Table of Contents
MPSC Exam Pattern Changed: Maharashtra Public Service Commission conducts MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, MPSC Technical Services, and other department exams every year. MPSC conducts all these exams by taking various technical measures. Through this, the vacancies in various departments are filled. Now the Maharashtra Public Service Commission has changed the exam pattern. In this article, we will discuss detailed information about Revise Exam Wise MPSC Exam Pattern 2022 in detail.
MPSC Exam Pattern Changed | |
Category | Latest Update |
Commission | MPSC |
Name | MPSC Exam Pattern Changed |
Exam Name |
|
MPSC Revise Exam Pattern Declared on | 01st August 2022 |
New Exam Pattern Applicable From | All Exam 2023 Notification Onwards |
MPSC Exam Pattern Changed
MPSC Exam Pattern Changed: महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी त MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), MPSC Technical Services (एमपीएससी तांत्रिक सेवा) व इतर विभागाच्या परीक्षेचे आयोजन करते. आजपर्यंत विविध तांत्रिक उपाययोजना करून MPSC या सर्व परीक्षा घेत असते. यामधून विविध विभागातील रिक्त पदांची पदभरती केली जाते. आता या परीक्षा पद्धतीत (MPSC Exam Pattern Changed) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदल केला आहे. आज या लेखात आपण Revise Exam Wise MPSC Exam Pattern 2022 पाहणार आहे. या लेखात तुम्हाला परीक्षेप्रमाणे झालेले बदल सांगितले आहे.
Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination | महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा
Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Exam: Revise Exam Wise MPSC Exam Pattern 2022 मधील पहिला बदल म्हणजे आता राज्यसेवा मधील गट अ व राजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत झालेले बदल खालीलप्रमाणे आहेत.
- राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील पदभरतीकरीता ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा’ (Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
- स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गाकरीता यापुढे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
Maharashtra Civil Services Gazetted Mains Examination | महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित मुख्य परीक्षा
Maharashtra Civil Services Gazetted Mains Examination: राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची 2023 पासून होणार असे सांगितले. यासंबंधी एक प्रसिद्धीपत्रक MPSC ने 08 जून 2022 रोजी जाहीर केले. MPSC ने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय दिनांक 24 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबत आयोगाकडून खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. 2023 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची होणार आहे. त्यामध्ये एकूण 09 पेपर असतील. राज्यसेवा मुख्य परीक्षेचे विषय व त्यांचे गुण खालील तक्त्यात दिले आहे. सोबतच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण MPSC ने जाहीर केलेली नोटीस पाहू शकता.
पेपर | गुण |
अहार्ताकारी पेपर | |
भाषा पेपर 1 – मराठी | 300 (25% गुणांसह अहार्ताकारी) |
भाषा पेपर 2 – इंग्रजी | 300 (25% गुणांसह अहार्ताकारी) |
गुणवत्ता यादीकरिता विचारात घ्यायचे पेपर | |
निबंध (मराठी किवा इंग्रजी मध्यम | 250 |
सामान्य अध्ययन पेपर 1 | 250 |
सामान्य अध्ययन पेपर 2 | 250 |
सामान्य अध्ययन पेपर 3 | 250 |
सामान्य अध्ययन पेपर 4 | 250 |
वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 | 250 |
वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2 | 250 |
एकूण गुण | 1750 |
मुलाखत | 275 |
एकूण गुण | 2025 |
Click here to View MPSC Rajyaseva Syllabus 2022 (Updated)
Maharashtra Non-Gazetted Services Combined Preliminary Examination | महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
Maharashtra Non-Gazetted Services Combined Preliminary Exam: Revise Exam Wise MPSC Exam Pattern 2022 मधील दुसरा बदल म्हणजे आता सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत झालेले बदल खालीलप्रमाणे आहेत.
- सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ (Maharashtra Non-Gazetted Services Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तसेच, सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
- महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरीता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरीता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित संवर्गातील पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील व त्याच्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन प्रत्येक संवर्गाकरीता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.
- महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या / वेतनश्रेणी, दर्जा, इत्यादी बाबी लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा’ तसेच ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा’ या नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित करण्यात येतील.
- महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा’ तसेच ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा’ या मुख्य परीक्षांच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येतील.
Maharashtra Non-Gazetted Services Mains Examination | महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा
Maharashtra Non-Gazetted Services Combined Mains Exam: महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेत झालेले बदल खालीलप्रमाणे आहेत.
- महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा करीता ‘मराठी व इंग्रजी’ तसेच ‘सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी’ अशा दोन पेपर्सच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.
- महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाकरीता उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच अर्हतेवर आधारित पसंतीक्रम घेण्यात येईल.
- मुख्य परीक्षेकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराकडून भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) घेण्यात येईल व त्याच्या आधारे संबंधित संवर्गाकरीता निवडप्रक्रिया राबविण्यात येईल.
- पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरीता शारीरिक चाचणी 70 गुणांची अर्हताकारी असेल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येईल.
Revise MPSC Exam Pattern 2022 PDF | MPSC परीक्षा पद्धतीमध्ये झालेला बदल PDF
Revise MPSC Exam Pattern 2022 PDF: MPSC ने 01 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर केलेल्या MPSC परीक्षा पद्धतीमध्ये झालेला बदल या लेखात देण्यात आले आहे. Revise MPSC Exam Pattern 2022 PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Click here to download Revise MPSC Exam Pattern 2022 PDF
Note:
- उपरोक्त बदल सन 2023 करीता आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येतील.
- प्रस्तुत बदलांच्या अनुषंगाने संबंधित परीक्षांची परीक्षा योजना, अर्ज स्वीकारण्याची पध्दत, अर्हता, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादीबाबतचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
See also
FAQs: MPSC Exam Pattern Changed
Q1. MPSC Exam Pattern Changed झाला का?
Ans. होय, MPSC Exam Pattern Changed झाला आहे.
Q2. Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination अंतर्गत कोणत्या पदांची परीक्षा होणार आहे?
Ans. Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination अंतर्गत राजपत्रित गट अ व राजपत्रित गट ब पदांची संयुक्त परीक्षा होणार आहे.
Q3. Maharashtra Non-Gazetted Services Combined Preliminary Examination अंतर्गत कोणत्या पदांची परीक्षा होणार आहे?
Ans.Maharashtra Non-Gazetted Services Combined Preliminary Examination अंतर्गत राजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे
Q4. MPSC संदर्भात सर्व अपडेट मी कुठे पाहू शकतो?
Ans. MPSC संदर्भात सर्व अपडेट आपण Adda247 च्या वेबसाईटवर आणि App वर पाहू शकता.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official website of MPSC | http://www.mpsc.gov.in/ |