Marathi govt jobs   »   Study Materials   »   स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 – काळ, लिंग विभक्ती, वचन, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3

महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर बरेच प्रश्न विचारले जातात. MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC गट ब व गट क च्या परीक्षा, तसेच MPSC घेत असलेल्या इतर स्पर्धा परीक्षामध्ये, त्याचप्रमाणे आरोग्य विभाग भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023, कृषी विभाग भरती 2023 भरती  इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. मराठी व्याकरणाच्या पहिल्या भागात आपण वर्णविचार, स्वर व व्यंजन म्हणजे काय व त्यांचे प्रकार, शब्द व शब्दांच्या जाती याबद्दल माहिती घेतली. दुसऱ्या भागात प्रयोग, वाक्यांचे प्रकार, समास याबद्दल माहिती पहिली. आज स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 या लेखात आपण मराठी व्याकरणातील काळ व काळाचे प्रकार, लिंग, विभक्ती, वचन, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द याबद्दल माहिती पाहणार आहोत.

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय मराठी भाषा
लेखाचे नाव स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण
भाग 3
घटक
  • काळ व काळाचे प्रकार
  • लिंग
  • विभक्ती
  • वचन
  • समानार्थी व विरुद्धार्थी शब्द

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3

व्याकरण (Grammar) हे शास्त्र आहे, ज्यात भाषेचे सुधारण्याचे नियम सांगितले गेले आहेत. कोणत्याही भाषेच्या भागांचे विश्लेषण आणि अर्थ लावणे याला व्याकरण म्हणतात. व्याकरण हे ज्ञान आहे ज्याद्वारे एखादी भाषा बोलली जाते, वाचली जाते आणि योग्यरित्या लिहिली जाते. कोणतीही भाषा लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी आणि बोलण्यासाठी निश्चित नियम आहेत. भाषेची शुद्धता आणि सौंदर्य टिकवण्यासाठी हे नियम पाळणे आवश्यक आहे. हे नियम व्याकरणाच्या अंतर्गत येतात.

मराठी व्याकरण हे मराठी भाषेच्या अभ्यासाचे महत्त्वाचे अंग आहे. ज्यामध्ये भाषेचे योग्य नियम सांगितले गेले आहेत.

व्याकरणाची व्याख्या: कोणत्याही भाषेच्या भागांचे विश्लेषण आणि अर्थ लावणे याला व्याकरण म्हणतात. व्याकरण हे ज्ञान आहे ज्याद्वारे एखादी भाषा बोलली जाते, वाचली जाते आणि योग्यरित्या लिहिली जाते.

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: काळ व काळाचे प्रकार

काळ व काळाचे प्रकार: वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.

काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.

  1. वर्तमान काळ
  2. भूतकाळ
  3. भविष्यकाळ

वर्तमान काळ: क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो. उदा. मी पत्र लिहितो.

वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार आहेत.

  1. साधा वर्तमानकाळ
  2. अपूर्ण वर्तमानकाळ
  3. पूर्ण वर्तमानकाळ
  4. रीती वर्तमानकाळ

साधा वर्तमानकाळ: जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो. उदा. सुरेश गाणे गातो.

अपूर्ण वर्तमानकाळ: एखादी क्रिया चालू आहे हे दर्शविण्यासाठी अपूर्ण वर्तमानकाळ वापरतात. उदा. गोलू खेळत आहे.

पूर्ण वर्तमानकाळ:  नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळ वापरतात. उदा. श्यामने पेपर सोडवला आहे.

रीती वर्तमानकाळ: वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात. उदा. माधुरी रोज डान्स क्लासला जाते.

भूतकाळ: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी पत्र लिहिले.

भूतकाळचे 4 उपप्रकार आहेत.

  1. साधा भूतकाळ
  2. अपूर्ण भूतकाळ
  3. पूर्ण भूतकाळ
  4. रीती भूतकाळ

साधा भूतकाळ: एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी गृहपाठ केला.

अपूर्ण भूतकाळ: एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात. उदा तो वाचत होता.

पूर्ण भूतकाळ: एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. तो उठला होता.

रीती भूतकाळ: भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी दररोज शेतात जात असे.

भविष्यकाळ: क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे हे  दर्शविण्यासाठी भविष्यकाळाचा उपयोग होतो.

भविष्यकाळाचे 4 उपप्रकार आहेत.

  1. साधा भविष्यकाळ
  2. अपूर्ण भविष्यकाळ
  3. पूर्ण भविष्यकाळ
  4. रीती भविष्यकाळ

साधा भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो. उदा. पुढीलवर्षी मी ट्रीप ला जाईन.

अपूर्ण भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात. उदा. मी उद्या नागपुरात असेन.

पूर्ण भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात. याने पुस्तक वाचले असेल.

रीती भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती भविष्यकाळ’ असे म्हणतात. उदा. मी रोज व्यायाम करत जाईल.

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 1 (वर्णमाला व शब्दांच्या जाती)

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: लिंग

लिंग: नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.

मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.

  1. पुल्लिंगी
  2. स्त्रीलिंगी
  3. नपुसकलिंगी

लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल

  1. ‘अ’ कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी ‘ए’ कारान्त होते. उदा. मुलगा – मुलगी – मुलगे
  2. काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात. उदा. पाटील – पाटलीण
  3. काही प्राणीवाचक ‘अ’ कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ‘ई’ कारान्त होतात. उदा. दास – दासी
  4. काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात. उदा. सुरा – सुरी
  5. संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होतात. उदा जनक – जननी
  6. काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररित्या होतात. पुरुष – स्त्री
  7. मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात. उदा. व्याधी (स्त्री. पु.)
  8. परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात. उदा. क्लास(वर्ग) – पुल्लिंगी
  9. सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते. उदा. साखरभात (पु.)
  10. गरुड, टोळ, पोपट, मासा, साप, सुरवंट या प्राण्यांच्या/पक्ष्यांच्या/कीटकांच्या नामाचा उल्लेख पुल्लिंगीच करतात. तर ऊ, घार, घूस, जळू, पिसू, मैना, सुसर या प्राण्यांच्या/पक्ष्यांच्या/कीटकांच्या नामांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगीच करतात.

Marathi Grammar for Competitive Exams: Part 2 

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: विभक्ती

विभक्ती: नामे सर्वनाम यांचा क्रियापदाशी व इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

नामाचा क्रियापदाशी किवा इतर शब्दांशी असणारा संबंध एकूण आठ प्रकारचा असतो म्हणून विभक्तीचे आठ प्रकार मानले जातात तर कार्यकार्थ एकूण सहा मानले जातात. कार्यकार्थात षष्टी व संबोधन यांचा समावेश होत नाही.

विभक्ती प्रत्ययाचा तक्ता
विभक्ती विभक्तीचे प्रत्यय कारकार्थ
एकवचन अनेकवचन
प्रथमा कर्ता
व्दितीया स, ला, ते स, ला, ना, ते कर्म
तृतीय ने, ए, शी नी, शी, ई, ही करण (साधन)
चतुर्थी स, ला, ते स, ला, ना, ते संप्रदान (दान/भेट)
पंचमी ऊन, हुन ऊन, हुन अपादान (दुरावा/वियोग)
षष्टी चा, ची, चे, च्या चा, ची, चे, च्या संबंध
सप्तमी त, ई, आ त, ई, आ अधिकरण (स्थळ/वेळ)
संबोधन नो हाक

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: वचन

वचन: नामावरून जसे त्याचे लिंग समजते त्या नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या वस्तु एकाहून अधिक आहेत हे ही कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात.

मराठीत दोन वचने आहेत.

  1. एकवचन
  2. अनेकवचन

वाचनामुळे नामाच्या रुपात खालीलप्रमाणे बदल होतात.

  1. ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ‘ए’ कारान्त होते. उदा. राजा – राजे
  2. ‘आ’ कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात. उदा. पक्षी – पक्षी
  3. ‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन केव्हा ‘आ’ कारान्त तर केव्हा ‘ई’ कारान्त होते. उदा. गाय – गायी
  4. ‘आ’ कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेकवचन एक वचनासारखेच असते. उदा. सभा -सभा
  5. ‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचन ‘वा’ कारान्त होते. उदा. पिसू – पिसवा
  6. ‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन ‘या’ कारान्त होते. उदा. भाकरी – भाकऱ्या
  7. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. त्यांचे एकवचन होत नाही. उदा. कांजण्या

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 2 (प्रयोग, वाक्याचे प्रकार आणि समास)

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: समानार्थी व विरुद्धार्थी शब्द

समानार्थी व विरुद्धार्थी शब्द: महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरणात समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांवर नेहमी प्रश्न विचारल्या जातात.

समानार्थी शब्द: एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ‘ समानार्थी शब्द ‘ होय.

विरुद्धार्थी शब्द: एखाद्या शब्दाचा उलटा अर्थ सांगण्याच्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

समानार्थी शब्दाची pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

विरुद्धार्थी शब्दाची pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

PCMC शिक्षक भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे कि, कृषी विभाग भरती 2023, तलाठी भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

इतर अभ्यास साहित्य
लेखाचे नाव वेबलिंक अँप लिंक
भारतातील महारत्न कंपन्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील प्रथम व्यक्तींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकसभा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आपली सौरप्रणाली वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ढग व ढगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील जलविद्युत प्रकल्प वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
माहितीचा अधिकार 2005 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
 51A मूलभूत कर्तव्ये: कलम 51A वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
बौद्ध धर्माबद्दल माहिती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पृथ्वीची अंतर्गत रचना वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पहिले इंग्रज-मराठा युद्ध वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील महत्वाच्या क्रांती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पक्षांतरबंदी कायदा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संख्यात्मक अभियोग्यतेमधील महत्वाची सूत्रे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पद्म पुरस्कार 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
रक्ताभिसरण संस्था वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
1857 पूर्वी ब्रिटिश भारताचे गव्हर्नर जनरल वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील पक्षी अभयारण्य 2023, अद्यतनित यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
RBI च्या क्रेडिट नियंत्रण पद्धती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील पहिले: विज्ञान, प्रशासन संरक्षण, क्रीडा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे कलम वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

Sharing is caring!

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 - काळ, लिंग विभक्ती, वचन, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द_5.1

FAQs

काळाचे प्रमुख किती प्रकार पडतात?

काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.

समानार्थी शब्द म्हणजे काय?

एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' समानार्थी शब्द ' होय.

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय?

एखाद्या शब्दाचा उलटा अर्थ सांगण्याच्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.