Table of Contents
MHADA Exam Update 2021: MHADA भरती 2021 च्या परीक्षा या TCS मार्फत होणार असून सर्व 14 संवर्गाचे पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हाडा भरती 2021 अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी ही भरती होणार आहे ज्यासाठी भरती परीक्षा MHADA, 12, 15, 19 व 20 डिसेंबर 2021 रोजी करण्यात होणार होती आणि त्यासाठीचे प्रवेशपत्र (MHADA Hall Ticket) MHADA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले होते. पण, काही अपिहार्य कारणांमुळे व तांत्रिक अडचणींमुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची (Mhada Exam Postponed) घोषणा केली. दिनांक 13 डिसेंबर 2021 ला महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा परीक्षेबद्दल महत्वपूर्ण Update (MHADA Exam Update 2021) दिला आहे. आज या लेखात आपण या MHADA Exam Update 2021 बद्दल जसे की, परीक्षा कोणत्या कोणामार्फत होणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, त्याचे परीक्षा केंद्र कोणते असतील, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
MHADA Exam Update 2021 | म्हाडा परीक्षेबद्दल Update
MHADA Exam Update 2021: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणने (MHADA), म्हाडा भरती परीक्षा डिसेंबर च्या विविध तारखेला होणार होती. ती परीक्षा अपरिहार्य कारणामुळे व तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात (Mhada Exam Postponed) येत आहे अशी घोषणा करण्यात आली होते. याचे कारण देतांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की गोपनीयतेचा भंग झाल्यामुळे Mhada Exam Postponed करण्यात आली आहे.
आता MHADA ची परीक्षा TCS म्हणजेच TATA Consultancy Services या खासगी कंपनी अंतर्गत घेतली (MHADA exam TCS) जाणार आहे अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे आता तरी या परीक्षेत कुठल्याही प्रकारचा घोटाळा होणार नाही याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
MHADA च्या सोमवारच्या बैठकीत परीक्षा कशी घेता येईल याची चाचपणी करण्यात आली. IBPS प्रमाणे MHADA स्वत: पेपर काढणार व TCS पेपर conduct करणार आहे. ही परीक्षा लवकरच (जानेवारीच्या शेवटी) आणि पारदर्शक पद्धतीने होईल, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
Mhada Exam Postponed बद्दल माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
MHADA Bharti 2021 Important Dates | म्हाडा भरती 2021 महत्वाच्या तारखा
MHADA Bharti 2021 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.
MHADA Recruitment 2021: Important Dates | |
Events | Dates |
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 21 ऑक्टोबर 2021 |
MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख
(Last Date to pay the Exam fee) |
22 ऑक्टोबर 2021 |
प्रवेशपत्र दिनांक (Mhada Admit Card) |
लवकरच जाहीर करण्यात येईल |
परीक्षेची तारीख (Exam Date) |
जानेवारी/ फेब्रुवारी 2022 |
म्हाडा भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम
MHADA Exam 2021 by TCS | म्हाडाची 2021 परीक्षा TCS घेणार
MHADA Exam 2021 by TCS: MHADA ची परीक्षा TCS द्वारे घेतली जाणार असून आता परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पहिले परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार होती पण आता TCS ओंनलाईन पद्धतीने परीक्षा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. म्हाडा प्राधिकरणाने गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. म्हाडाची याधीची ऑफलाईन परीक्षा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद व अमरावती या शहरात होणार होती. या सर्व ठिकाणी TCS चे सेंटर असल्याने परीक्षेच्या ठिकाणात कोणताही बदल होणार नाही.
Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य
Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021) प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs Mhada Exam Postponed
Q1. म्हाडा भरती 2021 परीक्षा पूढे ढकलली आहे का?
Ans. होय, म्हाडा भरती 2021 परीक्षा पूढे ढकलली आहे.
Q2. म्हाडा भरती 2021 परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत होणार आहे?
Ans. म्हाडा भरती 2021 परीक्षा TCS मार्फत होणार आहे.
Q2. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झाल्या का?
Ans. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झाल्या नाही.
Q3. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा केव्हा जाहीर होतील?
Ans. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होतील.
Q4. म्हाडा भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. म्हाडा भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो