Marathi govt jobs   »   Job Notification   »   महापारेषण भरती 2023

महापारेषण भरती 2023, विविध पदांसाठी अधिसूचना जाहीर

महापारेषण भरती 2023

महापारेषण भरती 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी महापारेषण भरती 2023 जाहीर झाली आहे. महापारेषण भरती 2023 ही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी व आरक्षणाच्या स्थितीची पुनर्गणना  करण्यासाठी रद्द करण्यात आली होती.परंतु आता या भरती प्रक्रियेची अधिसूचना पुनः एकदा प्रसिद्ध झाली आहे. आज या लेखात आपण महापारेषण  भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती दिली आहे 

महापारेषण भरती 2023: विहंगावलोकन

वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 व विद्युत सहाय्यक व सहाय्यक अभियंता या पदांच्या भरतीसाठी महापारेषण भरती 2023 जाहीर झाली  आहे. महापारेषण भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महापारेषण भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कंपनीचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित  (MahaTransco)
भरतीचे नाव महापारेषण भरती 2023
पदांची नावे
  • वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
  • तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)
  • तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)
  • विद्युत सहाय्यक (पारेषण) (कंत्राटी)
  • सहाय्यक अभियंता
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 जुलेे 2024 
परीक्षा तारीख ऑगस्ट / सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महापारेषण भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

महापारेषण भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याबाबत पदानुसार माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
महापारेषण भरती 2023: पात्रता निकष 
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
  • शिकाऊ उमेदवारी कायदा-1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
  • किंवा
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
  • एकूण 6 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)
  • शिकाऊ उमेदवारी कायदा-1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
  • किंवा
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
  • एकूण 4 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)
  • शिकाऊ उमेदवारी कायदा-1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
  • किंवा
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
  • एकूण 2 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव
विद्युत सहाय्यक (पारेषण) (कंत्राटी)
  • शिकाऊ उमेदवारी कायदा-1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
  • किंवा
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
सहाय्यक अभियंता
  • इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी

महापारेषण भरती 2023 वेतनश्रेणी 

  • वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. 30810-1060-36110-1160- 47710-1265-88190 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
  • तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. 29935-155-34710-1060- 45310-1160-82430 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
  • तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. 29035-710-32585-955-42135- 1060-72875 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
  • विद्युत सहाय्यक (पारेषण) (कंत्राटी) या पदासाठी प्रथम वर्ष – एकत्रित मानधन रुपये 15000/- दरमहा, द्वितीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये 16000/- दरमहा आणि तृतीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये 17000/- दरमहा एवढे राहील.
  • मुळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागु राहतील.
  • सहाय्यक अभियंता – निवडलेल्या उमेदवारास वेतनश्रेणी रु. 49210-2165-60035-2280-119315 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.

महापारेषण भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

महापारेषण भरती 2023: विविध पदांसाठी अधिसूचना जाहीर
पदाचे नाव पदे  अर्ज लिंक  अधिसूचना PDF
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली),तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 417 लिंक PDF
विद्युत सहाय्यक (पारेषण) (कंत्राटी) 2623 लिंक PDF
सहाय्यक अभियंता 428 लिंक PDF

महापारेषण भरती 2023: निवड प्रक्रिया

महापारेषण भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरती साठी इच्छुक उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

महापारेषण भरती 2023: परीक्षेचे स्वरूप 

अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तूनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणीक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Apptitude) यावर आधारित राहील. ऑनलाईन परिक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील:-

महापारेषण भरती 2023: परीक्षेचे स्वरूप 
अ.क्र. विषय/उपविषय  प्रश्न  गुण  कालावधी 
1. वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान 50 110 120 मिनिटे
2. तर्कशक्ती 40 20
3. संख्यात्मक अभियोग्यता 20 10
4. मराठी 20 10
एकूण  130 150

उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती / दंड (Penalty) असेल. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकुण गुणांच्या 1/4 (0.25%) इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि, उमेदवाराने एखादया प्रश्नाचे उत्तर न दिल्यास / रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती / दंड (Penalty) लागणार नाही.

महापारेषण भरती 2023: परीक्षा शुल्क 

महापारेषण भरती 2023 परीक्षा शुल्क खालील तक्त्यात दिला आहे.

महापारेषण भरती 2023:परीक्षा शुल्क
पदाचे नाव खुला प्रवर्ग   इतर प्रवर्ग  दिव्यांग व माजी सैनिक 
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 600 300 परीक्षा शुल्क नाही
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 600 300 परीक्षा शुल्क नाही
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 600 300 परीक्षा शुल्क नाही
विद्युत सहाय्यक (पारेषण) (कंत्राटी) 500 250 परीक्षा शुल्क नाही
सहाय्यक अभियंता 700 350 परीक्षा शुल्क नाही

महापारेषण भरती 2023: वयोमर्यादा  

महापारेषण भरती 2023 वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

महापारेषण भरती 2023:वयोमर्यादा 
पदाचे नाव किमान   कमाल  
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 18 38
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 18 38
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 18 38
विद्युत सहाय्यक (पारेषण) (कंत्राटी) 18 38

  महापारेषण भरती 2023, विविध पदांसाठी अधिसूचना जाहीर_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महापारेषण भरती 2023 भरती कधी जाहीर झाली?

महापारेषण भरती 2023 भरती 19 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

महापारेषण भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती जाहीर झाली आहे?

महापारेषण भरती 2023 अंतर्गत एकूण 2541 पदांची भरती जाहीर झाली आहे.

महापारेषण भरती 2023 बद्दल अपडेट मला कोठे मिळू शकेल?

महापारेषण भरती 2023 बद्दल वेळोवेळी अपडेट आपण या लेखात तपासू शकता.