Table of Contents
महर्षी कर्वे व त्यांचे कार्य
महर्षी कर्वे व त्यांचे कार्य: महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे (18 एप्रिल, 1858 – 9 नोव्हेंबर, 1962) हे एक प्रसिद्ध तसेच सर्वाधिक जीवन जगणारे महान समाजसुधारक होते . त्यांनी स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आपले जीवन महिलांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांनी मुंबईत स्थापन केलेले SNDT महिला विद्यापीठ हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे . ते 1891 ते 1914 या काळात पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे शिक्षक होते .1958 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महर्षी कर्वे व त्यांचे कार्य या विषयी या लेखात सविस्तर माहिती दिलेली आहे. जी आगामी MPSC – 2024 परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची आहे.
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महर्षी कर्वे व त्यांचे कार्य: विहंगावलोकन
खालील तक्त्यात महर्षी कर्वे व त्यांचे कार्य या विषयी विहंगावलोकन दिले आहे.
महर्षी कर्वे व त्यांचे कार्य : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC 2024 |
विषय | समाजसुधारक |
टॉपिकचे नाव | महर्षी कर्वे व त्यांचे कार्य |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
वेेयक्तिक माहिती –
- महर्षि धोंडो केशव कर्वे यांना ‘अण्णा’ या नावानेही ओळखले जात.
- महर्षि कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी ‘शेरवली’ (रत्नागिरी) येथे झाला.
- त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुरुड येथे झाले.
- त्यांना सोमण गुरूजींकडून लोकसेवेची प्रेरणा मिळाली होती.
- 1873 मध्ये राधाबाईंशी त्यांचा पहिला विवाह झाला.
- तसेच राधाबाईंच्या निधनानंतर 1893 मध्ये बाया कर्वे म्हणजेच गोदुबाईंशी (विधवा) त्यांचा दूसरा विवाह झाला.
- गोदुबाई या पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनमधील पहिल्या विद्यार्थीनी होत्या. या वेळी गो.ग.आगरकर हे उपस्थित होते. हा पहिलाच पुनर्विवाह होता.
- विधवा पुनर्विवाहामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांना मुरुडमध्ये बहिष्कृत घोषित करण्यात आले.
- महर्षि धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा – रघुनाथ धोंडो कर्वे.
- रघुनाथ कर्वे यांनी 1921 मध्ये संतती नियमन केंद्र सुरु केले.
सामाजिक कार्य –
- गोपाळकृष्ण गोखले यांच्या निमंत्रणावरून 1891 मध्ये, कर्वे पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक झाले. येथे 23 वर्षे अखंड सेवा केल्यानंतर ते 1914 मध्ये सेवानिवृत्त झाले.
- महर्षी कर्वे यांनी “विधवा विवाह संघ” स्थापन केला.
- 1893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी वर्ध्याला केली.
- इ.स. 1896 मध्ये त्यांनी “अनाथ बालिकाश्रम असोसिएशन” ची स्थापना केली.याचे अध्यक्ष रा.गो. भांडारकर हे होते व येथे कमलाबाई गरूड या पहिल्या विधवा महिला होत्या.
- जून 1900 मध्ये पुण्याजवळ हिंगणे नावाच्या ठिकाणी छोटेसे घर बांधून “अनाथ बालिकाश्रम” ची स्थापना केली. यासाठी गोविंद गणेश जोशी यांनी 6 एकर जागा दिली होती.
- अनाथ बालिकाश्रमाची उद्दिष्टे –
- विधवा स्त्रियांना शिक्षण देणे.
- विधवांच्या विचारात आणि मनोवृत्तीत बदल करणे.
- विधवांची दुःखे हलकी करण्यासाठी प्रयत्न करणे.
- आपले जीवन निरर्थक नसून एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, असा विचार विधवा स्त्रियांमध्ये दृढ करणे.
- विधवांना मदत करणे व त्यांच्या शिक्षणाची सोय करणे.
