Marathi govt jobs   »   Study Materials   »   भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल : MPSC 2024 अभ्यास साहित्य

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात 72 प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाली. त्याचे संस्थापक सरचिटणीस ए ओ ह्यूम होते ज्यांनी कलकत्ता येथील व्योमेश चंद्र बॅनर्जी यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले . सुरुवातीच्या काळात काँग्रेसची दृष्टी उच्चभ्रू वर्गाची संघटना होती. त्याचे सुरुवातीचे सदस्य प्रामुख्याने बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीमधून आले होते. आधुनिक भारताचा इतिहास हा आगामी काळातील MPSC 2024 भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल : विहंगावलोकन

खालील तक्त्यात आम्ही विहंगावलोकन बद्दल दिले आहे.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC 2024
विषय आधुनिक भारताचा इतिहास
टॉपिकचे नाव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल
लेखातील प्रमुख मुद्दे
  • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल विषयी सविस्तर माहिती

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना

  • अॅलन ह्यूम यांनी 1884 साली स्थापन केलेल्या ‘इंडियन नॅशनल युनियन’ या संस्थेचे रूपांतर 1885 मध्ये ‘भारतीय राष्ट्रीय सभेत केले.
  • न्यायमूर्ती रानडे यांच्या सूचनेवरून ‘इंडियन नॅशनल युनियन’ चे नामकरण ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ करण्यात आले.
  • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी अॅलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाच्छा यांनी केली. यावेळी व्हाइसरॉय लॉर्ड डफरीन हे होते.
  • मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येऊन 28  डिसेंबर 1885 रोजी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. यामध्ये 54 हिंदू व 2 मुस्लिम प्रतिनिधी होते.
  • पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 22 डिसेंबर 1885 ला  पुणे येथे घेतले जाणार होते. मात्र पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. 
  • राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते.

राष्ट्रीय सभेची काही महत्वाची अधिवेशने :

वर्ष ठिकाण  अध्यक्ष
1885 मुंबई व्योमेशचंद्र बॅनर्जी
1886 कोलकाता दादाभाई नौरोजी
1887 चेन्नई बद्रुद्दीन तैय्यबजी
1888 अलाहाबाद जॉर्ज यूल
1900 लाहोर नारायण गणेश चंदावरकर
1905

 

बनारस गोपाळ कृष्ण गोखले
1906 कलकत्ता दादाभाई नौरोजी
1909 लाहोर पंडित मदनमोहन मालवीय
1911  कलकत्ता बायसन नारायण धर
1916  लखनौ ए.जी. मजुमदार
1917 कलकत्ता श्रीमती अॅनी बेझंट
1920 नागपूर C. विजय राघवाचार्य
1923 दिल्ली अबुल कलाम आझाद
1925 कानपूर सरोजिनी नायडू
1929 लाहोर जवाहरलाल नेहरू
1936 फैजपूर अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू
1955 आवडी यू. एन. ढेबर 
1985 मुंबई राजीव गांधी

राष्ट्रीय सभेच्या महिला अध्यक्ष

वर्ष ठिकाण  अध्यक्ष
1917 कोलकाता श्रीमती अॅनी बेझंट 
1925 कानपूर सरोजिनी नायडू
1933 कोलकाता श्रीमती निली सेन गुप्ता 
1959 नागपूर इंदिरा गांधी
1998 दिल्ली सोनिया गांधी

काँग्रेस पक्षाशी संबंधित विविध राजकारणी अध्यक्षपदासाठी निवडून आले , ज्यांची नावे आणि कार्यकाळ खालीलप्रमाणे आहे:-

1- डॉ. राजेंद्र प्रसाद (1950-62)

2- फखरुद्दीन अली अहमद (1974-77)

3- ग्यानी झैल सिंग (1982-87)

4- रामास्वामी वेंकटरामन (1987-92)

5- शंकर दयाळ शर्मा (1992-97)

6- के.आर. नारायणन (1997-2002)

7- प्रतिभा देवीसिंह पाटील (2007-2012)

8- प्रणव मुखर्जी (2012-2017)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी अॅलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाच्छा यांनी केली.

राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते.

राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेवेळी किती सदस्य उपस्थित होते ?

मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885 रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली.