Marathi govt jobs   »   Study Materials   »   ध्वनिदर्शक शब्द

ध्वनिदर्शक शब्द | WRD भरतीसाठी अभ्यास साहित्य

ध्वनिदर्शक शब्द

ध्वनिदर्शक शब्द: WRD जलसंपदा विभाग भरती 2023 साठी मराठी विषयाचे अभ्यास साहित्य. WRD जलसंपदा विभाग भरती 2023 मध्ये सर्व पदांच्या परीक्षेत मराठी विषयास अनन्य साधारण महत्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज आपण या लेखात ध्वनिदर्शक शब्दबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहे.

ध्वनिदर्शक शब्द: विहंगावलोकन

ध्वनिदर्शक शब्द: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता WRD जलसंपदा विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव ध्वनिदर्शक शब्द

ध्वनिदर्शक शब्द

ध्वनिदर्शक शब्द म्हणजे असे शब्द ज्या द्वारे एखाद्या विशिष्ट पदार्थांचा, प्राण्यांचा किंवा घटकांच्या आवाजाबद्दल माहिती समजते. जो शब्द ऐकल्यावर विशिष्ट पदार्थांचा, प्राण्यांचा किंवा घटकांचा आवाज डोळ्यासमोर येतो.

प्राणी/ पक्षी  आवाज प्राणी/ पक्षी  आवाज
वाघाची डरकाळी कावळ्याची कावकाव
पानांची सळसळ पंखांचा फडफडाट
गाढवाचे ओरडणे गाईचे हंबरणे
कबुतराचे / पारव्याचे घुमणे घोड्याचे खिंकाळणे
कोल्हयाची कोल्हेकुई माकडाचा भुभुः कार
बेडकाचे डरावणे /डरकणे /डराँव डराँव अश्रूची घळघळ
मुंग्यांचा गुंजारव रक्ताची भळभळ
बांगड्यांचा किणकिणाट विजांचा कडकडाट
नाण्यांचा छनछनाट पक्ष्यांचे भांडण कलकलाट
पैंजणांची छुमछुम सापाचे फुसफुसणे
पक्ष्यांचा मंजूळ आवाज किलबिल डासांची भुणभुण
हंसाचा कलरव तारकांचा चमचमाट
घंटांचा घणघणाट तलवारींचा खणखणाट
मोरांची केकावली मांजरीचे म्याव म्याव
मोराचा केकारव मधमाश्यांचा गुंजारव
घुबडाचा घुत्कार चिमणीची चिवचिव
कोंबड्याचे आरवणे म्हशीचे रेकणे
सिंहाची गर्जना पाण्याचा खळखळाट

समूहदर्शक शब्द: नमुना प्रश्न

प्रश्न 1. म्हशीचे- 

(a) रेकणे

(b) किणकिणाट

(c) घुमणे

(d) यापैकी नाही

उत्तर- (a)

प्रश्न 2. कलरव असतो _____

(a) नाण्यांचा

(b) उंटांचा

(c) हंसांचा

(d) घुबडांचा

उत्तर- (c)

प्रश्न 4. घुबडांचा-

(a) रेकने

(b) फुसफुसणे

(c) ओरडणे

(d) घुत्कार

उत्तर- (d)

प्रश्न 3. बेडकाचे डरावणे तसेच सापाचे

(a) रेकने

(b) फुसफुसणे

(c) ओरडणे

(d) हंबरणे

उत्तर- (b)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

ध्वनिदर्शक शब्द म्हणजे काय?

ध्वनिदर्शक शब्द म्हणजे असे शब्द ज्या द्वारे एखाद्या विशिष्ट पदार्थांचा, प्राण्यांचा किंवा घटकांच्या आवाजाबद्दल माहिती समजते.

ध्वनिदर्शक शब्द बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

ध्वनिदर्शक शब्द बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.