Marathi govt jobs   »   Job Notification   »   MahaTAIT Exam Date Notification

MahaTAIT परीक्षेच्या तारखेची सूचना, MahaTAIT Exam Date Notification

MahaTAIT Exam Date Notification: स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवक भरती प्रक्रिया यापूर्वी भरतीपूर्व निवड परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येत होती. सदर परीक्षा प्रक्रिया 2017 साली रद्द करून स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शैक्षणिक संस्थांतर्गत असलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक भरती प्रक्रिया अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची वैशिष्टय विचारात घेवून त्यामधील गुणांच्या आधारे घेण्यात आली. त्या परीक्षेचे नाव Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MahaTAIT Exam Date Notification). या परीक्षेचे आयोजन डिसेंबर 2017 मध्ये करण्यात आले होते. आता पुढील MahaTAIT फेब्रुवारी 2022 होणार आहे.  MahaTAIT ची अधिसूचना कधी येईल, परीक्षेचे स्वरूप काय असेल या संदर्भातली माहिती आपण या लेखात पाहूयात.

MahaTAIT Exam Date Notification | MahaTAIT परीक्षेच्या तारखेची सूचना

MahaTAIT Exam Date Notification: MahaTait Exam Date 2022 महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 कधी होणार याची सर्व परीक्षार्थी वाट बघत होते परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपली असून MahaTait Exam Date 2022 Maharashtra (महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022) ही फेब्रुवारी 2022 मध्ये कोणत्याही सुनियोजित दिवशी आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे MahaTAIT परीक्षा देण्यासाठी आपणास MAHATET किवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 21 नोव्हेंबर 2021 ला होणारी MAHATET ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

पुढच्या MahaTAIT संदर्भात अवर सचिव यांनी आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांना पत्र लिहून महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (MahaTAIT Exam Date Notification) 2022 फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे नियोजन करावे असे कळवण्यात आले आहे. त्यासंबधी PDF खाली देण्यात आली आहे.

MahaTAIT Exam Date Notification PDF

MahaTAIT Exam Pattern | MahaTAIT परीक्षेचे स्वरूप

MahaTAIT Exam Pattern: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MahaTAIT Exam Date Notification) ही पूर्णपणे वस्तुनिष्ट बहुपर्यायी स्वरुपाची असून सदरील चाचणी ही मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषा माध्यमात उपलब्ध असेल. सर्व साधारणपणे परीक्षेचा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा (MahaTAIT Exam Date Notification) अभ्यासक्रम व गुणभार आपणास पुढीलप्रमाणे पाहता येईल.

घटक एकूण प्रश्न एकूण गुण
अभियोग्यता 120 120
बुध्दिमत्ता 80 80
एकूण 200 200

सदरील चाचणी ही एकून 200 प्रश्नांची व 200 गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकांवर आधारित असेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये शेकडा 60% म्हणजेच 120 प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा 40% म्हणजेच 80 प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील.

अभियोग्यता या घटकामध्ये गणितीय क्षमता, तर्क क्षमता, वेग आणि अचूकता, इंग्रजी भाषिक क्षमता,मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/ व्यक्तिमत्व इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येईल.

MAHATET 2021 प्रवेशपत्र जाहीर

Key Points of MahaTAIT | MahaTAIT चे वैशिष्टे 

Key Points of MahaTAIT: अभियोग्यता चाचणी परीक्षेची वैशिष्टे खालीलप्रमाणे:

  • अभियोग्यता चाचणी शिक्षण सेवक निवड प्रक्रिया सांगणकीय प्रणालीच्या आधारे करण्यात येणार असल्याने मानवी हस्तेक्षेपास वाद राहणार नाही.
  • या कार्यपद्धतीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था” (यापुढे “संस्था” असे वाचावे) यांना त्यांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरताना आरक्षण विषयक बाबी विचारात घेवून पदांची जाहिरात, शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या संगणकीय प्रणाली किमान कालावधीकरिता प्रसिद्ध करावे लागेल.
  • अभियोग्यता चाचणीच्या मध्यामाध्यमातून उमेदवारस त्याच्या गुणांमध्ये वाढ करण्याची संधी त्याच्या सेवाप्रवेश वयोमर्यादित 5 वेळा उपलब्ध होईल.
  • अभियोग्यता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार नाही सदर चाचणी परीक्षा दिलेल्या राज्यातील कोणत्याहि उमेदवारास, शास उच्या संगणकीय प्रणालीमध्ये प्रसिद्ध केलेल्या स्थानिक स्वराज संस्था/ खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जाहीरातीस अनुसरून अर्ज करता येईल.

