Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   मराठी व्याकरण - विशेषण
Top Performing

मराठी व्याकरण – विशेषण : पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य

विशेषण व विशेषणाचे प्रकार

विशेषण व विशेषणाचे प्रकार: पोलीस भरती 2024 साठी परीक्षेत मराठी विषयास अनन्य साधारण महत्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणार शब्द होय. आज आपण या लेखात विशेषण व विशेषणाच्या सर्व प्रकारांबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहे.

पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य योजना 

Police Recruitment 2024 : Study Material Plan

वेब लिंक  अँप लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

वेब लिंक  अँप लिंक

विशेषण व विशेषणाचे प्रकार: विहंगावलोकन 

विशेषण व विशेषणाचे प्रकार: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता पोलीस भरती 2024आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव विशेषण व विशेषणाचे प्रकार
लेखातील प्रमुख मुद्दे
  • विशेषण
  • विशेषणाचे प्रकार
  • नमुना प्रश्न

विशेषण

विशेषण: नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्‍या शब्दास विशेषण असे म्हणतात.

उदा. ती खूप हुशार मुलगी आहे. या वाक्यात मुली बद्दल विशेष माहिती हुशार या शब्दाने दिली. यामुळे हुशार हे विशेषण आहे.

विशेषणाचे प्रकार

विशेषणाचे प्रकार: विशेषणाचे प्रमुख तीन प्रकार पडतात

  • गुणवाचक विशेषण
  • संख्यावाचक विशेषण
  • सार्वनामिक विशेषण

गुणवाचक विशेषण: नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात. उदा. सुंदर, गोड, कडू

संख्यावाचक विशेषण: ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात.संख्यावाचक विशेषणाचे प्रकार व उदा. खाली दिलेली आहे

  • गणनावाचक: एक, अर्धा, दोघे
    • पूर्णांक वाचक : एक, दोन, पाच (पूर्ण संख्या)
    • अपूर्णांक वाचक: अर्धा, सव्वा, पाऊण (अपूर्ण संख्या)
    • साकल्य वाचक: दोघे, चारही, पाची (सर्वच्या सर्व)
  • क्रमवाचक: पहिला, पाचवा
  • आवृत्तिवाचक: द्विगुणीत
  • पृथ्वकत्व वाचक: एक एक
  • अनिश्चित: काही, सर्व

सार्वनामिक विशेषण: सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदा. हे, ते, असले.

विशेषण व विशेषणाचे प्रकार: नमुना प्रश्न 

प्रश्न 1. हा चौपदरी मार्ग आहे.  या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

(a) गणनावाचक विशेषण

(b) क्रमवाचक विशेषण

(c) आवृत्तिवाचक विशेषण

(d) पृथ्वकत्व वाचक विशेषण

उत्तर- (c)

प्रश्न 2. आईने मला डब्यात साडेतीन चपात्या दिल्या.  या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

(a) अपूर्णांक वाचक विशेषण

(b) क्रमवाचक विशेषण

(c) पूर्णांक वाचक विशेषण

(d) पृथ्वकत्व वाचक विशेषण

उत्तर- (a)

प्रश्न 3. खालीलपैकी पृथ्वकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते?

(a) माझी दुसरी बहिण पुण्यात आहे.

(b) रमेशने माझा अर्धा डबा खाल्ला.

(c) माझे सर्व कपडे पावसात भिजले.

(d) माझ्याकडे दोन-दोन पेन आहेत.

उत्तर- (d)

प्रश्न 4. ती फार गोड गाते.  या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

(a) गणनावाचक विशेषण

(b) गुण विशेषण

(c) आवृत्तिवाचक विशेषण

(d) पृथ्वकत्व वाचक विशेषण

उत्तर- (b)

प्रश्न 5. हे माझे पुस्तक आहे.  या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

(a) गणनावाचक विशेषण

(b) क्रमवाचक विशेषण

(c) सार्वनामिक विशेषण

(d) आवृत्तिवाचक विशेषण

उत्तर- (c)

पोलीस भरती जयहिंद बॅच | Online Live Classes by Adda 247              Maharashtra Police Bharti Test Series

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

मराठी व्याकरण - विशेषण : पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य_6.1

FAQs

मराठीत विशेषणाचे किती प्रमुख प्रकार पडतात?

मराठीत विशेषणाचे 3 प्रमुख प्रकार पडतात

विशेषणाचे प्रमुख प्रकार कोणते ?

विशेषणाचे प्रमुख प्रकार गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण व सार्वनामिक विशेषण हे आहेत.