Table of Contents
MHADA Bharti 2021 Public Notice: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.MHADA Bharti 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दिनांक 02 डिसेंबर 2021 ला MHADA ने म्हाडा भरती 2021 साठी जाहीर निवेदन (MHADA Bharati 2021 Public Notice) केले आहे. आज या लेखात आपण सर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी MHADA Bharati 2021 Public Notice बद्दल माहिती पाहणार आहे.
MHADA Bharti 2021 Public Notice | MHADA भरती 2021 जाहीर निवेदन
MHADA Bharti 2021 Public Notice: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील 565 पदे भरण्याकरीता सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर प्रक्रिया पारदर्शी व सुरळीतपणे व्हावी तसेच पदभरतीमध्ये निव्वळ गुणवत्ताधारक व कागदपत्रे पूर्तता निकषांच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची नेमणूक व्हावी याकरीता सर्व खबरदारी प्राधिकरणातर्फे घेण्यात येत आहे.
MHADA भरती परीक्षेच्या नवीन तारखा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MHADA दिनांक 02 डिसेंबर च्या जाहीर निवेदनाद्वारे (MHADA Bharti 2021 Public Notice) सर्व उमेदवारांना सूचीत करत आहे की, त्यांनी गैरमार्गाचा अवलंब करू नये तसेच कोणत्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये. अशा प्रकारे जर कोणी प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असेल तर संबंधित व्यक्तीची तक्रार म्हाडा व जवळच्या पोलीस ठाण्यात करण्यात यावी.
MHADA भरती 2021 जाहीर निवेदन PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
General instructions to candidates on the background of Covid-19 | कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना
General instructions to candidates on the background of Covid-19: 12 डिसेंबरपासून परीक्षा सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सूचना (MHADA Bharati 2021 Public Notice) जारी केल्या आहेत. त्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.
- परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना किमान तीन पदरी कापडाचा मुखपट (Mask) परिधान करणे अनिवार्य आहे.
- परीक्षा केंद्रावर सॅनिटाईझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता (असल्यास) करणे अनिवार्य आहे.
- परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता (Cleanliness) तसेच आरोग्यास हितावह (Hygienic) वातावरण राखण्यासाठी हात वेळोवेळी सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे.
- कोव्हिड- 19 सदृश्य लक्षणे जसे की, ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी/कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. अशा उमेदवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येईल.
- उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना तसेच परीक्षा केंद्राबाहेर जाताना शारीरिक/परस्पर अंतर (Social Distancing) राखणे अनिवार्य आहे.
- वापरलेले टिश्यू पेपर, मुखपट, हातमोजे, सॅनिटाईझ पाऊच इत्यादी वस्तू कचराकुंडीमध्येच टाकाव्यात.
- कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना / आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे.
उमेदवारांना सर्वसाधारण सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MHADA Bharti 2021 Related Posts
- म्हाडा भरती 2021: 565 पदांसाठी अर्ज करा
- म्हाडा भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम
- MHADA भरती परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर
Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य
Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021) प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs MHADA Bharati 2021 Public Notice
Q1. MHADA परीक्षेसाठी Mask अनिवार्य केले आहे का?
Ans. होय, म्हाडा परीक्षेसाठी Mask अनिवार्य केले आहे
Q2. परीक्षा केंद्रावर सॅनिटाईझरची सुविधा असेल का?
Ans. परीक्षा केंद्रावर सॅनिटाईझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल
Q3. उमेदवारास कोव्हिड- 19 सदृश्य लक्षणे असल्यास MHADA चा पेपर देता येईल का?
Ans. होय, उमेदवारास कोव्हिड- 19 सदृश्य लक्षणे असल्यास MHADA चा पेपर देता येईल. अशा उमेदवारांची बैठकीची स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात येईल.
Q4. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट व अँप वर बघायला मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो