Marathi govt jobs   »   Result   »   MPSC गट ब व क प्रशिक्षण...

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023 जाहीर, निवड यादी PDF डाउनलोड करा

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023 जाहीर

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023 जाहीर: महाज्योतीने दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी 27 व 28 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या MPSC संयुक्त गट ब व क पूर्व प्रशिक्षणासाठी उमेदवारांची प्रारूप निवड यादी जाहीर केली आहे. महाज्योतीने दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी 27 व 28 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या MPSC संयुक्त गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 जाहीर केला होता. या प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी 6 शिफ्ट्स मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या लेखात MPSC गट ब व क प्रशिक्षणासाठी उमेदवारांची प्रारूप निवड यादी 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात निवड यादी PDF चा देखील समावेश आहे.

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023: विहंगावलोकन 

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023: विहंगावलोकन 
श्रेणी निकाल
भरती मंडळ महाज्योती
लेखाचे नाव MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023
पदाचे नाव MPSC गट ब व गट क
पात्र उमेदवारांची संख्या 1000
MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023 25 नोव्हेंबर 2023
संकेतस्थळ https://mahajyoti.org.in/en/home/

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023: परिपत्रक 

महाज्योतीने 25 नोव्हेंबर 2023 रोजी MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023 शी निगडीत परिपत्रक जारी केले आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे खाली दिलेले आहेत.

  1. यापूर्वी महाज्योतीचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांची नावे निकालातून वगळण्यात आलेली असून त्यांची यादी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
  2. संवर्ग निहाय यादी सारथी संस्थेला पाठवून सारथी संस्थेकडून लाभ घेतलेल्या उमेदवारांची नावे वगळण्यात येतील.
  3. उमेदवारांचे लिंग, नाव, प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ अशा नोंदणी बाबत अर्ज भरतांना चूक झाल्यास विद्यार्थ्यांनी ही बाब तातडीने महाज्योतीच्या निदर्शनास आणून द्यावी.
  4. यासह सदर परीक्षेकरिता अर्ज केलेल्या दिव्यांग व अनाथ उमेदवार म्हणून नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची यादी स्वतंत्रपणे संलग्न करण्यात येत आहे.
  5. दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या नावापुढे खालील प्रमाणे माहिती नमूद करावी. (संदर्भ : महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक-दिव्यांग 2022/प्र.क्र.83/16 अ दिनांक 29 मे 2019 नुसार.)
    1. अंध / अल्पदृष्टी
    2. कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलताअस्थिभंगता/मेंदूचा पक्षघात (Cerebral Palsy)/ कुष्ठरोग मुक्त (Leprosy cured) / शारीरिक वाढ खुंटणे (Dwarfism)/ आम्ल हल्लाग्रस्त (Acid Attack Victims) / स्नायू विकृती(Muscular dystrophy)
    3. स्वमग्नता (Autism)/ मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता (Specific learning disability) / विशिष्ट शिक्षण अक्षमता (Intellectual Disability) /मानसिक आजार
    4. वरील दिव्यांग प्रकार (अ) ते (ड) मधील बहिरेपणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्यांसाठी. (उपरोक्त प्रमाणे ‘अ’ ‘ब’ ‘क’ ‘ड’ अथवा इ अशी नोंद करावी)
  6. उमेदवाराने ‘अनाथ’ नमूद करून अर्ज केला असल्यास आपल्या नावापुढे ‘संस्थात्मक’ किंवा ‘संस्थाबाह्य’ अशी नोंद करून प्रमाणपत्र संलग्न करावे. (संस्थात्मक असेल तर ‘अ’ अथवा संस्थाबाह्य असेल तर ‘ब’ अशी नोंद करावी)
  7. विद्यार्थ्यांकडून माहिती प्राप्त होताच दिव्यांग आणि अनाथ प्रवर्गातून प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या उमेदवारांची यादी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
  8. MPSC गट ‘ब’ आणि ‘क’ परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता खालील प्रमाणे चार संस्था उपलब्ध आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना संस्था निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी दिनांक 25/11/2023 रोजी सायंकाळी 06.00 पर्यंत संस्थेची निवड करावी.
  9. प्रत्येक संस्थेत 250 विद्यार्थी प्रशिक्षण घेणार आहेत. त्यांनी मागणी केलेल्या प्रशिक्षण संस्थेत संख्याधिक्यामुळे प्रशिक्षण देणे शक्य नसल्यास विद्यार्थ्यांना दुसऱ्या संस्थेला संलग्न करण्यात येईल. याकरिता विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांचा विचार केला जाईल.

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेचा निकाल 2023: परिपत्रक PDF

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी संवर्गनिहाय PDF 2023

महाज्योतीने दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी 27 व 28 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या MPSC संयुक्त गट ब व क प्रशिक्षण परीक्षेपरीक्षेची निवड यादी 2023 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन निकाल PDF डाउनलोड करू शकतात.

संवर्ग  निवड यादी 
OBC-सामान्य येथे क्लिक करा 
OBC-महिला येथे क्लिक करा
VJ-सामान्य येथे क्लिक करा
VJ-महिला येथे क्लिक करा
NT B-सामान्य येथे क्लिक करा
NT B-महिला येथे क्लिक करा
NT C-सामान्य येथे क्लिक करा
NT C-महिला येथे क्लिक करा
NT D-सामान्य येथे क्लिक करा
NT D-महिला येथे क्लिक करा
SBC-सामान्य येथे क्लिक करा
SBC-महिला येथे क्लिक करा
दिव्यांग येथे क्लिक करा
अनाथ येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023 कधी जाहीर झाली?

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023 24 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC गट ब व क प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.