Marathi govt jobs   »   Study Materials   »   भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार
Top Performing

भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: तलाठी भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार

भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जातो. वित्तमध्ये व्यक्‍ती, उद्योगसंस्‍था आणि शासनाला विविध उद्देशांसाठी आवश्यक असणाऱ्या निधींचा समावेश होतो. निधी गतिशील करणे आणि निधीचे वाटप करण्यासाठी देशाची वित्‍तीय व्यवस्‍था जबाबदार असते. वित्‍तव्यवस्‍था देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असते. भारतातील वित्‍त प्रणालीमध्ये वित्‍तीय संस्‍था, वित्‍तीय बाजारपेठ, वित्‍तीय साधने आणि वित्‍तीय सेवा यांचा समावेश होतो. या वित्तीय बाजाराचे दोन प्रमुख बाजारपेठांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील सरळ सेवा स्पर्धा परीक्षा तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023 राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, पशुसंवर्धन विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. आज या लेखात आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

नाणे बाजार आणि भांडवल बाजार: विहंगावलोकन

नाणे बाजारात अल्पकालीन कर्जाची देवाण घेवाण होते आणि भांडवल बाजारात मध्यम व दीर्घकालीन कर्जाची देवाण-घेवाण होते. उद्योग व्यवसायाची खेळत्या भांडवलाची गरज नाणे बाजारा मार्फत पूर्ण केली जाते. उद्योग व्यवसायाच्या स्थिर भांडवलाची गरज भांडवल बाजारा मार्फत पूर्ण केली जाते. नाणे बाजार आणि भांडवल बाजारचे विहंगावलोकन खाली देण्यात आली आहे.

नाणे बाजार आणि भांडवल बाजार: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास  साहित्य
विषय अर्थशास्त्र
उपयोगिता तलाठी भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार
हा लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • नाणे बाजाराबद्दल माहिती
  • नाणे बाजाराची साधने
  • भांडवली बाजाराबद्दल माहिती
  • भांडवली बाजारातील सुधारणा

नाणे बाजार आणि भांडवल बाजार

नाणे बाजार आणि भांडवल बाजार: वित्‍तीय बाजारपेठेत रोखे (बॉण्ड), भाग (शेअर्स), व्युत्‍पन्न रोखे (डेरिव्हेटिव्ह), सरकारी रोखे, विदेशी चलन इत्‍यादींसारख्या आर्थिक मालमत्‍तांची खरेदी-विक्री केली जाते. वित्‍तीय बाजारपेठा, बँका, बिगर बँकिंग वित्‍तीय संस्‍था, दलाल, म्‍यूच्युअल फंड, वटणावळ गृहेइत्‍यादी माध्यमांतून चालतात. यामध्ये प्रामुख्याने नाणे बाजार व भांडवली बाजार या दोन भिन्न बाजारपेठांचा समावेश होतो.

नाणे बाजार व भांडवली बाजार
नाणे बाजार व भांडवली बाजार

काही वित्‍तीय साधने

  • रोखे (Bonds) – दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्‍हणून कंपन्या किंवा सरकारद्‌वारे प्रस्‍तुत केलेले कर्जसाधन होय.
  • समभाग भांडवल (Equity Shares) – समभाग भांडवल म्‍हणजेएखादी व्यक्‍ती किंवा समूहाने घेतलेल्‍या कंपनीचे समभाग होय.
  • व्युत्‍पन्न (Derivative) – व्युत्‍पत्र म्‍हणजे वित्‍तीय प्रतिभूतीच्या संदर्भाने एखाद्या मूलभूत मालमत्‍तेचे
    मूल्‍य किंवा किंमत रोखेभाग, चलन, व्याजदर, वस्‍तू इत्‍यादीं मधून मिळविणे होय.
  • व्यापारी बिले (Trade Bills) – वस्‍तूंच्या देयकामध्ये व्यापाराद्‌वारेकाढलेली व स्‍वीकारलेली विनिमय बिले म्‍हणजे व्यापारी बिले होय.
  • वचनपत्रे (Promissory Note) – वचनपत्रे म्‍हणजे असे वित्‍तीय साधन ज्‍यामध्ये एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला मागणीनुसार किंवा भविष्‍यातील तारखेला निश्चित रक्‍कम देण्याबद्‌दल दिलेले लेखी वचन होय.

नाणे बाजार आणि भांडवल बाजार: नाणे बाजाराबद्दल माहिती

भारतातील नाणे बाजार: अल्पमुदतीने भांडवल देणारे व घेणारे यांच्यातील व्यवहारांचा बाजार म्हणजे नाणे बाजार आहे. ह्यात व्यापारी बँका, देशी पेढ्या व इतर अल्पमुदती भांडवल देणाऱ्या संस्था, वायदेबाजारातील ग्राहक आणि विक्रेते, बँका व सरकार इ. अल्पमुदती भांडवल घेणाऱ्या लोकांचा व संस्थांचा समावेश होतो. नाणेबाजारातील उलाढालींचा पतपैशाच्या आणि एकूण पैशाच्या प्रमाणावर तसेच किंमतींच्या पातळीवर परिणाम होत असल्याने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने नाणेबाजारातील व्यवहार महत्त्वपूर्ण ठरतात. भारतातील नाणेबाजार हा दुहेरी स्‍वरूपाचा आहे. यामध्ये संघटित क्षेत्र व असंघटित क्षेत्र यांचा समावेश होतो. भारतातील नाणे बाजाराचे केंद्र, मुंबई, दिल्‍ली व कोलकता या शहरांमध्ये एकवटले आहे. त्यातील प्रमुख नाणे बाजाराचे केंद्र मुंबई हे आहे.

  • संघटित क्षेत्रामध्ये‍ भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्‍तीय संस्‍था, गुंतवणूक संस्‍था, भारतीय सवलत व वित्‍त गृह (DFHI) यांचा समावेश होतो.
  • असंघटित क्षेत्रात सावकार, स्‍थानिक वित्‍तीय पुरवठा करणाऱ्या संस्‍था (बँकर्स) व अनियंत्रित बिगर बँक वित्‍त पुरवठा, मध्यस्‍थ संस्‍था यांचा समावेश होतो.

नाणे बाजार आणि भांडवल बाजार: नाणे बाजाराची साधने

नाणेबाजारात पतसाधनांचा वापर होतो. भारतातील नाणे बाजाराची साधने खालीलप्रमाणे आहे.

  • मागणी नाणे बाजार (Call / Notice Money): जेव्हा पैसे एका दिवसासाठी कर्ज म्‍हणून घेतले जातात किंवा दिले जातात. तेव्हा त्‍याला 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा म्‍हणून ओळखले जाते. आणि जेव्हा पैसे एका दिवसापेक्षा जास्त आणि 14 दिवसापर्यंत घेतले जातात किंवा दिले जातात तेव्हा त्याला दखल पैसा म्हणजेच नोटीस मनी म्हटल्या जाते.
  • कोषागार बिले (Treasury Bills): हि तात्‍पुरती तरलता कमतरता दूर करण्यासाठी सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेने दिलेली अल्‍प मुदतीची साधने आहेत.
  • व्यापारी पत्रे (Commercial Papers): ही एक असुरक्षित वचन चिठ्ठी आहे, जी एका निश्चित परिपक्‍वता कालावधीसह मान्यता आणि वितरणानुसार परिक्रम्‍य आणि हस्‍तांतरणीय असते.
  • ठेवींचे प्रमाणपत्र (Certificate of Deposits): ही साधने असुरक्षित आहेत. वाणिज्‍य बँक आणि विकास वित्‍त संस्‍थांनी जारी केलेल्‍या वाहक स्‍वरुपात वाटाघाटी करण्यायोग्‍य साधने आहेत.
  • व्यापारी पावती (Commercial Bills): ती अल्‍प जोखीम असलेली, परिक्रम्‍य आणि तरल साधने आहेत.

नाणे बाजार आणि भांडवल बाजार: भांडवली बाजाराबद्दल माहिती

भांडवल बाजार हा देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधींची बाजारपेठ आहे. हा वित्‍तीय प्रणालीचाएक महत्‍त्‍वाचा घटक आहे. अधिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी तसेच आर्थिक वूद्धीसाठी प्रभावी भांडवल बाजाराचा विकास आवश्यक आहे. दीर्घकालीन निधीची मागणी कृषी, व्यापार आणि उद्योगातून होते. वैयक्‍तिक बचतकर्ता, सांघिक बचत, बँका, विमा कंपन्या, विशेष वित्‍तीय संस्‍था इत्‍यादी ह्या दीर्घकालीन निधीचा पुरवठा करतात. भारतातील भांडवली बाजारात सरकारी रोखे बाजार, औद्योगिक रोखेबाजार, विकास वित्‍तीय संस्‍था आणि वित्‍तीय मध्यस्‍थ यांचा समावेश असतो.

नाणे बाजार आणि भांडवल बाजार: भांडवली बाजाराची संरचना

भारतातील भांडवली बाजाराची संरचना खालील तक्त्यात दर्शविली आहे.

