Table of Contents
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023: महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (Medical Education and Drugs Department) अंतर्गत विविध रुग्णालयात 14,000 पेक्षा जास्त रिक्त पदे आहेत. महाराष्ट्र दंत महाविद्यालयांत 13,000 पेक्षा जास्त आणि आयुर्वेद महाविद्यालयांत 800 पेक्षा जास्त रिक्त पदे असण्याची माहिती प्राप्त झाली आहे. या रिक्त पदांची भरती विभागातील सर्व पदे सरळसेवेने व पदोन्नतीने पद्धीतीने लवकरच भरण्यात येणार आहेत. या लेखात बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती 2023: विहंगावलोकन
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023 अंतर्गत गट ब, क आणि ड च्या विविध पदांची भरती होणार आहे. उमेदवार खालील तक्त्यात वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023 चे विहंगावलोकन तपासू शकतात.
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग |
भरतीचे नाव | वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023 |
पदांची नावे |
|
रिक्त पदांची संख्या | 14,000+ |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
नोकरीचे स्थान | संपूर्ण महाराष्ट्र |
भरती प्रक्रिया राबविणार | MPSC आणि/किंवा सरळ सेवा |
अधिकृत संकेतस्थळ | https://medical.maharashtra.gov.in/ |
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023, रिक्त जागा Update
राज्यातील सरकारी रुग्णालये, दंत महाविद्यालयांत 13,391 पदे रिक्त असून आयुर्वेद महाविद्यालयांत 876 पदे रिक्त आहेत. यातील गट अ व गट ब मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू असून येत्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व पदे भरली जातील असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
राज्यातील सरकारी रुग्णालयांत रिक्त असलेल्या पदांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. सरळसेवेने आतापर्यंत प्राध्यापक संवर्गातील 91, सहायक प्राध्यापक संवर्गातील 525 पदे भरण्यात आली आहेत. प्राध्यापक संवर्गातील 117 अध्यापकांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली आहे. तर उर्वरित रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत.
गट क संवर्गातील 5,180 पदे भरण्याकरिता टीसीएसआयओएन कंपनीकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. गट ड संवर्गातील पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने संबंधित संस्थेचे अधिष्ठाता व संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवार खाली वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023, रिक्त जागा Update बद्दल माहिती मिळवू शकतात.
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023, रिक्त जागा Update (24 जुलै 2023)
वैद्यकीय शिक्षण विभाग रिक्त जागांचा तपशील
महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती 2023 ही अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, गट क (विविध पदे) आणि गट ड (विविध पदे) जाहीर होणार असून पदानुसार असलेल्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
दंत महाविद्यालयांतील रिक्त पदे | ||
अ.क्र. | पदनाम / संवर्ग | रिक्त पदे |
1 | अधिष्ठाता | 08 |
2 | प्राध्यापक | 245 |
3 | सहयोगी प्राध्यापक | 400 |
4 | सहायक प्राध्यापक | 1008 |
5 | गट क | 7756 |
6 | गट ड | 3974 |
एकूण | 13391 |
सरकारी आयर्वेद महाविद्यालयांतील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
सरकारी आयर्वेद महाविद्यालयांतील रिक्त पदे | ||
अ.क्र. | पदनाम / संवर्ग | रिक्त पदे |
1 | अधिष्ठाता | 02 |
2 | प्राध्यापक | 26 |
3 | सहयोगी प्राध्यापक | 44 |
4 | सहायक प्राध्यापक | 86 |
5 | गट क | 510 |
6 | गट ड | 210 |
7 | एकूण | 876 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |