेसे वाटत असे.
- एक सत्याग्रही म्हणून ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. अनेक विविध संस्थांसह त्यांनी राष्ट्रीय मराठा संघ, समता सैनिक दल, बहुजन समाज पक्ष या संस्था-संघटनांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्य केले.
- मुरळीची प्रथा, अस्पृश्यांना मंदिर प्रवेश, होळी उत्सवातील बीभत्स प्रकार या सर्वच समस्यांबाबत त्यांनी लक्षणीय कार्य केले.
- शेतकर्यांच्या समस्याही त्यांनी अभ्यासल्या, त्यासाठी शेतकर्यांच्या संघटनाचाही त्यांनी प्रयत्न केला.
- 2 जानेवारी 1944 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.
ग्रंथसंपदा:
- महर्षी शिंदे यांनी आपल्या लेखनातून समाजसुधारणेचे विचार मांडले. त्यांनी ‘उपासना’ या मासिकातून व ‘सुबोधचंद्रिका’ या साप्ताहिकातून लेखन केले.
- ‘माझ्या आठवणी व अनुभव’ नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे.
- भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न -1933
- Untouchable of India
- History of Parihars
- माझ्या आठवणी व अनुभव (Autobiography)
- भागवत धर्माचा विकास
- मराठ्यांची पूर्वपीठिका
- कानडी – मराठी संबंध
- कोकणी – मराठी संबंध
- Thiestic directory
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.