Marathi govt jobs   »   Study Materials   »   वैदिक काळ

वैदिक काळ : MPSC 2024 अभ्यास साहित्य

वैदिक काळ

वैदिक काळ:अनेक वर्षांच्या शास्त्रीय संशोधनानंतर हडप्पा संस्कृतीच्या नाशाला कोणी बाहेरून आलेले लोक  कारणीभूत नसून नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांसारख्या गोष्टी अधिक जबाबदार आहेत, हे स्पष्ट झाले. आर्य कोण होते, ते भारताबाहेरून  आले की ते प्रथमपासून भारतातच होते, त्यांच्या संस्कृतीचे पुरातत्त्वीय अवशेष कोणत्या प्रदेशांत सापडतात  आणि ते कसे ओळखायचे, अशा अनेक प्रश्नांची निश्चित उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. त्यांच्या संस्कृतीची माहिती त्यांनी रचलेल्या वैदिक वाङ्मयातून  मिळते. हे वाङ्मय मूलतः वैदिक जनसमूहांच्या देवताविषयक श्रद्धा आणि त्या देवतांची त्यांनी केलेली स्तवने अशा स्वरूपाचे आहे. इसवी सन  1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी ‘एशियाटिक सोसायटी  ऑफ बेंगॉल’ या संस्थेची स्थापना केली. या  काळात प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथांचे संकलन, अनुवाद  यांसारखी कामे सुरू झाली.या लेखात आपण प्राचीन भारताचा इतिहास या विषयातील MPSC 2024 परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या वैदिक काळाची सविस्तर माहिती व वैदिक काळावरील प्रश्न- उत्तरे पाहणार आहोत. 

MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वैदिक काळ: विहंगावलोकन

खालील तक्त्यात आम्ही विहंगावलोकन बद्दल दिले आहे.

वैदिक काळ : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC 2024
विषय प्राचीन भारताचा इतिहास
टॉपिकचे नाव वैदिक काळ
लेखातील प्रमुख मुद्दे
  • वैदिक काळाविषयी सविस्तर माहिती
  • वैदिक काळावरील प्रश्न- उत्तरे

वैदिक वाङ्मय आणि समाजरचना :

  • वैदिक वाङ्मय भारतातील सर्वाधिक प्राचीन  साहित्य असल्याचे मानले जाते. 
  • वैदिक वाङ्मयाची  भाषा संस्कृत आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि  अथर्ववेद हे चार वेद म्हणजे वैदिक वाङ्मयाचा मूळ  गाभा आहे. 
  • या चार वेदांच्या ‘संहिता’ स्वतंत्र आहेत.  
  • ‘विद्’ म्हणजे जाणणे आणि ‘वेद’ म्हणजे ‘ज्ञान’ असा  अर्थ आहे. 
  • वेद मौखिक परंपरेने जतन केले गेले. 

ऋग्वेद – ही देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत. त्या पदांना ‘ऋचा’ असे म्हटले जाते. अनेक  ऋचा एकत्र गुंफून ‘सूक्त’ तयार होते. अनेक सूक्तांचे मिळून एक ‘मंडल’ तयार होते. 

यजुर्वेद – यात यज्ञविधींमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे. त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचे मार्गदर्शनही केलेले आहे. यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजे ऋग्वेदातील ऋचाच असत. पद्यस्वरूपातील  ऋचा आणि गद्यात त्यांचा मंत्र म्हणून उपयोग करण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण अशी यजुर्वेद संहितेची  रचना आहे. 

सामवेद – यात यज्ञविधींमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे  मंत्रस्वरूपात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले  आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्त्वाचे आहे. 

अथर्ववेद – यात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींसंबंधीचा  विचार केलेला आहे. त्यामध्ये आयुष्यातील संकटे,  दुखणी यांवर करायचे उपाय आणि औषधयोजना त्यांची  माहिती दिलेली असते. राजनीतीसंबंधीची माहितीही  त्यात आढळते. 

वर्णव्यवस्था 

वेदकाळातील समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व  शूद्र असे चार वर्ण होते. चार वर्णांवर आधारित या  व्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदातील दहाव्या मंडलात प्रथम  येतो. वेदकाळाच्या उत्तरार्धातवर्णव्यवस्थेतील सुरुवातीची  लवचीकता नष्ट झाली. तसेच जातिव्यवस्थाही रुजली  आणि समाजात विषमता निर्माण झाली. वर्ण आणि जात  हे सुरुवातीला व्यवसायावरून ठरत असत. नंतर  जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे त्यामध्ये बदल करता  येणे अशक्य झाले. 

आश्रमव्यवस्था 

मानवी आयुष्याचे चार टप्पे मानून त्यानुसार  व्यक्तीने आपले जीवन कसे व्यतीत करावे याचा आदर्श वैदिक लोकांनी घालून दिला होता. त्यानुसार पहिला  टप्पा हा ‘ब्रह्मचर्याश्रम’, दुसरा टप्पा हा ‘गृहस्थाश्रम’,  तिसरा टप्पा हा ‘वानप्रस्थाश्रम’ आणि चौथा टप्पा ‘संन्यासाश्रम’, अशी विभागणी केलेली होती.  

ब्रह्मचर्याश्रमात व्रतस्थ वृत्तीने राहून ज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारे कौशल्य संपादन करावे आणि गृहस्थाश्रमात, पत्नीच्या सहकार्याने गृहस्थाश्रम पार  पाडावा, असे अपेक्षित होते. वानप्रस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यांमधून निवृत्त होऊन आवश्यकता  भासल्यास मुलाबाळांना मार्गदर्शन करावे आणि ईश्वरचिंतनात वेळ घालवावा अशी सर्वसाधारण कल्पना  होती. वानप्रस्थाश्रमामध्ये मनुष्यवस्तीपासून दूर रहावे,  असेही सांगितलेले होते. संन्यासाश्रम या शेवटच्या टप्प्यात मात्र व्यक्तीने सर्व मायापाशांचा त्याग करून दूर  निघून जावे. दीर्घकाळ एके ठिकाणी वस्ती करू नये,  असे निर्बंध घातलेले होते. 

वैदिक काळातील संंस्कृती 

  • ऋग्वेदकालीन संस्कृती ही पूर्व वैदिक काळातील  संस्कृती होय. 
  • सप्तसिंधु प्रदेशात राहणाऱ्या वैदिक  लोकांच्या जनसमूहांच्या नावांचा उल्लेख ऋग्वेदात  आढळतो. पुरु, अनु, यदु, द्रुह्यु़, तुर्वश यांसारख्या जनसमूहांची नावे त्यात आढळतात. हे जनसमूह शेती  करणारे होते. 
  • ऋग्वेदामध्ये परुष्णी म्हणजे रावी नदीच्या तीरावर वैदिक जनसमूहांमध्ये झालेल्या युद्धाचा उल्लेख  आहे. 
  • दहा जनसमूहांच्या प्रमुखांमध्ये झालेले युद्ध म्हणून  त्याला ‘दाशराज्ञ युद्ध’ असे म्हटले जाते. 
  • सप्तसिंधु  प्रदेशात ऋग्वेदकाळात वैदिक लोकांच्या जनसमूहांबरोबर  काही स्थानिक जनसमूहांचे वास्तव्य होते. त्यांचा उल्लेख  ‘दास’ किंवा ‘दस्यू’ आणि ‘पणी’ असा केलेला आहे.  
  • पणी हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटत असत. ते  वैदिक लोकांच्या गाई पळवून नेत असत. 
  • ऋग्वेदातील जनसमूहांच्या स्थिर गाव-वसाहतींच्या संकुलास आणि त्यामधील लोकांसाठी ‘कृष्ट्य’ अशी  संज्ञा वापरत असत. 
  • ‘कृष्’ म्हणजे नांगरट आणि नांगरट  करणाऱ्या शेतकऱ्यांचा जनसमूह आणि त्यांच्या गाव वसाहती म्हणजे कृष्ट्य. 
  • ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात  शेतीचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट सांगितले आहे. नांगराचा फाळ नांगरट करणाऱ्या शेतकऱ्याला अन्न मिळवून देतो, असे म्हटलेले आहे.  

वैदिक काळावरील प्रश्न- उत्तरे

Q1. वैदिक समाज कसा होता?

(a) पितृसत्ताक

(b) मातृसत्ताक 

(c) समाजवादी

(d) वरीलपैकी नाही

Q2. वेदांच्या शेवटच्या भागाला काय म्हणतात?

