Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा...
Top Performing

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका | MPSC Group B Combine Prelims Exam 2020-21: Question Paper Analysis and Answer Key

Table of Contents

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका | MPSC Group B Combine Preliminary Examination 2020-21: Question Paper Analysis and Answer Key : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आली. प्रश्नपत्रिकेची एकूण काठीण्यपातळी मध्यम स्वरूपाची होती. या लेखात आपण पाहुयात; MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका | MPSC Group B Combine Preliminary Examination 2020-21: Question Paper Analysis and Answer Key

MPSC Group B Combine Preliminary Examination 2020-21: Question Paper Analysis and Answer Key

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 04 सप्टेंबर 2021, रविवार रोजी राज्यातील विविध केंद्रांवर गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. कोव्हीड-19 महामारीमुळे 2020 साली होणारी परीक्षा 04 सप्टेंबर 2021 ला घेण्यात आली. या लेखात आपण या परीक्षेचे सखोल विश्लेषण बघणार आहोत आणि ADDA 247 च्या टीम ने तयार केलेली उत्तरतालिका देखील तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण | MPSC Group B Combine Preliminary Examination 2020-21: Question Paper Analysis

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण | या लेखात आपण MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेले प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पाहणार आहोत. ते खालीलप्रमाणे.

एकूण प्रश्नसंख्या = 100

सामान्य अध्ययन = 85

गणित व बुद्धिमत्ता चाचणी = 15

अनु.क्र. विषयाचे नाव प्रश्न संख्या काठीण्य पातळी
01 सामान्य विज्ञान 15 मध्यम
02 इतिहास 15 मध्यम
03 भूगोल 15 मध्यम
04 राज्यव्यवस्था 10 मध्यम
05 अर्थव्यवस्था 15 मध्यम
06 चालू घडामोडी 15 मध्यम
07 गणित व बुद्धिमत्ता चाचणी 15 मध्यम ते कठीण
एकूण  100  मध्यम 

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: विश्लेषण | MPSC Group B Combine Prelims Exam 2020-21: Analysis

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: विश्लेषण | MPSC Group B Combine Prelims Exam 2020-21: Analysis: विषयानुसार विश्लेषण खाली दिले आहे

अर्थव्यवस्था: विश्लेषण | Economy: Analysis

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये अर्थव्यवस्था या विषयाचे 15 प्रश्न विचारले होते. अर्थव्यवस्था ची काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे;

  • योजना आणि धोरणे – 03
  • कृषी – 02
  • व्यापार – 02
  • दारिद्र्य – 02
  • सार्वजनिक वित्त – 01
  • वित्त आयोग – 01
  • राष्ट्रीय जीडीपी – 01
  • बँकिंग – 01
  • अहवाल – 01
  • आंतरराष्ट्रीय संस्था – 01

सामान्य विज्ञान: विश्लेषण | General Science: Analysis

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये सामान्य विज्ञान या विषयाचे 15 प्रश्न विचारले होते. सामान्य विज्ञान ची काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे;

1. भौतिकशास्त्र (Physics) – एकूण प्रश्न – 03

  • खगोलशास्त्र – 02
  • ऊर्जा – 01

2. रसायनशास्त्र (Chemistry) – एकूण प्रश्न – 03

  • आवर्त सारणी – 01
  • धातू मिश्रण – 01
  • स्फटिक – 01

3. जीवशास्त्र (biology) – एकूण प्रश्न – 09

  • सजीवांचे वर्गीकरण – 02
  • मानवी रोग – 03
  • वनस्पती रोग – 01
  • जैविक खते – 01
  • प्रतिजैविक – 01
  • संस्था – 01

गणित व बुद्धिमत्ता चाचणी: विश्लेषण | Quantitative Aptitude and Reasoning: Analysis

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे 15 प्रश्न विचारले होते. गणित व बुद्धिमत्ता चाचणी ची काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे;

1. गणित (एकूण प्रश्न – 07)

  • Data Interpretation – 01
  • Area – 01
  • Time and Work – 01
  • Ratio and Proportion – 01
  • Discount – 01
  • Problem on Ages – 01
  • Direction Sense – 01

2. बुद्धिमत्ता चाचणी (एकूण प्रश्न – 08)

  • Paper Folding – 02
  • Series Completion – 01
  • Word Filling – 01
  • Cube and Dice – 01
  • Verbal Reasoning – 01
  • Sitting Arrangement – 01
  • Assertion and Reasoning – 01

चालू घडामोडी: विश्लेषण | Current Affairs: Analysis

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये चालू घडामोडी या विषयाचे 15 प्रश्न विचारले होते. चालू घडामोडीची काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे;

1. भारतासंबंधी चालू घडामोडी (एकूण प्रश्न – 10)

  • शासकीय योजना – 02
  • नियुक्ती – 02
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान – 01
  • पुरस्कार – 01
  • पर्यावरण – 01
  • अहवाल – 01
  • घटनादुरुस्ती कायदा – 01
  • इतर – 01

2. महाराष्ट्रासंबंधी चालू घडामोडी (एकूण प्रश्न – 04)

  • पुरस्कार – 02
  • नियुक्ती – 01
  • शासकीय योजना – 01

3. आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी (एकूण प्रश्न – 01)

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान – 01

राज्यव्यवस्था: विश्लेषण | Polity: Analysis

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये राज्यव्यवस्था या विषयाचे 10 प्रश्न विचारले होते. राज्यव्यवस्थाची काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे;

1. भारताचे संविधान (एकूण प्रश्न – 08)

  • संविधानाचे स्त्रोत – 01
  • सरनामा – 01
  • संघराज्य पद्धती – 01
  • राज्यपाल – 01
  • संसदीय समित्या – 01
  • लोकपाल – 01
  • पंचायत राज – 01
  • न्यायव्यवस्था – 01

2. महाराष्ट्र सबंधित राज्यप्रणाली (एकूण प्रश्न – 02)

  • ग्रामपंचायत – 02

इतिहास: विश्लेषण | History: Analysis

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये इतिहास या विषयाचे 15 प्रश्न विचारले होते. इतिहासाची काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे;

1. भारत (एकूण प्रश्न – 07)

  • गव्हर्नर जनरल / व्हॉईसरॉय – 02
  • रेल्वे – 01
  • शिक्षण – 01
  • राष्ट्रीय संस्था – 01
  • धार्मिक चळवळी – 01
  • गांधीयुग- 01

2. महाराष्ट्र (एकूण प्रश्न – 08)

  • महाराष्ट्रातील संस्था – 02
  • महाराष्ट्रातील समाजसुधारक – 02
  • शेतकरी उठाव – 01
  • कामगार चळवळी – 01
  • 1857 च्या उठवातील महाराष्ट्र – 01
  • पुस्तके आणि लेखक – 01

भूगोल: विश्लेषण | Geography: Analysis

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये भूगोल या विषयाचे 15 प्रश्न विचारले होते. भूगोलाची काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे;

1. भारताचा भूगोल (एकूण प्रश्न – 05)

  • नदीप्रणाली – 01
  • खनिजसंपत्ती – 01
  • भारतातातील खिंड / Pass – 01
  • मृदा – 01
  • जनगणना (2001) – 01

2. महाराष्ट्राचा भूगोल (एकूण प्रश्न – 10)

  • जनगणना (2011) – 03
  • महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग आणि घाटरस्ते – 02
  • नदीप्रणाली – 01
  • व्याघ्रप्रकल्प – 01
  • पर्यटनस्थळे – 01
  • औष्णिक वीजकेंद्रे – 01
  • डोंगररांगा / टेकड्या – 01

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: संभाव्य उत्तरतालिका | MPSC Group B Combine Preliminary Examination 2020-21: Answer Key

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: संभाव्य उत्तरतालिका | या भागात आपण Adda 247 च्या टीम ने सखोल चर्चेतून आपल्यासाठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची संभाव्य उत्तरतालिका तयार केली आहे. यामध्ये विचारलेल्या 100 प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याचा आणि प्रत्येक उत्तराचे विश्लेषण देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आपले गुण तपासून त्याप्रमाणे पुढची तयारी लगेच करण्याकरिता ही उत्तरतालिका सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी आम्हाला आशा आहे. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: विचारलेले प्रश्न आणि संभाव्य उत्तरतालिका खालीलप्रमाणे;

विषय अर्थशास्त्र प्रश्न आणि उत्तरे | Subject: Economics Question and Answers (Q1-Q15)

1) हरितक्रांतीनंतर ________________ हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे?

  1. तांदूळ
  2. बाजरी
  3. मका
  4. गहू

Ans. 4. गहू 

 

2) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) ________________मध्ये अधिनियमित झाला.

  1. ऑक्टोबर 2001
  2. आक्टोबर 2002
  3. सप्टेंबर 2005
  4. सप्टेंबर 2011

Ans. 3. सप्टेंबर 2005

 

3) खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही ?

  1. अंतर्गत कर्जे
  2. बाजार कर्जे
  3. कोषागार विपत्रे
  4. विदेशी मदत

Ans. 4. विदेशी मदत

 

4) चौदाव्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापण (FRBM) कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचविला ?

  1. वित्तीय एकत्रीकरण निधी
  2. वित्तीय तूट
  3. महमुल आणि कर्ज व्यवस्थापन
  4. कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा

Ans. 4. कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा

 

5) भारत हा जगातील सर्वात मोठा____________उत्पादक देश आहे.

  1. ताग
  2. लोह
  3. सिमेंट
  4. साखर

Ans. 1. ताग

 

6) 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा ___________ टक्कयांनी वाढला आहे.

  1. 16.6 ते 26.2
  2. 30.6 ते 59.2
  3. 16.9 ते 36.2
  4. 15.6 ते 36.2

Ans. 1. 16.6 ते 26.2

 

7) तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण _________ होते.

  1. 21.9 %
  2. 27.5 %
  3. 37.2 %
  4. 42.9 %

Ans. 1. 21.9% 

 

8) राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तात्कालिक (ताबडतोबीचे) उद्दीष्ट हे होते

अ. आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे.

ब. एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे.

क. सर्व मुलांचे (बालकांचे) सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे.

पर्यायी उत्तरे:

  1. फक्त अ आणि ब
  2. फक्त क
  3. फक्त ब
  4. फक्त अ

Ans. 4. फक्त अ

 

9) खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत?

  1. भेदभाव नाही
  2. सर्वात अनुकूल राष्ट्र
  3. राष्ट्रीय वागणूक
  4. वरीलपैकी एकही नाही

Ans. 1. भेदभाव नाही

 

10) खालील विधाने विचारात घ्या:

अ.राष्ट्रीय कृषी विकास योजना ही अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली

ब. समकालित (एकात्मिक/एकत्रित) फलोद्यान विकास उपक्रम बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरु केला गेला

क. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला.

वरीलपैकी कुठले/ली विधान/ने चूक आहेत ?

  1. तिन्ही विधाने चूक आहेत
  2. फक्त ब
  3. फक्त क
  4. फक्त अ

Ans. 3. फक्त क

 

11) सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात__________क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे.

  1. ताग वस्तू
  2. तयार कपडे
  3. अभियांत्रिकी वस्तू
  4. रत्ने आणि दागिने

Ans. 3. अभियांत्रिकी वस्तू

 

12) खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही ?

  1. जलसिंचन
  2. ग्रामीण विद्युतीकरण
  3. ग्रामीण भागात शाळा
  4. ग्रामीण रस्ते

Ans. 3. ग्रामीण भागात शाळा

 

13) पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये_________ही आहेत. योग्य वाक्य निवडा.

अ. प्रती व्यक्ती ₹ 1 लाख पर्यंत ठेवी स्विकारणे

ब. ए.टी.एम. व डेबीट कार्ड देण्यास परवानगी

क. ए.टी.एम. कार्ड देण्यास परवानगी

ड. कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही

पर्यायी उत्तरे :

  1. फक्त अ क आणि ड
  2. फक्त अ, ब आणि क
  3. फक्त ब, क आणि ड
  4. फक्त अ, ब आणि ड

Ans. 1. फक्त अ क आणि ड

 

14) रंगराजन कमिटी (2014) नुसार सन 2011-12 साठी, ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्रयरेषा ₹___________अशी निश्चित करण्यात आली.

  1. 32 आणि 47
  2. 32 आणि 67
  3. 32 आणि 87
  4. 31 आणि 97

Ans. 1. 32 आणि 47

 

15)  ऑक्सफॅम अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1 टक्के लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा______टक्के आहे

  1. 41
  2. 35
  3. 73
  4. 83

Ans. 3. 73  

Detailed Solution/Explanation साठी Video पहा

विषय- विज्ञान | Subject: Science (Q16- Q30)

16) पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात?

  1. गुरुत्वाकर्षणीय पद्धत
  2. खगोलीय पराशर पद्धत
  3. समांतर पद्धत
  4. थेट पद्धत

Ans. 2. खगोलीय पराशर पद्धत

 

17) सोलार सेलचे (सौर घट) कार्य __________वर आधारित आहे.

  1. स्टार्क ईफेक्ट
  2. कुलोम्ब इफेक्ट
  3. झीमन ईफेक्ट
  4. फोटोवोल्टाईक इफेक्ट

Ans. 4. फोटोवोल्टाईक इफेक्ट

 

18) खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिता चा वापर सर्वात आधी करणारा कोण होता ?

  1. भास्कर
  2. ब्रह्मगुप्ता
  3. आर्यभट्ट
  4. यापैकी नाही

Ans. 2. ब्रह्मगुप्ता

 

19) कॉपरच्या जर्मन सिल्व्हर धातुमिश्रणात ___________ असते

  1. Cu, Zn, Ag
  2. Cu, Zn, Ni
  3. Cu, Ni, Ag
  4. Cu, Zn, Al

Ans. 2. Cu, Zn, Ni

 

20) स्फटिकासारख्या पदार्थाना

अ. निश्चित भौमितिक रचना असते.

ब. निश्चित द्रवीभवन बिंदू असतो.

क. दिशानुवर्ती गुणधर्म असतात.

पर्यायी उत्तरे :

  1. अ आणि ब बरोबर आहेत
  2. ब आणि क बरोबर आहेत
  3. अ आणि क बरोबर आहेत
  4. वरील सर्व बरोबर आहेत.

Ans. 4. वरील सर्व बरोबर आहेत

 

21) मोसले प्रमाण आवर्त सारणीतील मुलद्रव्यांची रचना __________च्या आधारे आहे

  1. अणूचे वजन
  2. अणूचे वस्तुमान
  3. अणूचा क्रमांक
  4. अणूचे आकारमान

Ans. 3. अणूचा क्रमांक

 

22) आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे पाच किंगडम खालीलप्रमाणे

अ. प्रोटिस्टा, फंजाय, मॅमेलीया, अनिलीडा, प्लांटी

ब. मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, अनिमेलीया

क. प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, पोरीफेरा, अनिमेलीया

ड. मोनेरा, फंजाय, मॅमेलीया, प्लांटी, अनिमेलीया

वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

  1. फक्त क
  2. फक्त ब
  3. फक्त अ
  4. फक्त ड

Ans. 2.फक्त ब

 

23) मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि तीन चार दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात __________ हा विषारी पदार्थ दिसून येतो

  1. इंटरफेरॉन
  2. हिमोझॉइन
  3. हिरुडिन
  4. कोलोस्ट्रम

Ans. 2. हिमोझॉइन

 

24) “आफ्रिकन स्लिपींग सिकनेस” हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवी मुळे होतो?

  1. ट्रॅपनोसोमा
  2. परामीशीअम
  3. मच्छर
  4. पट्टकृमी (टेपवर्म)

Ans. 1. ट्रॅपनोसोमा

 

25) शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो ?

  1. जिम्नोस्पर्म्स
  2. थॅलोफाइट्स
  3. अँजिओस्पर्स
  4. ब्रायोफाइट्स

Ans. 2. थॅलोफाइट्स

 

26) खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्ये नष्ट होवून झाडाची पाने आकुंचन पावतात?

  1. मोझॅयिक डिसीज ऑफ टोबॅको
  2. सायट्रस कँकर
  3. स्मट ऑफ जवार
  4. रायझोक्टोनिया

Ans. 1. मोझॅयिक डिसीज ऑफ टोबॅको

 

27) खालीलपैकी कोणते जैविक खत भातशेती साठी वापरतात ?

  1. लाल शैवाल
  2. तपकिरी शैवाल
  3. राइझोबियम
  4. निल हरित शैवाल

Ans. 4. निल हरित शैवाल

 

28) जीवाणू खालीलपैकी_________ या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात.

अ. कोशिकांवरील रिसेप्टर्स मधे बदल करणे

ब. एम.डी.आर. पंप

क. वेगवेगळ्या एनझाईम्सचा स्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो

पर्यायी उत्तरे:

  1. फक्त अ आणि ब
  2. अ, ब आणि क
  3. फक्त अ आणि क
  4. फक्त ब आणि क

Ans. 2. अ, ब आणि क

 

29) स्टॉफलोकोकल खाद्य विषबाधा________होते.

  1. आधी तयार केलेले एन्टरोटॉक्सीन अंतर्ग्रहण केल्यामुळे
  2. विषाच्या निर्मितीनंतर श्लेष्मल पृष्ठभागाचे वसाहतकरण केल्यामुळे
  3. स्थानिक विषाच्या निर्मितीनंतर जखमेचे किंवा गळुचे वसाहतकरण केल्यामुळे
  4. वरील सर्व कारणांमुळे

Ans. 1. आधी तयार केलेले एन्टरोटॉक्सीन अंतर्ग्रहण केल्यामुळे

 

30) राष्ट्रीय साल्मोनेला फाज टायपिंग केंद्र________येथे आहे

  1. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली
  2. मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली
  3. नॅशनल इंस्टिट्युट ऑफ कॉलरा अँड एन्टरीक डिसीजेस, कोलकाता
  4. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल

Ans. 1. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली

Detailed Solution/Explanation साठी Video पहा

विषय- CSAT-तर्क क्षमता | Subject: CSAT-Reasoning (Q31- Q39)

31) प्रश्नचिन्ह स्तंभाच्या जागी ठेवण्यासठी तर्कसंगत स्तंभ निवडा

31

Ans. 1. (5-8-6-6)

 

32) प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात दोन स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्ये तयार करतील, अशी शब्दजोड़ी वा शब्दसमूह जोडी निवडा.

रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची__________मनःस्थिती विसंगत वाटत होती.

  1. कमजोर आणि भकास
  2. सांत्वनापलीकडची आणि उपरोधिक
  3. आशावादी आणि आनंदी
  4. कमजोर आणि उपरोधिक

Ans. 3 आशावादी आणि आनंदी

 

33) सहा पृष्टांबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संख्या असलेला सोबतचा घन अभ्यासा. 3 ही संख्या 1. किंवा 6 च्या विरुद्ध पृष्ठांवर नाही आणि 4 ही संख्या 6 च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. जर 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील अशा रीतीने हा घन फिरवला आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आताच्या 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले तर उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल ?

33

  1. 5
  2. 4
  3. 3
  4. निवडीसाठी अधिक माहितीची गरज आहे

Ans. 3. 3

 

34) सोबतच्या जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला.

घनाच्या पृष्ठावरील दोन किंवा अधिक कर्ण रेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या निवडा.

34

  1. 2
  2. 3
  3. 4
  4. 5

Ans. 1. 2 

 

35) सोबतचा पारदर्शक कागदाचा तुकडा X अभ्यासा आणि तो वापरून तयार केलेली घडी निवडा.

35

Ans. 4

 

36) पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणुकांत मतदात्यांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाहीत आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही, अशा स्थितीला (आपण) पोहोचण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचे आहे. वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा.

  1. निवडणूक ही सर्व लोकशाही देशांत शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे.
  2. निवडणुकीत मतदान करण्याऐवजी तरुण व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबाव गटांत सामील होण्याची शक्यता अधिक आहे.
  3. दूरस्थ निवासी स्थानांमुळे महाजालाद्वारे वा पोष्टाद्वारे मतदानाचा पर्याय वापरण्यात समस्या येण्याची शक्यता आहे.
  4. ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे.

Ans. 4 ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे.

 

37) खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे.

I. दक्षिणेकडे तोंड असलेल्या पाच व्यक्ती A, B, C, D आणि E, आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पाच व्यक्ती M, N, O, P आणि Q परस्परांसमोर दोन समांतर रांगांमध्ये बसल्या आहेत.

II. E हा O च्या समोर आहे, जो, M च्या उजवीकडे लागून आहे.

III. C आणि N एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहेत.

  1. IV. B, जो D च्या डावीकडे लागून आहे, Q च्या समोर आहे.
  2. V. M हा रांगेच्या एका टोकाला आहे.
  3. VI. P, जो Q च्या डावीकडे लागून आहे, D च्या समोर आहे.

जर B हा E च्या जागेवर गेला, E हा Q च्या जागेवर गेला आणि Q हा B च्या जागेवर गेला, तर O च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण असेल ?

  1. Q
  2. P
  3. E
  4. D

Ans. 1. Q

 

38) खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी दोन कारणे RI आणि RII दिलेली आहे. विधानासंदर्भात कारणांचे उपयोजन करून उत्तर शोधा.

विधान: हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी (teleshopping) करतात.

कारणे: RI – लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात.

RII – हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही.

पर्यायी उत्तरे :

  1. संभवनीय कारण फक्त RI आहे RII नाही
  2. संभवनीय कारण फक्त RII आहे RI नाही
  3. संभवनीय कारण दोन्ही नसून फक्त RI किंवा RII आहे
  4. संभवनीय कारण RI ही नाही किंवा RII ही नाही

Ans. 2. संभवनीय कारण फक्त RII आहे RI नाही

 

39) प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 कि.मी. प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 कि.मी. प्रवास केला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 कि.मी. प्रवास केला आणि नंतर पूर्वेकडे 3 कि.मी. प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळला आणि 2 कि.मी. प्रवास केला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे.

  1. 14
  2. 12
  3. 10
  4. 7

Ans. 3. 10

Detailed Solution/Explanation साठी Video पहा

विषय: CSAT-गणित | Subject: CSAT-Maths (Q40- Q45)

40) A, B, C व D या चार खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केले. B खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे ?

40

  1. 1240
  2. 527
  3. 713
  4. 1426

Ans. 2. 527

 

41) जर 28 मी. व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्या भोवती 7 मी. रस्ता असेल तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती?

  1. 616 चौ. मी
  2. 770 चौ. मी
  3. 1386 चौ. मी
  4. 28 चौ. मी

Ans. 2. 770 चौ. मी

 

42) शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील ?

  1. 15
  2. 4
  3. 12
  4. 16

Ans. 2. 4

 

43) तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती?

  1. 20, 30, 22 वर्षे
  2. 22, 24, 26 वर्षे
  3. 19 25, 28 वर्षे
  4. 17, 25, 30 वर्षे

Ans. 3. 19 25, 28 वर्षे

 

44) वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर ₹ 26.25 सूट मिळते. तर बिलाची एकूण रक्कम किती?

  1. ₹1575
  2. ₹500
  3. ₹650.25
  4. ₹551.25

Ans. 4. ₹551.25

 

45) एका थैलीत एक रुपया, 50 पैसे व 25 पैसे यांची 56 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत ₹420 असेल, तर 50 पैशांची किती नाणी आहेत?

  1. 210
  2. 126
  3. 252
  4. 70

Ans. 3. 252

 

Detailed Solution/Explanation साठी Video पहा

विषय- चालू घडामोडी | Subject: Current Affairs  (Q46- Q60)

46) अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टीना कोच या सर्वाधिक कालावधीची, अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या अंतराळवीर ठरल्या आहेत. त्यांनी 328 दिवस अंतराळात व्यतित केले. म्हणजे कोच यांनी गेल्या______ रोजी, पृथ्वीवरून उड्डान केले होते.

  1. 10 फेब्रुवारी 2019
  2. 14 फेब्रुवारी 2019
  3. 14 मार्च, 2019
  4. 17 मार्च, 2019

Ans. 3. 14 मार्च, 2019

 

47) तेनसिंग नॉर्ग हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकाविणारा साहसी जलतरणपटु (प्रभात कोळीच्या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रिकॉर्डने घेतली आहे. त्याने आतापर्यंत जे सहा समुद्र पार केले त्यात खालील कोणत्या समुद्राचा समावेश नाही ?

  1. इंग्लिश खाडी
  2. कॅटलिना चॅनेल
  3. जिब्रालची समुद्रधुनी
  4. सुवेझ कालवा

Ans. 4. सुवेझ कालवा

 

48) ‘परम वीर चक्र’ स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंतच्या 72 वर्षांत सुमारे 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात फक्त_____जणांनाच हा बहुमान प्राप्त झाला आहे.

  1. 24
  2. 42
  3. 12
  4. 21

Ans. 4.  21

 

49) आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पुढील पर्यायांपैकी अयोग्य (चुकीचा) पर्याय निवडा.

अ. या योजनेचा लाभ 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे

ब. आयुष्मान कार्डधारकाच्या परिवाराला ₹ 5 लाखपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत स्वरूपात दिला जाणार आहे.

क. या योजनेचा लाभ 30 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे

ड. या योजनेअंतर्गत 15 हजार खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा बहाल केला जाणार आहे.

पर्यायी उत्तरे :

  1. फक्त ब
  2. फक्त क
  3. फक्त अ आणि क
  4. फक्त ब आणि ड

Ans. 2. फक्त क

 

50) माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना व त्यांचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा.

संकल्पना                                                                          सेवा विवरण

अ. यु.पी.आय. (UPI)                                                                 I. ज्ञानाचे कृत्रिम आदान-प्रदान

ब. आय. (AI)                                                                            II. डिजिटल पेमेंट व्यवस्था

क. जी.इ.एम. (GeM)                                                                III. वस्तुसाठी चे इंटरनेट

ड. आय.ओ.टी. (IoT)                                                                IV. सरकारचे ऑनलाईन मंच

Ans.

MPSC Group B Combine Prelims Exam 2020-21: Question Paper Analysis and Answer Key | प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका_8.1

Ans. 4. II I IV III 

 

51) अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासंदर्भातील स्थळ, वर्ष व संमेलनाध्यक्ष यांचा योग्य क्रम सांगणारा अचूक पर्याय निवडा.

वर्ष व ठिकाण                                                                               संमेलनाध्यक्ष

अ. 2016 – ठाणे                                                                        I. जयंत सावरकर

ब. 2017- उस्मानाबाद                                                               II. प्रेमानंद गज्वी

क. 2018 मुलुंड                                                                       III. कीर्ती शिलेदार

ड. 2019- नागपूर                                                                     IV. गंगाराम गवाणकर

MPSC Group B Combine Prelims Exam 2020-21: Question Paper Analysis and Answer Key | प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका_9.1

Ans. 3. IV I III II 

 

52. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डच्या उपलब्ध सूचनेअनुसार वर्ष 2018-19 च्या दरम्यान किती मेट्रिक टन ई-कचरा एकत्रित करून विघटित आणि पुनर्चक्रित करण्यात आला ?

1. 69414 मेट्रिक टन

2. 164663 मेट्रिक टन

3. 771215 मेट्रिक टन

4. 708445 मेट्रिक टन

Ans. 2. 164663 मेट्रिक टन

 

  1. ब्रिटेनच्या महाराणीचे ‘क्वीन्स कौंसिल’ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?

1. उज्जवल निकम

2. एल. नागेश्वर राव

3. हरीश साळवे

4. आर. एम. शिंदे

Ans. 3. हरीश साळवे 

 

  1. द एरा ऑफ राइजिंग फिनटेकच्या डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्ट खालीलप्रमाणे आहे.

अ. डिजिटल भुगतानच्या वापरामधे कर्नाटक पहिल्या क्रमांकावर

ब. डिजिटल भुगतानच्या वापरामधे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

क. डिजिटलाइज्ड शहरांमधे बैंगलुरू प्रथम स्थानांवर.

ड. डिजिटलाइन्ड शहरांमधे हैदराबाद द्वितीय स्थानांवर

वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत?

  1. फक्त अ, ब आणि क
  2. फक्त ब, क आणि ड
  3. फक्त क, ड आणि अ
  4. फक्त ड, अ आणि ब

Ans. 1. फक्त अ, ब आणि क 

 

  1. उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवनिर्माणाची संस्कृती रुजवण्यासाठी भारत सरकारने (मनुष्यबळ विकास मंत्रालय प्रस्तावित केलेल्या इम्प्रिंट II (IMPRINT-II) योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतात ?

