Table of Contents
Marathi Language Quiz for talathi and other Competitive Exams: स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी समाविष्ट करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Marathi Language Quiz for Competitive Exams पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Marathi Language Quiz for Competitive Exams चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Marathi Language Quiz for talathi and other Competitive Exams Quiz चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. Marathi Language Quiz केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.
Daily Quiz for Competitive Exams: Marathi Language
सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Marathi Language Quiz for Competitive Exams चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, PMC & PCMC Recruitment, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी Marathi Language Quiz for Competitive Exams Quiz हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Marathi Language Quiz for Competitive Exams Quiz आपली 2023 च्या स्पर्धा परीक्षेची तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.
Daily Quiz for Competitive Exams – Marathi Language: Questions
Q1. संयुक्त वाक्य असलेले पर्याय ओळखा.
(1) वर्गात मुले आणि मुलीही आल्या.
(2) जेव्हा मोठी घंटा होते. तेव्हा शाळा सुटते.
(3) आज रविवार आहे पण शाळेला सुट्टी नाही.
(4) या समारंभाला मुख्यमंत्री येतील किंवा उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील.
पर्यायी उत्तरे :
(a) फक्त (1) व (3) बरोबर
(b) फक्त (2) व (4) बरोबर
(c) फक्त (1), (3) व (4) बरोबर
(d) सर्व पर्याय बरोबर आहेत.
Q2. संयुक्त वाक्याच्या बाबतीत पुढील विधानापैकी कोणते विधान अचूक आहे?
(1) संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्येच असतात.
(2) मिश्रवाक्ये प्रधानबोधक उभयान्वयी जोडली गेलेली नसतात.
(3) संयुक्त वाक्याचे तीन प्रकार पडतात.
पर्यायी उत्तरे :
(a) (1) व (2) बरोबर, (3) चूक
(b) (2) व (3) बरोबर, (1) चूक
(c) (1) व (2) चूक, (3) बरोबर
(d) (1) व (3) चूक, (2) बरोबर
Q3. ‘कायमचे लक्षात राहणारे’ या शब्दसमुहासाठी एक शब्द वापरून केलेले वाक्य कोणते ?
(1) ही गोष्ट चिरंतन आहे.
(2) तो कायम आठवणीत राहील.
(3) आजचा सामना अविस्मरणीय होता.
(4) अजय तात्पुरता स्मृतीत राहील.
पर्यायी उत्तरे :
(a) फक्त (1) व (3) बरोबर
(b) फक्त (2) व (4) बरोबर
(c) फक्त (3) बरोबर
(d) फक्त (3) व (4) बरोबर
Q4. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगातील वाक्य कोणते?
(1) निशा फार वेगात धावते.
(2) निनादने चित्रपट पाहिला.
पर्यायी उत्तरे :
(a) फक्त 1
(b) फक्त 2
(c) 1 व 2 दोन्ही
(d) 1 व 2 दोन्हीही नाहीत.
Q5. ‘शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो’ या वाक्यातील विधेयविस्तार …… हा आहे.
(a) शरदाच्या चांदण्यात
(b) गुलमोहर
(c) मोहक
(d) दिसतो
Q6. ‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. ‘ या वाक्यातील उद्देश कोणते?
(a) दात
(b) मुखास शोभा
(c) पांढरे स्वच्छ
(d) देतात
Q7. पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.
‘आमचा छोटा मुलगा काल विकत घेतलेले पुस्तक अगदी तन्मयतेने वाचीत बसला आहे.’
(a) वाचीत बसला आहे.
(b) अगदी तन्मयतेने
(c) विकत घेतलेले
(d) छोटा मुलगा
Q8. पुढे दिलेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यातून वाक्यप्रचाराच्या अर्थाचा अचूक पर्याय लिहा.
(a) उखळ पांढरे होणे = भीक मागण्याची पाळी येणे.
(b) दाद न देणे = पुष्कळ फायदा होणे.
(c) हातावर तुरी देणे = डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे.
(d) उलटी अंबारी हाती येणे = पूर्णपणे दुर्लक्ष्य करणे.
Q9. ‘शहरात नोकरी करीत असतांना गोकुळला दर अकरा महिन्यांनी नवीन भाड्याच्या घरात घरसामान हलवावे लागे. त्यामुळे तो या त्रासाला अगदी कंटाळून गेला होता. ‘ या वाक्य समूहासाठी योग्य वाक्यप्रचाराची निवड करा.
(a) जीव लावणे
(b) जीवावर उदार होणे
(c) जीवाला घोर लागणे
(d) जीव मेटाकुटीस येणे
Q10. ‘ठाव पाहणे’ या वाक्यप्रचाराचा समर्पक उपयोग असलेले वाक्य कोणते ?
(1) शेतकरी पावसाचा ठाव पाहून पेरणी करतात.
(2) रमेशने गाव सोडल्यापासून त्याचा ठाव लागत नाही.
(3) एखादयाच्या मनाचा ठाव पाहणे शक्य नसते.
(4) बिळातील सशाचा ठाव पाहणे कसे जमेल?
पर्यायी उत्तरे :
(a) फक्त (1) व (2) बरोबर
(b) फक्त (2) व (4) बरोबर
(c) फक्त (1) बरोबर
(d) फक्त (3) व (4) बरोबर
अँप मध्ये प्रश्ने सोडवण्यासाठी, वेळेसह, आणि आल इंडिया रेंक पाहण्यासाठी अँप डोउनलोड करा Click here
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
Daily Quiz for Competitive Exams – Marathi Language: Solutions
Solutions
S1. Ans (c)
Sol1. पहिल्या वाक्यात ‘आणि’ या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे .
- दुसरे वाक्य जेव्हा-तेव्हा या संकेत दर्शक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे. त्यामुळे ते मिश्रवाक्य आहे.
- तिसरे वाक्य ‘पण’ या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे.
- चौथे वाक्य ‘किंवा’ या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे.
S2. Ans (c)
Sol. संयुक्त वाक्याचे तीन प्रकार पडतात-
- केवल संयुक्त
- मिश्र संयुक्त
- केवल मिश्र संयुक्त
S3. Ans (c)
Sol. ‘कायमचे लक्षात राहणारे’ या शब्दसमुहासाठी एक शब्द वापरून तयार केलेले वाक्य आजचा सामना अविस्मरणीय होता हे आहे.
S4. Ans (b)
Sol. पहिल्या वाक्यात कर्म नाही म्हणून ते कर्मणी प्रयोगाचे वाक्य नाही. दुसऱ्या वाक्यात कर्म आहे म्हणून ते कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे.
S5. Ans (a)
Sol. मूळ उद्देश- गुलमोहर, विधेयपूरक – मोहक, विधेयविस्तार – शरदाच्या चांदण्यात,मूळ विधेय – दिसतो.
S6. Ans (a)
Sol. मूळ उद्देश – दात, उद्देशविस्तार – पांढरे स्वच्छ, कर्म – शोभा, विधेयपूरक – मुखास, मूळ विधेय – देतात.
S7. Ans (b)
Sol. मूळ उद्देश – मुलगा,उद्देशविस्तार – आमचा छोटा,कर्म –पुस्तक,विधेय विस्तार – अगदी तन्मयतेने.
S8. Ans (c)
Sol. हातावर तुरी देणे = डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे हा अचूक अर्थाचा वाक्प्रचार आहे.
S9. Ans (d)
Sol.शहरात नोकरी करीत असतांना गोकुळला दर अकरा महिन्यांनी नवीन भाड्याच्या घरात घरसामान हलवावे लागे. त्यामुळे तो या त्रासाला अगदी कंटाळून गेला होता. या वाक्य समूहासाठी योग्य वाक्यप्रचार जीव मेटाकुटीस येणे हा आहे .
S10. Ans (c)
Sol. ठाव पाहणे या वाक्यप्रचाराचा समर्पक उपयोग असलेले वाक्य शेतकरी पावसाचा ठाव पाहून पेरणी करतात हे आहे.
FAQs : Marathi Language Quiz for talathi and other Competitive Exams Quiz
Q1. Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?
Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.
Q2. मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?
दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.
Q3. या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?
Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.
Q4. अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?
MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.
लेटेस्ट महाराष्ट्र नोकरी सरकारी | माझी नोकरी 2023 |
मुख्य पृष्ठ | अड्डा 247 मराठी |
अड्डा 247 मराठी प्रश्न | दैनिक प्रश्ने |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
![Marathi Language Quiz for talathi and other Competitive Exams : 9 August 2023_4.1](https://st.adda247.com/https://st.adda247.in/https://d2fldgtygklyv6.cloudfront.net/90841633767413.png?tr=w-193)