(a) आरण्यक

(b) कोड

(c) उपनिषद

(d) ब्राह्मण

Q3. वैदिक काळातील एका विदुषी स्त्रीचे नाव आहे-

(a) इंद्राणी

(b) सुवर्णा

(c) लोपामुद्रा

(d) नंदिनी

Q4. खालीलपैकी कोणत्या पर्वताचा उल्लेख ऋग्वेदात नाही?

(a) हिमालय पर्वत

(b) विंध्य पर्वत

(c) अँडीज पर्वत

(d) स्तूप पर्वत

Q5. वैदिक काळात आर्यांची मुख्य भाषा कोणती होती?

(a) बंगाली

(b) पाली

(c) मराठी

(d) संस्कृत

Q6. आर्य भारतात प्रथम कोठे स्थायिक झाले?

(a) गांधार प्रदेशात

(b) दख्खन

(c) सप्त  सिंधू प्रदेश

(d) बंगालमध्ये

Q7. वैदिक काळात देवाणघेवाण करण्याचे मुख्य माध्यम कोणते होते?

(a) उंट

(b) गाय

(c) घोडे

(d) कुत्रे

Q8. उत्तर वैदिक काळात उदयास आलेल्या शहराचे नाव आहे –

(a) मगध

(b) सुरत

(c) अमरावती 

(d) हस्तिनापूर

Q9. वैदिक साहित्यात कोणत्या नदीला वितस्ता म्हणतात?

(a) रवी

(b) शतद्रु

(c) घागरा 

(d) झेलम

Q10. ‘संहिता’ शब्दाचा अर्थ –

(a) समान

(b) संकलन

(c) संबंध 

(d) संहार

Solutions –

S1.Ans.(a)

Sol. वैदिक समाज पितृसत्ताक होता. वैदिक समाजात सामान्यतः एकपत्नीत्व प्रचलित होते.

S2.Ans.(c)

Sol. वेदांच्या शेवटच्या भागाला उपनिषद म्हणतात. वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार संख्येने आहेत. प्रत्येक वेद पुन्हा संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषदे या चार मुख्य भागांमध्ये विभागलेला आहे.

S3.Ans.(c)

Sol. वैदिक काळातील विदुषी स्त्री  – लोपामुद्रा आहे. पृथ्वी, मरुत, रुद्र, अग्नि, उषा, इंद्र आणि सूर्य हे वैदिक काळातील मुख्य देवता होते.

S4.Ans.(b)

Sol.ऋग्वेदात विंध्य पर्वताचा उल्लेख नाही. या वेदात अग्नि, इंद्र, मित्र, वरुण आणि इतर देवतांना समर्पित श्लोक आहेत.

S5.Ans.(d)

Sol. वैदिक काळात संस्कृत ही आर्यांची मुख्य भाषा होती. वैदिक काळातील सामान्य नाण्यांना ‘निष्क’ आणि ‘मान’ म्हणतात.

S6.Ans.(c)

Sol. आर्य भारतातील सप्त सिंधू प्रदेशात प्रथम स्थायिक झाले. ऋग्वेदात ‘सप्त सिंधू’ आणि अफगाणिस्तानातील काही ठिकाणांचा उल्लेख आहे. उदा – कृमू, कुवा आणि गोमती इ.

S7.Ans.(b)

Sol. वैदिक काळात देवाणघेवाणीचे मुख्य माध्यम गाय होते.

S8.Ans.(d)

Sol. हस्तिनापूर हे उत्तर वैदिक काळात निर्माण झालेले शहर आहे. दोआबचा वरचा भाग कुरुंच्या ताब्यात गेला आणि त्यांनी आपली राजधानी हस्तिनापूरला हलवली.

S9.Ans.(d)

Sol. वैदिक साहित्यात झेलम नदीला वितस्ता म्हणतात. पुन्हा प्राचीन ग्रीसमध्ये ही नदी Hydaspi म्हणून ओळखली जात असे.

S10.Ans.(b)

Sol. संहिता शब्दाचा अर्थ संकलन असा आहे. हा संस्कृत शब्द आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

प्राचीन भारताचा इतिहास या विषयाचे MPSC परीक्षेत किती महत्व आहे ?

प्राचीन भारताचा इतिहास या विषयाचे MPSC परीक्षेत अतिशय महत्व आहे. यावर परीक्षेत 5 -6 प्रश्न हमखास विचारले जातात.

चार वेद कोणते आहेत ?

ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद व अथर्ववेद हे चार वेद आहेत.