Table of Contents
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेचे स्वरूप
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेचे स्वरूप: महाराष्ट्र लोकसेवा आयोग सर्वसाधारणपणे दरवर्षी MPSC राज्यसेवा, MPSC तांत्रिक अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, निरीक्षक, वैधमापन शास्त्र इ. संवर्गातील गट अ आणि गट ब (राजपत्रित), पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेते. ही परीक्षा राज्य शासनाच्या सेवेतील विविध पदांकरिता घेण्यात येते. ही पदे शासनाच्या मागणीनुसार आणि पदांच्या उपलब्धतेनुसार दरवर्षी भरली जातात. MPSC राज्यसेवा, MPSC तांत्रिक अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, निरीक्षक, वैधमापन शास्त्र इत्यादी संवर्गासाठी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा आणि स्वतंत्र मुख्य परीक्षेचे सविस्तर MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे सविस्तर अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, निवड प्रक्रिया इत्यादींबद्दल सविस्तर माहिती असणे खूप गरजेचे असते.
MPSC राजपत्रित नागरी सेवा 2024: निवडप्रक्रिया
MPSC राजपत्रित नागरी सेवा 2024: निवडप्रक्रिया: MPSC राज्यसेवा, MPSC तांत्रिक अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, इ. संवर्गासाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 घेण्यात येणार आहे. त्यानंतर स्वतंत्र मुख्य परीक्षा आणि शेवटी मुलाखत अश्या 3 टप्प्यात MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2024 घेण्यात येणार आहे. या लेखात आपण MPSC राज्य सेवा परीक्षेच्या तीनही टप्प्यांचे तपशीलवार स्वरूप पाहणार आहोत.
MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे तपशीलवार स्वरूप
MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे तपशीलवार स्वरूप: वर सांगितल्याप्रमाणे MPSC नागरी सेवा परीक्षा 2024 (परीक्षा) एकूण 3 टप्प्यात घेतली जाणार आहे, ते खालीलप्रमाणे आहेत;
मराठी मध्ये:
अनु.क्र. |
संवर्ग |
संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण | मुख्य परीक्षेचे गुण | मुलाखतीचे गुण |
01 | MPSC राज्यसेवा | 400 | 800 | 100 |
02 | MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवा | 400 | 50 | |
03 | MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा | 400 | 50 | |
04 | महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा | 400 | 50 | |
05 | महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा | 400 | 50 | |
06 | महाराष्ट्र कृषि सेवा | 400 | 50 | |
07 | महाराष्ट्र वन सेवा | 400 | 50 | |
08 | अन्न व औषध प्रशासकीय सेवा | 400 | 50 | |
09 | निरीक्षक वैधमापनशास्त्र | 400 | 50 |
- यातील पहिला टप्पा अर्थात पूर्व परीक्षा हा केवळ मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्यासाठी घेतली जाते.
- अंतिम निकालात या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जात नाही.
- पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांस मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येते.
- अंतिम निकालात उमेदवारांची क्रमवारी त्यांनी मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांमध्ये मिळविलेल्या गुणांवरून ठरविली जाते.
MPSC राजपत्रित नागरी सेवा पूर्व संयुक्त परीक्षेचे स्वरूप
MPSC राजपत्रित नागरी सेवा पूर्व संयुक्त परीक्षेचे स्वरूप: MPSC राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 400 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश (1/4) मार्क कमी होतात. पेपर 1 (GS) मध्ये इतिहास, भूगोल, पर्यावरण, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आहेत तर पेपर 2 मध्ये (CSAT) हा आहार्ताकारी (Qualifying in Nature) आहे.
पेपर | गुण | प्रश्नसंख्या | माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
पेपर 1 (अनिवार्य) | 200 | 100 | मराठी व इंग्रजी | 2 तास |
पेपर 2 (अहर्ताकारी) | 200 | 80 | मराठी व इंग्रजी | 2 तास |
एकूण | 400 | 180 |
- परीक्षा ही वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
- प्रत्येक पेपरचा कालावधी हा 2 तासाचा असेल
- प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्रजी असेल
- पेपर क्रमांक 2 (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळविणे आवश्यक राहील.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप 2024
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप 2024: MPSC राज्यसेवा परीक्षेचा पूर्व परीक्षेनंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा. अंतिम निकाल जाहीर करतांना मुख्य परीक्षा आणि मुलाखत यातील गुण ग्राह्य धरले जातात. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेची काठीण्य पातळी ही उमेदवाराचा विविध विषयातील अभ्यास तपासणारी असते त्यामुळे दिलेल्या विषयातील सखोल माहिती उमेदवाराला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या परीक्षेत उमेदवाराचे मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान देखील तपासले जाते. या परीक्षेतून एकूण पदसंख्येच्या साधारणपणे 3 ते 4 पट उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात व त्यांच्यातून अंतिम उमेदवारांची निवड केली जाते. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे;
मराठी मध्ये:
पेपर क्र. | विषय | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | कालावधी | स्वरूप | |
1 |
भाषा पेपर 1
|
मराठी | — | 50 |
उच्च माध्यमिक शालान्त
|
मराठी |
3 तास
|
पारंपरिक / वर्णनात्मक
|
इंग्रजी | — | 50 | इंग्रजी | |||||
2 |
भाषा पेपर 2
|
मराठी | 50 | 50 |
पदवी
|
मराठी |
1 तास
|
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
|
इंग्रजी | 50 | 50 | इंग्रजी | |||||
3 | सामान्य अध्ययन – 01 | 150 | 150 | पदवी | मराठी व इंग्रजी | 2 तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी | |
4 | सामान्य अध्ययन – 02 | 150 | 150 | पदवी | मराठी व इंग्रजी | 2 तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी | |
5 | सामान्य अध्ययन – 03 | 150 | 150 | पदवी | मराठी व इंग्रजी | 2 तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी | |
6 | सामान्य अध्ययन – 04 | 150 | 150 | पदवी | मराठी व इंग्रजी | 2 तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी | |
एकूण | 800 |
टीप:
- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- पारंपरिक स्वरुपाच्या परीक्षेच्या वेळी आयोगाकडून उमेदवारांना पुरविण्यात येणा-या उत्तरपुस्तिकेमध्ये दिलेल्या पृष्ठांवरच उत्तरे नमूद करणे आवश्यक आहे.
मुख्य उत्तरपुस्तिकेव्यतिरिक्त उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत पुरवणी उत्तरपुस्तिकेचा पुरवठा करण्यात येणार नाही. - भाषा पेपर क्रमांक 1 मधील दोन्ही भागांकरीता (मराठी व इंग्रजी) एकच संयुक्त प्रश्नपुस्तिका राहील.
- भाषा पेपर क्रमांक 2 मधील दोन्ही भागांकरीता (मराठी व इंग्रजी) एकच संयुक्त प्रश्नपुस्तिका राहील. त्यामध्ये खालीलप्रमाणे दोन विभाग राहतील:
- मराठी भाषेचे प्रश्न क्रमांक 1 ते 50 आणि
- इंग्रजी भाषेचे प्रश्न क्रमांक 51 ते 100
- पारंपरिक / वर्णनात्मक स्वरुपाच्या पेपर क्रमांक 1 (मराठी व इंग्रजी) करीता भाग-1 (मराठी) व भाग-2 (इंग्रजी) साठी दोन स्वतंत्र उत्तरपुस्तिका पुरविण्यात येतील. मराठी भाषेसाठी तसेच इंग्रजी भाषेसाठी स्वतंत्र उत्तरपुस्तिकांचा वापर करणे अनिवार्य आहे.
- भाषा पेपर क्रमांक 1 मधील भाग-1 (मराठी) च्या उत्तरपुस्तिकेमध्ये भाग-2 (इंग्रजी) चे प्रश्न सोडविल्यास किंवा भाग-2 (इंग्रजी) च्या उत्तरपुस्तिकेमध्ये भाग-1 (मराठी) चे प्रश्न सोडविल्यास, अशी उत्तरे तपासली जाणार नाहीत व ती दुर्लक्षित केली जातील.
- पारंपरिक स्वरुपाच्या उत्तरपुस्तिकेमध्ये उमेदवाराने प्रश्नांचे उपप्रश्न सोडविताना (अ, ब, क, ड किंवा 1, 2, 3, 4) सलगरित्या सोडवावे. एक उपप्रश्न एका पानावर, तर दुसरा उपप्रश्न काही पृष्ठे सोडून अथवा अन्य पृष्ठावर सोडविल्यास असा उपप्रश्न दुर्लक्षित करण्यात येईल.
- भाषा पेपर क्रमांक 2 (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) मधील दोन्ही भागांकरीता एकच सामाईक उत्तरपत्रिका राहील.
MPSC राजपत्रित नागरी सेवा मुलाखत / व्यक्तिमत्व चाचणी
MPSC राजपत्रित नागरी सेवा मुलाखत / व्यक्तिमत्व चाचणी: MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचा सर्वात अंतिम टप्पा म्हणजे मुलाखत अथवा व्यक्तिमत्व चाचणी. या मध्ये मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची राज्यातील विविध केंद्रावर आयोगातर्फे मुलखात अथवा व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाते. यामध्ये उमेदवाराच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचा अभ्यास केला जातो व त्यानुसार त्यांचे गुणांकन होते. ही मुलाखत राज्यसेवा मुख्य परीक्षेत 100 तर इतर परीक्षेत 50 गुणांची असते.
MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप: डाऊनलोड करा
MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप PDF: MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे तपशीलवार स्वरूप पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप PDF
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
GMC नागपूर भरती 2024 | SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 | सोलापूर महानगरपालिका भरती 2023 |