- विधवा स्त्रियांना स्वावलंबी करणे.
- 4 मार्च 1907 रोजी त्यांनी “महिला शाळे” ची स्थापना केली, ज्याची स्वतःची इमारत 1911 पर्यंत पूर्ण झाली.
- स्त्रीयांची सेवा करण्यासाठी व त्यांच्या संस्था चालविण्यासाठी 1910 ला कर्वेंनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली.
- निष्काम कर्ममठाचे ब्रीदवाक्य – लोकसेवेसाठी निष्काम बुध्दीने तन, मन, धन अर्पण करणारे निस्वार्थी व त्यागी कार्यकर्ते तयार करणे.
- 1915 च्या सामाजिक परिषदचे अध्यक्षपद कर्वेंनी भूषवले.
- त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना 1916 मध्ये केली. याचे प्रथम कुलगुरू रा.गो. भांडारकर हे होते.
- विठ्ठलदास ठाकरसी यांनी मातोश्री श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयांची देणगी दिल्यामुळे या विद्यापीठाला श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी (S.N.D.T.) असे नाव देण्यात आले.
- हे देशातील पहिले महिला विद्यापीठ आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने ‘भारत रत्न’ किताब देऊन त्यांना सन्मानित केले.
- 1936 मध्ये, गावांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, महर्षी कर्वे यांनी “महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण समिती” ची स्थापना केली, ज्याने हळूहळू विविध गावांमध्ये 40 प्राथमिक शाळा उघडल्या.
- कर्वेंनी 1944 मध्ये समता संघ स्थापन केला.
पुस्तके व पदव्या –
- इ.स. 1915 मध्ये महर्षी कर्वे यांनी मराठी भाषेत लिहिलेला “आत्मचरित” हा ग्रंथ प्रकाशित झाला.
- इ.स. 1936 मध्ये Looking Back या नावाने त्यांचे इंग्रजीत आत्मचरित्र प्रकाशित झाले.
- 1942 मध्ये, त्यांना बनारस विद्यापीठाने डि.लिट ही पदवी दिली.
- 1951 मध्ये, त्यांना पुणे विद्यापीठाने डि.लिट ही पदवी दिली.
- 1954 मध्ये, त्यांच्या स्वतःच्या महिला विद्यापीठाने (SNDT) त्यांना डि.लिट ही पदवी दिली.
- 1955 मध्ये भारत सरकारने त्यांना ” पद्मविभूषण ” देऊन सन्मानित केले आणि वयाची 100 वर्षे पूर्ण केल्यावर, 1957 मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना L.L.D. ची पदवी प्रदान केली.
- 1958 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान “भारतरत्न” देऊन गौरविले.
- भारत सरकारच्या पोस्टल टेलिग्राफ विभागाने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी करून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला होता.
- देशवासीय त्यांना आदराने महर्षी म्हणत.
- 19 नोव्हेंबर 1962 रोजी “महर्षी” कर्वे यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन झाले.
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान(GS) | |
तारीख | टॉपिक |
31 डिसेंबर 2023 | जालियनवाला बाग हत्याकांड |
1 जानेवारी 2024 | गांधी युग |
3 जानेवारी 2024 | रक्ताभिसरण संस्था |
5 जानेवारी 2024
|
प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी |
7 जानेवारी 2024 | 1857 चा उठाव |
9 जानेवारी 2024 | प्राण्यांचे वर्गीकरण -असमपृष्ठरज्जू प्राणी |
11 जानेवारी 2024 | राज्यघटना निर्मिती |
13 जानेवारी 2024 | अर्थसंकल्प |
15 जानेवारी 2024 | महाराष्ट्र – स्थान व विस्तार |
17 जानेवारी 2024 | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल |
19 जानेवारी 2024 | मूलभूत हक्क |
21 जानेवारी 2024 | वैदिक काळ |
23 जानेवारी 2024 | सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी |
25 जानेवारी 2024 | शाश्वत विकास |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.