Marathi govt jobs   »   MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व...   »   MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व...
Top Performing

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अपडेट, अधिकृत सूचना जारी

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अपडेट

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अपडेट: दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी आयोगाने MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 संबंधित एक शुद्धिपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार कृषी व कृषी शास्त्र ही पदवी धरण करणारे उमेदवार सहायक वन संरक्षक व वन क्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असतील.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 29 डिसेंबर 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना जाहीर केली होती. या लेखात MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अपडेट बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अपडेट: विहंगावलोकन

दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 संबंधित शुद्धिपत्रक जाहीर करण्यात आले. उमेदवार या लेखात MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अपडेटचा सर्व तपशील तपासू शकतात.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अपडेट: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पदाचे नाव गट अ व ब मधील विविध पदे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
 एकूण पदे 274
लेखाचे नाव MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अपडेट
अर्ज सुरु होण्याची तारीख 05 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024: महत्वाच्या तारखा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना साठी ऑनलाईन अर्ज 05 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना 15 डिसेंबर 2023
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 जानेवारी 2024
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तारीख 28 एप्रिल 2024
राज्य सेवा मुख्य परीक्षा तारीख 2024 14 ते 16 डिसेंबर 2024
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 23 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 28 ते 31 डिसेंबर 2024

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 शुद्धिपत्रक PDF

दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी आयोगाने MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 संबंधित एक शुद्धिपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार कृषी व कृषी शास्त्र ही पदवी धरण करणारे उमेदवार सहायक वन संरक्षक व वन क्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असतील. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन सदर शुद्धिपत्रक डाउनलोड करू शकतात.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 शुद्धिपत्रक PDF

शुद्धीपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे

  • सहायक वनसंरक्षक, गट-अ व वनक्षेत्रपाल, गट-ब या संवर्गाकरीता कृषी व कृषीशास्त्र ही पदवी धारण करणा-या उमेदवारांना सदर दोन्ही संवर्गाकरीता अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी.
  • कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाच्या दिनांक 7 सप्टेंबर, 2011 व दिनांक 22 एप्रिल, 2021 रोजीच्या शासन निर्णयातील विशिष्ट शैक्षणिक अर्हता बी.एस. कृषी/बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी) व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून घोषित केलेली शैक्षणिक अर्हता सहायक वन संरक्षक संवर्गाच्या दिनांक 12 मार्च, 1998 व दिनांक 17 ऑगस्ट, 2009 व वनक्षेत्रपाल संवर्गाच्या दिनांक 5 फेब्रुवारी, 2015 रोजीच्या सेवाप्रवेश नियमामध्ये समाविष्ठ केलेले नाही. त्यामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाने दिनांक 7 सप्टेंबर, 2011 व दिनांक 22 एप्रिल, 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये विशिष्ट शैक्षणिक अर्हता बी.एस. कृषी/बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी) व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून घोषित केलेली शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांना सहायक वनसंरक्षक, गट-अ व वनक्षेत्रपाल, गट-ब संवर्गाच्या पदभरतीसाठी ग्राह्य धरणे योग्य होणार नाही.
  • यानुसार उपरोक्त अभिप्रायाच्या अनुषंगाने वनें सेवेतील सहायक वनसंरक्षक, गट-अ व वनक्षेत्रपाल, गट-ब संवर्गाकरीता कृषी व कृषीशास्त्र ही पदवी धारण करणा-या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
  • तसेच मूळ जाहिरातीस अनुसरुन यापूर्वीच अर्ज सादर केलेल्या कृषी अथवा कृषीशास्त्र अर्हताधारक उमेदवारांनी वन सेवेतील कोणत्याही एका संवर्गाकरीता विकल्प सादर केला असल्यास सदर उमेदवाराचा वन सेवेतील दुस-या संवर्गाकरीता देखील विकल्प ग्राह्य समजण्यात येईल. तसेच, प्रस्तुत सेवेच्या मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना पुन्हा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात येईल.
  • जाहिरातीतील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
GMC नागपूर भरती 2024 SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 सोलापूर महानगरपालिका भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Pre
MPSC Pre

Sharing is caring!

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अपडेट, अधिकृत सूचना जारी_4.1

FAQs

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा कधी होणार आहे?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 रोजी होणार आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अपडेट बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अपडेट बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.