अ. खाजगी महाविद्यालयातील प्राध्यापक

ब. आय.टी.आय. मधील प्राध्यापक

क. आय. आय.टी., एन. आय. टी., आय. आय. आय.टी. मधील प्राध्यापक

ड. आय.आय.टी., एन. आय.टी., आय. आय. आय.टी., आय.आय.एस.ई.आर. आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक

  1. फक्त अ आणि ब
  2. फक्त ड
  3. फक्त अ, ब, आणि क
  4. फक्त क आणि ड

Ans. 4. फक्त क आणि ड

 

56) अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थाय्न शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सरकारने __________सुरु केली आहे

  1. पदमश्री बाबा आमटे स्वाधार योजना
  2. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
  3. कर्मवीर भाऊराव पाटील आधार योजना
  4. सावित्रीबाई फुले आधार योजना

Ans. 2. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 

 

  1. आर्थिक दुर्बल घटकांसाठी 103 व्या घटनादुरुस्तीने 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(6) आणि 16(6) मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. योग्य पर्याय निवडा.

अ. अनुसूचित जाती/जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा त्यांनी लाभ घेतला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल.

ब. आर्थिक मागासवर्गीयांना 13% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील.

क. या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरीविषयक बाबींना लागू होईल.

ड. आर्थिक मागासवर्गीयांना 10% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील.

वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे

1. फक्त क आणि ड

2. अ, ब, क आणि ड

3. फक्त अ क आणि ड

4.फक्त ब आणि क

Ans. 3. फक्त अ क आणि ड

 

  1. “मराठी काका’ म्हणून प्रसिद्ध असलेले प्रा. अनिल गोरे यांना मराठी भाषा प्रसार येणारा राज्य सरकारचा 2019 चा हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

1.कविवर्य वि.वा. शिरवाडकर

2. कविवर्य भा.रा. तांबे

3. कविवर्य मंगेश पाडगावकर

4. कादंबरीकार वि. स. खांडेकर

Ans. 3. कविवर्य मंगेश पाडगावकर 

 

  1. आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ (आय.ओ.डी.ए.) चे जनरल व्हॉईस प्रेसिडेंट म्हणून भारतीय कोण बनले आहे ?

1. राजेश रेड्डी

2. विनया शेट्टी

3. मोहित कुमार

4. निधि शर्मा

Ans. 2. विनया शेट्टी

 

60) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) डिसेंबर 2020 मधे कोणती मानवरहित मोहिम अंतराळात पाठवणार आहे?

1. गगनयान

2. व्योम मित्रा

3. रोबोनाऊट

4. फेडॉर

Ans. 2. व्योम मित्र

 

विषय- राज्य व्यवस्था | Subject: Polity  (Q61- Q70)

61. खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?

1. विधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी, 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या.

2. ‘कायद्याने घालून दिलेली पद्धती’ हे तत्त्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्विकारले गेले आहे.

3. ‘संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक’ ही कल्पना ब्रिटीश राज्यघटनेकडून घेतली आहे.

4. वरीलपैकी एकही नाही

Ans. 4. वरीलपैकी एकही नाही

 

62. भारतीय राज्यघटनेच्या ‘सरनाम्या’ विषयी खालील विधाने विचारात घ्या:

अ. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टये कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते, तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो.

ब. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे, तशी ती ‘सरनाम्यास’ दिलेली नाही.

पर्यायी उत्तरे :

  1. विधान अ बरोबर
  2. विधान व बरोबर
  3. दोन्हीही विधाने बरोबर
  4. दोन्हीही विधाने चुकीची

Ans. 1. विधान अ बरोबर

 

63. प्रा. के.सी. व्हिअर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते ?

1. भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे.

2. एक पक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्त्वाशी संघर्ष करणारी ठरली.

3. भारतीय संघराज्य हे घटकांमधील कराराचा परिणाम नाही.

4. एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्टये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्टये असलेले एकात्म राज्य आहे.

Ans. 4. एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्टये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्टये असलेले एकात्म राज्य आहे.

 

  1. खालील विधाने विचारात घ्या

अ. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित, अभिरक्षेत ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते.

ब. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत भरवली पाहिजे.

पर्यायी उत्तरे :

  1. विधान अ बरोबर
  2. विधान ब बरोबर
  3. दोन्हीही विधाने बरोबर
  4. दोन्हीही विधाने चुकीची

Ans. 2. विधान ब बरोबर

 

  1. खालील विधाने विचारात घ्या

अ. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराब, त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल.

ब. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या दोन-तृतीयांश इतक्या सदस्यांनी पाठींबा दिलेल्या ठरावा खेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही.

पर्यायी उत्तरे :

  1. विधान अ बरोबर
  2. विधान ब बरोबर
  3. दोन्हीही विधाने बरोबर
  4. दोन्हीही विधाने चुकीची

Ans. 3. दोन्हीही विधाने बरोबर

 

66. कोणत्या तत्त्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो ?

  1. न्यायालयीन पुनर्विलोकन
  2. कायद्याचे राज्य
  3. प्रदत्त विधिनियम
  4. सत्ता विभाजन

Ans. 2. कायद्याचे राज्य

 

  1. राज्यपाल यांच्या संबंधी ‘पूंछी’ आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारसही चुकीची नमूद करण्यांत आलेली आहे ?

1. त्यांना मंत्रीमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालविण्यास मंजूरी देण्याचा अधिकार असावा.

2. ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जावू शकतील.

3. ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जावू शकतील.

4. राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की, ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत.

Ans. 3. ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जावू शकतील.

 

  1. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (RGSA) काय आहे ?

