Marathi govt jobs   »   MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व...   »   MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व...

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पात्रता निकष 2024, पदानुसार पात्रता निकष तपासा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पात्रता निकष 2024

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पात्रता निकष 2024: MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पात्रता निकष 2024 मध्ये नागरिकत्व, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता आणि शारीरिक पात्रता यांचा समावेश आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 29 डिसेंबर 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी 05 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना ही 274 पदांच्या भरतीकरिता जाहीर झाली आहे. या लेखात MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पात्रता निकष बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पात्रता निकष: विहंगावलोकन

दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना जाहीर करण्यात आली. उमेदवार या लेखात MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना चा सर्व तपशील तपासू शकतात.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पदाचे नाव गट अ व ब मधील विविध पदे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
 एकूण पदे 274
लेखाचे नाव MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना
अर्ज सुरु होण्याची तारीख 05 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना: महत्वाच्या तारखा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना साठी ऑनलाईन अर्ज 05 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना 15 डिसेंबर 2023
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 जानेवारी 2024
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तारीख 28 एप्रिल 2024
राज्य सेवा मुख्य परीक्षा तारीख 2024 14 ते 16 डिसेंबर 2024
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 23 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 28 ते 31 डिसेंबर 2024

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना PDF

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 29 डिसेंबर 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी 05 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना PDF

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024: रिक्त जागेचा तपशील 

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 रिक्त जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

संवर्ग रिक्त पदे
राज्यसेवा 205
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 26
महाराष्ट्र वनसेवा 43
एकूण 274

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024: पात्रता निकष

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी फॉर्म भरण्याआधी आपणास सर्व पदांसाठी आवश्यक पात्रता निकष तपासणे गरजेचे आहे. ज्यात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा  यांचा समावेश होतो. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

नागरिकत्व

  • उमेदवार भारताचा नागरिक असावा.

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024साठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक-
    • निरीक्षण अधिकारी/परिमंडळ अधिकारी, गट-ब वगळता इतर सर्व संवर्गासाठी – दिनांक 1 एप्रिल, 2024
    • निरीक्षण अधिकारी/परिमंडळ अधिकारी, गट-ब – दिनांक 25 जानेवारी, 2024
  • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
  • मागास प्रवर्ग – 19 ते 43 वर्षे
  • खेळाडू – 19 ते 43 वर्षे
  • दिव्यांग  – 19 ते 45 वर्षे
  • शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सनिव 2023/प्र.क्र.14/कार्या-12, दिनांक 03 मार्च, 2023 अनुसार कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.

शैक्षणिक अर्हता

पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट अ
  • सांविधिक विद्यापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
  • इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकांऊटस ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
  • इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट ॲण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
  • सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा
  • अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए).
उद्योग उप संचालक, तांत्रिक, गट अ
  • सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा
  • विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
सहायक वनसंरक्षक
  • खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयाची मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी :-

(1) वनस्पतीशास्त्र (2) रसायनशास्त्र (3) वनशास्त्र (4) भूशास्त्र (5) गणित (6) भौतिकशास्त्र (7) सांख्यिकी (8) प्राणिशास्त्र (9) उद्यानविद्या (10) पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा

  • कृषि, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर
वनक्षेत्रपाल
  • वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा
  • विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक. (तीन) विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांक एफएसटी-02/15/प्र.क्र.46/फ-4, दिनांक 11 फेब्रुवारी, 2016 नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.
  • शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांक: एफएसटी-09/18/प्र.क्र.366/फ-4, दिनांक 8 सप्टेंबर, 2021 अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेवून उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपाल संवर्ग/पदासाठी पात्र असतील :- (1) BE/B.Tech. Automobile Engineering, (2) BE/B.Tech. Power, (3) BE/B.Tech. Production, (4) BE/B.Tech. Metallurgy and Material, (5) BE/B.Tech. Textile, (6) BE- Information Technology, (7) BE- Instrumentation, (8) B.Sc.- Biotechnology, (9) B. Pharmacy, (10) B.Tech. Food Science
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
  • शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-2013/ (45/13)/भाग-1/तांशि-2, दिनांक 18 ऑक्टोबर, 2016 नुसार खालील शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
    • B.E./B. Tech. (Civil and Water Management)
    • B.E. / B. Tech. (Civil and Environmental)
    • B.E./ B. Tech. (Structural)
    • B.E./B.Tech. (Construction Engineering/Technology)

शारीरिक अर्हता

 

पदाचे नाव पुरुष उमेदवारांकरिता महिला उमेदवारांकरिता
1.सहायक वनसंरक्षक, गट अ

2.वनक्षेत्रपाल, गट ब

अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार

उंची- 163 सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी) 

छाती- न फुगवता 79 सें.मी. (कमीत कमी) फुगविण्याची क्षमता- न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सें.मी. पेक्षा कमी नसावा.

उंची – 150 सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार

उंची – 152.5 सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

छाती – न फुगवता 79 सें.मी. (कमीत कमी) फुगविण्याची क्षमता- न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सें.मी. पेक्षा कमी नसावा.

उंची – 145 सें.मी. पेक्षा कमी नसावी
दृष्टी :- सुधारणेनंतर (After Correction) + 4.00 OD सह प्रत्येक डोळयाची दृष्टितीक्ष्णता (Visual Acuity) 6/6 असावी. बाह्य डोळयावर कोणतेही रोग संक्रमण झालेले नसावे किंवा तिरळेपणा नसावा.
सहायक वनसंरक्षक, गट-अ करीता पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 कि.मी. व 14 कि.मी. अंतर चार तासांत चालून पूर्ण करण्याची शारिरीक क्षमता असणे आवश्यक.

वनक्षेत्रपाल, गट-ब पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 कि.मी. व 16 कि.मी. अंतर चार तासांत चालून पूर्ण करण्याची शारिरीक क्षमता असणे आवश्यक.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Pre
MPSC Pre

Sharing is caring!

FAQs

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना कधी जाहीर झाली?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना किती पदांसाठी जाहीर झाली?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना 274 पदांसाठी जाहीर झाली.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पात्रता निकष मला कोठे मिळेल?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पात्रता निकष या लेखात दिला आहे.