Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPCB भरती 2024

MPCB भरती 2024, 64 पदांसाठी अर्ज करा

MPCB भरती 2024

MPCB भरती 2024: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी  गट अ, ब आणि क संवर्गातील एकूण 64 रिक्त पदे भरण्यासाठी MPCB भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 29 डिसेंबर 2023 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण MPCB भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

MPCB भरती 2024: विहंगावलोकन 

MPCB भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

MPCB भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
भरतीचे नाव MPCB भरती 2024
पदांची नावे  गट अ, ब आणि क मधील पदे
एकूण पदे 64
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mpcb.gov.in

MPCB भरती 2024: अधिसुचना 

MPCB भरती 2024 अंतर्गत  गट अ, ब आणि क मधील विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

MPCB भरती 2024 अधिसुचना PDF

MPCB भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

MPCB भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग गट पदसंख्या
1. प्रादेशिक अधिकारी 02
2. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
3. वैज्ञानिक अधिकारी 02
4. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
5. प्रमुख लेखापाल 03
6. विधी सहायक 03
7. कनिष्ठ लघुलेखक 14
8. कनिष्ठ वैज्ञानिक सहायक 16
9. वरिष्ठ लिपिक 10
10. प्रयोगशाळा सहायक 03
11. कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक 06
एकूण   64

MPCB भरती 2024: पात्रता निकष

MPCB भरती 2024 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 30/12/2023 असेल.
  • जाहिरातीत नमुद केलेल्या गट ड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष असावे व खुल्या प्रवर्गासाठी कमाल 38 वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापेक्षा) जास्त नसावे.
  • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्षा पर्यंत
  • पात्र खेळाडूंच्या बाबतीत 43 वर्षा पर्यंत
  • पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत 55 वर्षा पर्यंत
  • तथापी, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय स.न. वि. 2023/प्र.क्र. /14/ कार्य-92/दिनांक 03/03/2023 अन्वये दि.31/12/2023 पुर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्ष शिथीलता दिलेली असल्याने वर नमुद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्ष इतकी शिथीलता असेल.
MPCB भरती 2024: पात्रता निकष
पदाचे नाव पात्रता निकष
प्रादेशिक अधिकारी शैक्षणिक अर्हता

  • अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून समकक्ष पदवी असणे
  • किंवा
  • पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट.

अनुभव

  • पात्रतेवर विहित शिक्षण घेतल्यानंतर 5 वर्षांपेक्षा कमी अनुभव नसावा.
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी शैक्षणिक अर्हता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानात डॉक्टरेट पदवी किंवा त्याच्या समकक्ष असणे

अनुभव

  • विहित पात्रता संपादन करणारा पाच वर्षांपेक्षा कमी अनुभव नसावा
वैज्ञानिक अधिकारी शैक्षणिक अर्हता

  • विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून समकक्ष

अनुभव

  • विहित पात्रता संपादन करणारा तीन वर्षांपेक्षा कमी अनुभव नसावा
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी शैक्षणिक अर्हता

  • विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून समतुल्य.

अनुभव

  • विहित पात्रता संपादन करणारा दोन वर्षांपेक्षा कमी अनुभव नसावा.
प्रमुख लेखापाल शैक्षणिक अर्हता

  • कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी प्राप्त.

अनुभव

  • विहित पात्रता संपादन करणारा तीन वर्षांपेक्षा कमी अनुभव नसावा.
विधी सहायक शैक्षणिक अर्हता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.

अनुभव

  • विहित पात्रता संपादन करणारा एक वर्षांपेक्षा कमी अनुभव नसावा.
कनिष्ठ लघुलेखक शैक्षणिक अर्हता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
  • शॉर्टहँड आणि टायपरायटिंगमध्ये 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठीत अनुक्रमे 80 शब्द प्रति मिनिट आणि 30 शब्द प्रति मिनिट असे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र (GCC) असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक शैक्षणिक अर्हता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवी किंवा त्याच्या समकक्ष असणे.

अनुभव

  • विहित पात्रता संपादन करणारा एक वर्षांपेक्षा कमी अनुभव नसावा.
वरिष्ठ लिपिक शैक्षणिक अर्हता

  • विद्यापीठ/मान्यताप्राप्त मंडळाकडून कोणत्याही शाखेतील किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणे.

अनुभव

  • विहित पात्रता संपादन करणारा तीन वर्षांपेक्षा कमी अनुभव नसावा.
प्रयोगशाळा सहायक शैक्षणिक अर्हता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून विज्ञान किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणे.
कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक शैक्षणिक अर्हता

  • 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असणे.
  • उमेदवाराकडे इंग्रजी किंवा मराठीमध्ये प्रति मिनिट 30 शब्द असलेले टंकलेखन G.C.C (शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र) असणे आवश्यक आहे.

अनुभव

  • विहित पात्रता संपादन करणारा दोन वर्षांपेक्षा कमी अनुभव नसावा.

MPCB भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

MPCB भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

MPCB भरती 2024: महत्वाच्या तारखा
MPCB भरती 2024 अधिसूचना 29 डिसेंबर 2023
MPCB भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 29 डिसेंबर 2023
MPCB भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

19 जानेवारी 2024

MPCB भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

MPCB भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

  • गट अ च्या पदांसाठी
1. लेखी परीक्षा 160 गुण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न
2. मुलाखत 40 गुण
  • गट ब आणि क च्या पदांसाठी
1. लेखी परीक्षा 200 गुण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न

चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

MPCB भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

MPCB भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

MPCB भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय) 

MPCB भरती 2024: वेतनश्रेणी 

MPCB भरती 2024 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रादेशिक अधिकारी S-23 :67700-208700
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी S-23 :67700-208700
वैज्ञानिक अधिकारी S-19 :55100-175100
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी S-15 :41800-132300
प्रमुख लेखापाल S-14 :38600-122800
विधी सहायक S-14 :38600-122800
कनिष्ठ लघुलेखक S-14 :38600-122800
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक S-13 :35400-112400
वरिष्ठ लिपिक S-08 :25500-81100
प्रयोगशाळा सहायक S-07 :21700-69100
कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक S-06 :19900-63200

MPCB भरती 2024: अर्ज शुल्क

MPCB भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

MPCB भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SSC GD भरती 2023  SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPCB भरती 2024 कधी जाहीर झाली?

MPCB भरती 2024 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

MPCB भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

MPCB भरती 2024 64 पदांसाठी जाहीर झाली.

MPCB भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

MPCB भरती 2024 गट अ, ब आणि क संवर्गातील पदांसाठी जाहीर झाली.