[Download] MAHTET Exam Previous Year Question Papers PDF

Important Topics for MahaTAIT | MahaTAIT परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे घटक

Important Topics for MahaTAIT: फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या MahaTAIT परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे घटक खालीलप्रमाणे आहे.

गणितीय क्षमता: गणितीय क्षमतेत मूलभूत गणितीय कौशल्य योग्यपणे वापरता येतात किंवा नाही याचा पडताळा घेतला जाणार आहे यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्या, सरासरी, अपूर्णांक, लसावि मसावि, सरळ व्याज, चक्रवाढव्याज, शेअर, रास, वयवारी इत्यादी प्रश्न विचारले जातील.

गणित ही वेगाने अचूकरित्या सोडवता येण्यासाठी सराव आणि सराव हाच एक उपाय आहे. या घटकांवर जेवढे अधिक प्रभुत्व तेवढे परीक्षेत यशाची शक्यता अधिक आहे.

तार्किक क्षमता: एखादी समस्या सोडवण्यासाठी तर्क करणे अनुमान करणे निष्कर्ष काढणे परस्पर संबंध जोडने या बाबींच्या तार्किक क्षमतेत समावेश आहे. यावरील प्रश्न सोडवताना विधाने विचारात घेऊन विचारपूर्वक सोडवावेत.

वेग व अचूकता: एका विशिष्ट कालावधीत वेगाने व अचूकतेने प्रश्न सोडविण्याचा क्षमतेचे मापन या घटकात केले जाणार आहे. यावरील प्रश्न रेल्वे, नाव, शर्यत, वेग, काळ व अंतर, वाहतुक याच्याशी संबंधित विचारले जाऊ शकतात.

इंग्रजी भाषिक क्षमता: या घटकांतर्गत इंग्रजी भाषेच्या व्याकरणशुद्ध वापर करण्याची क्षमता, इंग्रजीच्या आकलनपर उतान्यावर आधारीत प्रश्न आणि इंग्रजी व्याकरण यावर आधारित विचारले जातील,

मराठी भाषिक क्षमता: मराठी भाषेच्या सहज, लवचिक व व्याकरणशुद्ध वापर करण्याची क्षमता या घटकात तपासली जाणार आहे. स्पर्धा परीक्षेत तिनारले जातात. अशातील प्रति अमे

अवकाशीय क्षमता: एखादी वस्तू कल्पनेने डोळ्यासमोर फिरवून तिची रचना कशा प्रकारे असेल हे जाणण्याची क्षमता अवकाशीय क्षमतेत समाविष्ट होते

या घटकांतर्गत घन, आकृतीची रचना, आकृत्याचे प्रकार, आकृतीचे विविध भाग परस्परांशी जोडणे, आकृतीची पाण्यातील प्रतिमा, आकृतीची आरशातील प्रतिमा, कागद मुडपून त्याचे इतर भाग ओळखणे इत्यादी प्रश्न या घटकांतर्गत विचारले जातील.

FAQs: MahaTAIT Exam Date Notification

Q1. MahaTAIT 2022 महाराष्ट्र कधी होणार ?

Ans . MahaTAIT परीक्षा 2022 मध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे

Q2. MahaTAIT म्हणजे काय?

Ans. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा

Q3. MahaTAIT परीक्षा कोण देऊ शकते ?

Ans. MahaTAIT 2022 ही परीक्षा TET किंवा CET परीक्षा पास विद्यार्थी देऊ शकतात.

Q4. MahaTAIT 2022 बद्दलचे Update मला कुठे बघायला मिळतील?

Ans. MahaTAIT 2022 बद्दलचे Update आपणास Adda247 मराठी च्या अधिकृत संकेस्थळावर पाहायला मिळेल.

 

Sharing is caring!

MahaTAIT Exam Date Notification | MahaTAIT परीक्षेच्या तारखेची सूचना_3.1

FAQs

Q1. When will MahaTAIT 2022 conducted?

MahaTAIT Exam 2022 will be held in February 2022

What is MahaTAIT?

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test

Who can give MahaTAIT exam?

Students can clear TET or CTET exam.

Where can I get updates about MahaTAIT 2022?

You can check the updates about MahaTAIT 2022 on the official website of Adda247 Marathi.