Table of Contents
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ?
सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील ही अत्यंत मुद्देसूद सिरीज आहे. पाठ्यपुस्तक अभ्यास प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करण्यासाठी ADDA 247 खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज घेऊन आलो आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ADDA247 च्या माध्यमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. या सिरीज मधून संपूर्ण परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज उपयुक्त तसेच यशदायक ठरेल व याने तुमचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच बळ मिळेल. चला तर मग आजचा टॉपिक अभ्यासूया.
भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग
भारताचे खालील पाच प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात.
- हिमालय
- उत्तर भारतीय मैदान
- द्वीपकल्प
- किनारपट्टीचा प्रदेश
- द्वीपसमूह
भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग | महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज PDF डाउनलोड करा
हिमालय
- हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे.
- ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरला आहे.
- भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरला आहे.
- हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो.
- शिवालिक ही सर्वांत दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वांत नवीन (अर्वाचीन) पर्वतरांग आहे.
- शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद् हिमालय (हिमाद्री) व हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत.
- याच पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊ हिमालय) व पूर्व हिमालय (आसाम हिमालय) असेही भाग केले जातात.
उत्तर भारतीय मैदान
- हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे.
- तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान-पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरला आहे.
- हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे दोन विभाग केले जातात.
- अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांग्लादेश मिळून गंगा-ब्रम्हपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
- उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे.
- राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखतात.
- हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे.
- या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयनकार्यातून झालेली आहे.
- पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
द्वीपकल्प
- उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो.
- यात अनेक लहान-मोठे पर्वत व पठारे आहेत.
- उत्तरेकडील अरवली हा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे.
- या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्यभागातील विंध्य-सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.
किनारपट्टीचा प्रदेश
- भारताला सुमारे ७५०० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे.
- द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे.
- पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. या किनारपट्टीची रुंदीही कमी आहे.
- पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात, त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत.
- पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्व वाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात.
- अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात, त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात.
द्वीपसमूह
- भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान-मोठी बेटे आहेत.
- अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांत प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे.
- अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात, तर बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान-निकोबार दवीपसमह या नावाने ओळखली जातात.
- बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकणद्वीपे आहेत.
- ही विस्ताराने लहान असून त्यांची उंची कमी आहे.
- अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहे.
- या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागत ज्वालामुखी आहे.
- निकोबार समूहातही काही बेटे कंकणद्वीपाच्या स्वरूपात आहेत.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series