Marathi govt jobs   »   MIDC भरती 2023   »   MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023
Top Performing

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023, अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023: MIDC भरती 2023 साठी आज म्हणजेच 25 सप्टेंबर 2023 हा अर्ज करायचा शेवटचा दिवस आहे. याआधी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने एक सूचनापत्र जाहीर केले होते. सुचनापत्रानुसार MIDC ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना GST ची अतिरिक्त रक्कम भरावी लागते. ती आता उमेदारास परत मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 180 तर मागासवर्गातील उमेदवारांना 162 रु. परत मिळणार आहे. विविध संवर्गातील 802 पदाच्या भरतीकरिता MIDC भरती 2023 ची अधिसूचना 14 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाली होती. 02 सप्टेंबर 2023 रोजी MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023 सक्रीय झाली होती. आज या लेखात आपण MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करायच्या स्टेप्स आणि अर्ज करतेवेळी कोणकोणती प्रमाणपत्रे आवश्यक आहे आणि MIDC चे अद्ययावत सूचनापत्राबद्दल माहिती देण्यात आली आहे.

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन 

MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 02 सप्टेबर 2023 रोजी सक्रिय झाली. MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
भरतीचे नाव MIDC भरती 2023
पदांची नावे
  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी)
  • सहयोगी रचनाकार
  • उप रचनाकार
  • उप मुख्य लेखा अधिकारी
  • विभागीय अग्निशमन अधिकारी
  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  • सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी)
  • सहाय्यक रचनाकार
  • सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ
  • लेखा अधिकारी
  • क्षेत्र व्यवस्थापक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी),
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • लघुटंकलेखक
  • सहाय्यक
  • लिपिक टंकलेखक
  • वरिष्ठ लेखापाल
  • तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)
  • वीजतंत्री (श्रेणी-2)
  • पंपचालक (श्रेणी-2)
  • जोडारी (श्रेणी-2)
  • सहाय्यक आरेखक
  • अनुरेखक
  • गाळणी निरिक्षक
  • भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी
  • कनिष्ठ संचार अधिकारी
  • चालक यंत्र चालक
  • अग्निशमन विमोचक
  • वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल)
एकूण रिक्त पदे 802
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023
MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023 सक्रीय
अर्ज सुरु होण्याची तारीख 02 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.midcindia.org

MIDC ऑनलाईन अर्ज शुल्क परताव्याबाबत सूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने MIDC भरती 2023 अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून रु. 1000 अधिक रु. 180 GST रक्कम असे एकूण रु. 1180 तसेच, मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग या प्रवर्गातील उमेदवारांकडून रु.900 अधिक रु. 192 GST रक्कम असे एकूण रु. 1062 इतकी रक्कम आकारण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून रु. 180 व मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग या प्रवर्गातील उमेदवारांकडून रु. 162 इतकी अतिरिक्त रक्कम आकारण्यात येत आहे. यात बदल करायचा असल्यास सद्यस्थितीमध्ये आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त रक्कमेबाबत बदल करावयाचा झाल्यास अर्ज भरावयाच्या लिंकमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यामध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची विहित मुदत संपल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या खात्यात सदर रक्कम परत केल्या जाईल असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सांगितले आहे. MIDC ऑनलाईन अर्ज शुल्क परताव्याबाबत सूचनेची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MIDC ऑनलाईन अर्ज शुल्क परताव्याबाबत सूचनापत्र PDF

MIDC भरती 2023 अधिसूचना

MIDC भरती 2023 अंतर्गत विविध गट अ, ब आणि क संवर्गातील 802 पदांची भरती होणार आहे. MIDC भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, अधिकृत अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क याबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MIDC भरती 2023 अधिसूचना 

MIDC ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 02 सप्टेंबर 2023 रोजी सक्रीय झाली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

MIDC ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
MIDC भरती 2023 ची अधिसूचना  14 ऑगस्ट 2023
MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 02 सप्टेंबर 2023
MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023
MIDC परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा247 मराठी अँप

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023

MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 02 सप्टेंबर 2023 रोजी सक्रीय झाली आहे. MIDC भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 25 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • प्रथम उमेदवाराने MIDC च्या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा वर दिल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करावे.
  • त्यानंतर MIDC  भरती 2023 वर क्लिक करा.
  • आता नवीन पेज ओपन होईल तिथे New Register च्या समोर असलेल्या Click Here वर क्लिक करा
  • आता आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा
  • अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.

MIDC भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

MIDC भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागासप्रवर्ग: रु. 900
  • GST शुल्क अतिरिक्त असेल.

MIDC ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

MIDC ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना JPEG फॉरमॅटमध्ये आवश्यक आकारात खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

कागदपत्रे डायमेन्शन  फाईल साईज
स्वाक्षरी 140 x 60 पिक्सल्स 10-20 केबी
डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा 240 x 240 पिक्सल्स 20-50 केबी
स्वयंघोषणापत्र 800 x 400 पिक्सल्स 50-100 केबी
पासपोर्ट साईज फोटो 200 x 230 पिक्सल्स 20-50 केबी

स्वयंघोषणापत्राचा मजकूर खाली देण्यात आला आहे.

“I, _______ (इंग्लिश मध्ये उमेदवाराचे नाव), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MIDC भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय_6.1

FAQs

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023 सक्रीय झाली आहे का?

होय, MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023 सक्रीय झाली आहे?

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक कधी सक्रीय झाली?

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 02 सप्टेंबर 2023 रोजी सक्रीय झाली.

MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करतेवेळी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारास किती अर्ज शुल्क लागेल?

MIDC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करतेवेळी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारास रु. 1000 अर्ज शुल्क लागेल.