भारतातील भांडवली बाजाराची संरचना
भारतातील भांडवली बाजाराची संरचना
  • सरकारी रोखे बाजार (Government Securities Market): याला सोनेरी रोखेबाजार (गिल्‍ट एज्‍ड बाजार) असे म्‍हणतात. या बाजारात सरकारी आणि निमसरकारी रोख्यांचा व्यवहार होतो. यावर व्याजदर निश्चित असतो.
  • औद्योगिक रोखे बाजार Industrial Securities Market): हा बाजार जुन्या आणि नवीन कंपन्यांनी लागू केलेले भाग (शेअर) आणि ॠणपत्रे (डिबेंचर) याच्याशी संबंधित आहे. हा नंतर प्राथमिक बाजार (नवीन रोखे) आणि दुय्यम बाजार (जुनेरोखे) यामध्ये विभागला जातो. भाग आणि ॠणपत्रांच्या विक्रीतून या बाजारपेठा नवीन भांडवल उभारण्यास मदत करतात. दुय्यम बाजारात कंपन्यांनी आधीच लागू केलेल्‍या प्रतिभूतींसह व्यवहार चालतात. दुय्यम बाजारपेठांत वायदे बाजारांच्या माध्यमातून कार्य केलेजाते. वायदे बाजार हा भांडवल बाजाराचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. ही एक संघटना/व्यवस्‍था आहे. ज्‍यामध्ये समभाग (Stock), रोखे (बॉण्डस्), वस्‍तू इत्‍यादीचा व्यापार होतो. बॉम्‍बे वायदेबाजार (BSE) आणि राष्‍ट्रीय वायदेबाजार (NSE) हे देशातील प्रमुख वायदेबाजार आहेत.
  • विकास वित्‍तीय संस्‍था (DFI) (Development Financial Institutions): या खाजगी क्षेत्राला मध्यम मुदतीची आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवितात. त्‍यामध्ये इंडस्‍ट्रिअल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IFCI), इंडस्‍ट्रिअल इनव्हेस्‍टमेंट बँक ऑफ इंडिया (IIBI), एक्‍झिम बँक इत्‍यादींचा समावेश आहे.
  • वित्‍तीय मध्यस्‍थ (Financial Intermediaries): वित्‍तीय मध्यस्‍थ ही अशी संस्‍था आहे, जी दोन्हीपक्षांच्या आर्थिक उदि्‌दष्‍टांची पूर्तता करण्यासाठी गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यात दुवा म्‍हणून कार्ये करते. यामध्ये व्यापारी बँका, म्‍यूच्युअल फंड, भाडेपट्‌टी (लीज) कंपन्या, उद्यम भांडवल कंपन्या इत्‍यादी असतात.

नाणे बाजार आणि भांडवल बाजार: भांडवली बाजारातील सुधारणा

भारतातील भांडवली बाजारातील काही महत्‍त्‍वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या त्यातील काही महत्वपूर्ण सुधारणा खालीलप्रमाणे आहेत.

  • भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची (SEBI) 1988 मध्ये स्‍थापना करण्यात आली आणि वैधानिक मान्यता 1992 ला देण्यात आली.
  • राष्‍ट्रीय शेअर बाजार (NSE) ची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली.
  • आधुनिकीकरणाचा एक भाग म्‍हणून संगणकीकृत (स्‍क्रीन आधारित) व्यापार प्रणाली (SBTS – Screen Based Trading System) आणली गेली.
  • इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने गुंतवणूकदारांकडून समभागांची सहज खरेदी व विक्री सुलभ करण्यासाठी 1996 पासून डी मॅट खातेसुरू केले गेले.
  • अमेरिकन ठेव पावती (ADR – American Depository Receipts) आणि जागतिक ठेव पावती (GDR – Global Depository Receipts) च्या माध्यमातून भारतीय कंपन्यांद्‌वारे जागतिक निधीमध्ये वाढीव प्रवेशास परवानगी देण्यात आली.
  • गुंतवणूकदारांची जागरूकता वाढविण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी 2001 मध्ये गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (IEPF – Investor Education and Protection Fund) ची स्‍थापना करण्यात आली.

तलाठी भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे कि तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, वन विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव वेबलिंक अँप लिंक
आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील धरणे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
रोग व रोगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील लोकजीवन वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
वनस्पतीची रचना आणि कार्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
जागतिक आरोग्य संघटना वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
शब्दसंपदा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पृथ्वीवरील महासागर वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताची क्षेपणास्त्रे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील महारत्न कंपन्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील प्रथम व्यक्तींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकसभा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आपली सौरप्रणाली वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ढग व ढगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील जलविद्युत प्रकल्प वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
माहितीचा अधिकार 2005 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: तलाठी भरती 2023 साठी अभ्यास साहित्य_6.1

FAQs

अल्पमुदतीने भांडवल देणारे व घेणारे यांच्यातील व्यवहारांचा बाजारास काय म्हणतात?

अल्पमुदतीने भांडवल देणारे व घेणारे यांच्यातील व्यवहारांचा बाजारास नाणे बाजार म्हणतात.

दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्‍हणून कंपन्या किंवा सरकारद्‌वारे प्रस्‍तुत केलेल्या कर्जसाधनास काय म्हणतात?

दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्‍हणून कंपन्या किंवा सरकारद्‌वारे प्रस्‍तुत केलेल्या कर्जसाधनास रोखे (Bonds) असे म्हणतात.

भारतातील नाणे बाजाराचे केंद्र कोणकोणत्या शहरांमध्ये एकवटले आहे?

भारतातील नाणे बाजाराचे केंद्र मुंबई, दिल्‍ली व कोलकता या शहरांमध्ये एकवटले आहे. त्यातील प्रमुख नाणे बाजाराचे केंद्र मुंबई हे आहे.

भांडवली बाजार म्हणजे काय?

भांडवल बाजार हा देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधींची बाजारपेठ आहे.