Marathi govt jobs   »   Result   »   MPSC गट ब व क प्रशिक्षण...

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 जाहीर

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 जाहीर: महाज्योतीने दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी 27 व 28 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या MPSC संयुक्त गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 जाहीर केला आहे. या प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी 6 शिफ्ट्स मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या लेखात MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात निकाल PDF चा देखील समावेश आहे.

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023: विहंगावलोकन 

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023: विहंगावलोकन 
श्रेणी निकाल
भरती मंडळ महाज्योती
लेखाचे नाव MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023
पदाचे नाव MPSC गट ब व गट क
पात्र उमेदवारांची संख्या 27418
MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 17 नोव्हेंबर 2023
संकेतस्थळ https://mahajyoti.org.in/en/home/

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023: परिपत्रक 

महाज्योतीने 17 नोव्हेंबर 2023 रोजी MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 शी निगडीत परिपत्रक जारी केले आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे खाली दिलेले आहेत.

  • दि. 27 ऑक्टोबर 2023 व दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी MPSC Group B & C प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकुण 6 शिफ्ट मध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती.
  • परीक्षेकरीता एकुण 27418 उमेदवार पात्र होते त्यातील 14775 उमेदवार हे परीक्षेकरीता हजर होते.
  • महाज्योतीने MPSC Group B & C प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका प्रसिध्द करून विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविलेले होते.
  • विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या आक्षेप परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला पाठविण्यात आले व आवश्यक त्या सुधारणा करून अंतिम उत्तरपत्रिका तयार करण्यात आली.
  • MPSC गट ब व क प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकुण 6 शिफ्ट मध्ये परीक्षा घेण्यात आल्याने गुणांचे Normalization करण्यात आल्याचे परीक्षा एजन्सीने कळविलेले आहे.
  • उपरोक्त प्रक्रिया करताना ज्या प्रश्नसंचाची काठिण्य पातळी अधिक होती अश्या संचातील विद्यार्थ्यांचे गुण हे गुणांच्या Normalization प्रक्रियेअंती वाढले आहेत. तर ज्या प्रश्नसंचाची काठिण्य पातळी कमी होती अश्या संचातील विद्यार्थ्यांचे गुण हे गुणांच्या Normalization प्रक्रियेअंती कमी झालेले आहेत हे विद्यार्थ्यांच्या निर्देशनास आणून देण्यात येत आहे.
  • Normalization प्रक्रियेमधून उमेदवारास प्राप्त होणारे गुण Normalization Score हेच अंतिम निकालासाठी ग्राह्य धरण्यात आलेले आहे.
  • दि.27/10/2023 व 28/10/2023 MPSC गट ब व क प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा परीक्षेतील बैठक क्रमांकानुसार प्रारुप निकाल या परिपत्रकासोबत जाहीर करण्यात येत आहे.
  • MPSC गट ब व क प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या निकालावर काही आक्षेप असल्यास त्यासाठी स्वतंत्र मेल आयडी तयार करण्यात आलेला असुन त्याच मेल आयडी वर आपले आक्षेप नोंदवावेत इतर मेल वर आक्षेप पाठवू नयेत.
  • महाज्योतीने प्रसिध्द केलेल्या प्रारूप निकालाबाबत काही आक्षेप असल्यास mpscpartbmahajyoti@gmail.com या मेलवर दि. 19/11/2023 रोजी दु.05.00 वाजेपर्यंत पाठवावेत किंवा 9205080766, 9818106770 या क्रमांकावर संपर्क करावा.
  • प्रशिक्षणासाठीची निवड यादी ही महाज्योतीने प्रसिध्द केलेल्या सामाजिक संवर्ग निहाय आरक्षण व समांतर आरक्षण या आधारावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023: परिपत्रक PDF

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल PDF 2023

महाज्योतीने दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी 27 व 28 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या MPSC संयुक्त गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 जाहीर केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन निकाल PDF डाउनलोड करू शकतात.

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल PDF 2023

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 कधी जाहीर झाला?

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 17 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षा कधी झाली होती?

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षा 27 व 28 ऑक्टोबर 2023 रोजी झाली होती.