Table of Contents
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 अपडेट
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 बद्दल दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार परीक्षेच्या अंतिम निकालानुसार शिफारसपात्र व ना शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक आणि स्कॅन उत्तरपत्रिका त्यांच्या खात्यात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणी करण्यासाठी लिंक देखील उपलब्ध करून दिलेली आहे. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 चा अंतिम निकाल आयोगाने 01 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केला. या लेखात महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 अपडेट बद्दल सर्व माहिती दिलेली आहे.
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 अपडेट: विहंगावलोकन
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 अपडेट: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महाराष्ट्र लोकसेवा आयोग |
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
लेखाचे नाव | महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 अपडेट |
अधिकृत संकेतस्थळ | www.mpsc.gov.in |
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 प्रसिद्धीपत्रक
दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 बद्दल प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. ज्यानुसार परीक्षेच्या अंतिम निकालानुसार शिफारसपात्र व ना शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक आणि स्कॅन उत्तरपत्रिका त्यांच्या खात्यात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणी करण्यासाठी लिंक देखील उपलब्ध करून दिलेली आहे. उमेदवार अधिकृत प्रसिद्धीपत्रक खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 प्रसिद्धीपत्रक PDF
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022: गुणांची फेरपडताळणीसाठी अर्ज करण्याच्या स्टेप्स
गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करु इच्छिणा-या उमेदवारांना फेरपडताळणीकरीता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरीता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे :-
- आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील “ONLINE FACILITIES” मधील Retotaling of Marks या लिंकवर क्लिक करावे.
- परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करावे.
- Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
- उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रातील गुणांची फेरपडताळणी करावयाची असलेल्या परीक्षेची निवड करून Save बटनवर क्लिक करावे.
- सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करावे.
गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 ते दिनांक 2 डिसेंबर, 2023, 23.59 या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support- online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
- MPSC अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क 2023 शी संबंधित इतर लेख