Marathi govt jobs   »   Result   »   MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022...
Top Performing

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर, अंतिम निवड यादी डाउनलोड करा

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 09 मे 2024 रोजी MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 अंतिम निवड व शिफारसपात्र उमेदवारांची यादी जारी केली आहे. MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 बसलेले उमेदवार याची खूप दिवसापासून वाट बघत होते. या लेखात MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल : विहंगावलोकन

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचे विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
भरतीचे नाव महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा
परीक्षेचे नाव महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022
परीक्षा पद्धती ऑफलाईन
MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 निकाल 09 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in.

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 09 मे 2024 रोजी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 अंतिम निवड व शिफारसपात्र उमेदवारांची यादी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर @mpsc.gov.in जारी केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करू शकतात.

परीक्षेचे नाव अंतिम निवड यादी शिफारसपात्र उमेदवारांची यादी
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी सूचना

  • उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
  • प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठयर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पदासाठीची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल O.A. 1479/2023 न्यायिक प्रकरण व समांतर आरक्षणाच्या व अन्य मुद्दयांसंदर्भात विविध मा.न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
  • सदर शिफारस यादीनुसार आरक्षित पदांवर उमेदवारांची शिफारस विहित प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
  • प्रस्तुत अंतिम निकालात अर्हताप्राप्त / शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने (Online) विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर, अंतिम निवड यादी डाउनलोड करा_4.1

FAQs

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल बद्दल सविस्तर माहिती या लेखात मिळेल.

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल कधी जाहीर झाला?

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल 10 मे 2024 रोजी जाहीर झाला.