1. पंचायत राज संस्थांना ग्राम पंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना

2. नियमित ग्राम सभा आणि त्यांचे नोंदी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना

3. गावाच्या पातळीवर मतदान वाढविण्याची योजना

4. सरपंचाची थेट निवड करण्यास प्रोत्साहन देणारी योजना

Ans. 1. पंचायत राज संस्थांना ग्राम पंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना

 

  1. खालील विधाने विचारात घ्या

अ. लोकलेखा समितीमधे 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात.

ब. लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पहाणाच्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचे सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल.

वरील विधानांपैकी असत्य विधान/ने कोणते आहे/त ?

  1. फक्त अ
  2. फक्त ब
  3. अ आणि ब दोन्ही
  4. कोणतेही नाही

Ans. 2. फक्त ब

 

  1. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली.

1. न्यायमूर्ती दीपक मिश्रा

2. न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर

3. न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष

4. न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर

Ans. 3. न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष

विषय- इतिहास | Subject: History (Q70- Q85)

  1. _________ यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी’ नावाची संस्था स्थापन केली होती.

1. वि.दा. सावरकर

2. वि.वा.शिरवाडकर

3. न्यायमूर्ती रानडे

4. अनंत लक्ष्मण कान्हेरे

Ans. 3. न्यायमूर्ती रानडे

 

  1. 1885 ते 1915 या काळात ______________हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जात.

1.जगन्नाथ शंकर शेठ

2. भाऊ दाजी लाड

3. दादाभाई नौरोजी

4. फिरोजशाह मेहता

Ans. 4.फिरोजशाह मेहता

 

  1. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते ?

अ. डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. आर.जी. भांडारकर

ब. वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर

क. विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

ड. गोविंद विठ्ठल कुंटे, राव साहेब मंडलीक

पर्यायी उत्तरे :

  1. फक्त अ, ब आणि ड
  2. फक्त अ, ब आणि क
  3. फक्त ब, क आणि ड
  4. फक्त अ आणि ब

Ans. 2. फक्त अ, ब आणि क

 

  1. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता ?

1.पुणे

2. सुपे

3. अहमदनगर

4. सोलापूर

Ans. 2. सुपे

 

  1. खालील जोड्या जुळवा.

1857 च्या उठावाची केंद्रे                                             नेते

अ. पेठ                                                                 I. वैकाप्पा नाईक बळवंत बेहरी

ब. नरगुंद                                                             II. रामचंद्र पटवर्धन

क. जमखिंडी                                                        III. बाबासाहेब भावे

ड. सोरापूर                                                           IV. भगवंतराव कोळी

पर्यायी उत्तरे:

       अ      ब      क      ड

  1. IV      III     II        I
  2. IV      II      III       I
  3. IV      I       II        III
  4. IV      I       III       II

Ans. 1. IV      III     II        I

 

  1. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे ‘चांदोबाची मागणी असे_________म्हणाले

1. लॉर्ड डलहौसी

2. लॉर्ड रिपन

3. विलियम जोन्स

4. लॉर्ड मोर्ले

Ans. 4. लॉर्ड मोर्ले

 

  1. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन________ते ___________पर्यंत टाकली गेली

1.कलकत्ता ते दिल्ली

2. मद्रास ते दिल्ली

3. कलकत्ता ते मद्रास

4. कलकत्ता ते आग्रा

Ans. 4. कलकत्ता ते आग्रा

 

  1. 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापना करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती ?

1. नारायण मेघाजी लोखंडे

2. नारायण राव पवार

3. शापुरजी बंगाली

4. सोराबजी शापूरजी

Ans. 4. सोराबजी शापूरजी

 

  1. मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती ?

1. लेफ्टनंट प्रेसकॉट

2. लॉर्ड डलहौजी

3. लॉर्ड एलफिन्स्टन

4. लेफ्टनंट नेल्सन

Ans. 1. लेफ्टनंट प्रेसकॉट

 

  1. चुकीची जोडी ओळखा

1. सरलादेवी चौधुरानी → द ऑल इंडिया वुमेन्स कौन्सिल

2. डॉ. अॅनी बेझंट → द वुमेन्स इंडियन असोशिएशन

3. मेहरबाई टाटा → द नॅशनल कौन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया

4. मागरिट कझिन्स → द ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स

Ans. 1. सरलादेवी चौधुरानी → द ऑल इंडिया वुमेन्स कौन्सिल

 

  1. वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली ?

1.कलकत्ता फिमेल जूव्हेनाईल सोसायटी

2. ब्रिटिश फरिन स्कुल सोसायटी

3. सोसायटी फॉर नेटिव्ह फिमेल एज्यूकेशन

4. स्कॉटिश मिशन

Ans. 1 कलकत्ता फिमेल जूव्हेनाईल सोसायटी

 

  1. ___________हे उत्तर भारतातील ‘वहाबी’ आंदोलनाचे केंद्र होते.

1. पटना

2. दिल्ली

3. फिरोजपुर

4. अलीगढ

Ans. 1. पटना

 

  1. पुणे येथील मुलींची शाळा चालविण्यासाठी जोतीबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य होते ?

अ. सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे

ब.सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर

क. विष्णूपंत बत्ते, केशव शिवराम भवाळकर

ड.काशीराव देशमुख, हरिभाऊ चव्हाण

पर्याची उत्तरे :

  1. फक्त अ, ब आणि क
  2. फक्त अ, क आणि ड
  3. फक्त अ आणि ब
  4. फक्त क आणि ड.

Ans. 1. फक्त अ, ब आणि क

 

  1. खालील जोड्या जुळावा:

अ. परमहंस मत प्रसंशा                            I. गुजाबा जोशी पुणेकर

ब. विचार लहरी                                      II. कृष्णशास्त्री चिपळूणकर

क. शाक्त पंथाचे अनुयायी                         III. मोरभट दांडेकर

ड. दादोबा पांडुरंग                                  IV. धर्म विवेचन

पर्यायी उत्तरे:

MPSC Group B Combine Prelims Exam 2020-21: Question Paper Analysis and Answer Key | प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका_10.1

Ans. 2. I  II III IV 

 

  1. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या_______चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले होते.

1. सविनय कायदेभंग

2. असहकार

3. दारू विरोधी

4. भारत छोडो

Ans. 2. असहकार

Detailed Solution/Explanation साठी Video पहा

विषय- भूगोल | Subject: Geography (Q86- Q100)

  1. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘सिंधू पाणी करार – 1960’ नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे?

1. सिंधू, चिनाब, झेलम

2. रावी, बियास, सतलज

3. झेलम, सतलज, चिनाब

4. चिनाब, बियास, झेलम

Ans. 2. रावी, बियास, सतलज

 

  1. खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे ?

1. हॅमेटाईट

2. लिमोनाइट

3. मॅग्नेटाईट

4. वरीलपैकी नाही

Ans. 1. हॅमेटाईट

 

  1. भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा.

1. मानाखिंड, सिप्किलाखिंड, नितीखिंड, झोजिलाखिंड

2. झोजिलाखिंड, सिप्किलाखिंड, मानाखिंड, नितीखिंड

3. सिप्किलाखिंड, नितीखिंड, मानाखिंड, झोजिलाखिंड

4. नितीखिंड, मानाखिंड, झोजिलाखिंड, , सिप्किलाखिंड

Ans. 2. झोजिलाखिंड, सिप्किलाखिंड, मानाखिंड, नितीखिंड

 

  1. खारट आणि क्षारीय मृदेख दुसऱ्या नावानेसुद्धा ओळखतात. खालीलपैकी अचूक पर्याय कोणता?

1. वाळवंटीय मृदा

2. चोपण मृदा

3. पाणथळ आणि दलदलीची मृदा

4. चेस्टनट किंवा राखाडी तपकिरी मृदा

Ans. 2. चोपण मृदा

 

  1. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे ?

1. महाराष्ट्र-छत्तीसगढ़

2. महाराष्ट्र-मध्य प्रदेश

3. मध्य प्रदेश-छत्तीसगढ़

4. महाराष्ट्र-कर्नाटक

Ans. 2. महाराष्ट्र-मध्य प्रदेश

 

  1. 2001 च्या जनगणनेनुसार, भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य.

1. ओडिशा

2. महाराष्ट्र

3. राजस्थान

4. मध्यप्रदेश

Ans. 4. मध्यप्रदेश

 

  1. महाराष्ट्रातील 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे कोणते ?

1. मुंबई उपनगर, ठाणे, मुंबई शहर, कोल्हापूर, पुणे

2. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, कोल्हापूर, ठाणे

3. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर

4. ठाणे, मुंबई शहर, कोल्हापूर, पुणे, मुंबई उपनगर

Ans. 3. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर

 

  1. जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे?

1. 09

2. 90

3. 19

4. 29

Ans. 1. 09 

 

94. खालील विधाने पहा:

अ. मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही.

ब.मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो.

क. कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो.

  1. फक्त विधान अ बरोबर आहे
  2. फक्त विधान ब बरोबर आहे
  3. विधान अ आणि ब बरोबर आहेत
  4. विधान ब आणि क बरोबर आहेत

Ans. 2 फक्त विधान ब बरोबर आहे

 

  1. ‘दरकेसा टेकड्या’ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हयात आढळतात?

1. नागपूर

2. चंद्रपूर

3. गोंदिया

4. गडचिरोली

Ans. 3. गोंदिया

 

  1. 2011 च्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्हयाची ‘लोकसंख्येची घनता काय आहे ?

1. 1163 चौ.कि.मी.

2. 193 चौ.कि.मी.

3. 74 चौ.कि.मी.

4. 93 चौ.कि.मी.

Ans. 3. 74 चौ.कि.मी.

 

  1. खालील विधाने पहा

अ. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्हयात आहे.

ब. चांभार लेणी पुणे जिल्हयात आहे.

क. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्हयात आहे

ड. गौताळा राष्ट्रीय उद्याने जळगाव जिल्हयात आहे.

वरीलपैकी कोणता/ते विधान/ने बरोबर आहेत ?

  1. फक्त अ विधान बरोबर आहे.
  2. फक्त ब व क विधाने बरोबर आहेत
  3. फक्त अ व ड विधाने बरोबर आहेत
  4. वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत

Ans. 3. फक्त अ व ड विधाने बरोबर आहेत (Doubtful) 

 

  1. खालील जोड्या लावा

स्तंभ I                                                   स्तंभ II

(औष्णिक विजकेंद्र)                                     (जिल्हा/ठिकाणे)

अ. चोला                                                      I. मुंबई

ब. तुर्भे                                                         II. अकोला

क. फेकरी                                                    III ठाणे

ड. पारस                                                      IV भुसावळ

पर्यायी उत्तरे:

MPSC Group B Combine Prelims Exam 2020-21: Question Paper Analysis and Answer Key | प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका_11.1

Ans. 3.  III    I   IV  II 

 

  1. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?

1. थळघाट, कुंभार्लीघाट, आंबाघाट, आंबोलीघाट

2. आंबोलीघाट, अंबाघाट, कुंभालघाट, थळघाट

3. थळघाट, कुंभार्लीघाट, आंबोलीघाट, आंबाघाट

4. थळघाट, आंबाघाट, आंबोलीघाट, कुंभार्लीघाट

Ans. 1. थळघाट, कुंभार्लीघाट, आंबाघाट, आंबोलीघाट

 

  1. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे

1. गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, गोमती

2. गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा

3. गोमती, बुराई, गिरणा, बोरी, पांझरा

4. गोमती, पांझरा, गिरणा, बुराई, बोरी

Ans. 2. गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा

Detailed Solution/Explanation साठी Video पहा

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे ही Adda 247 च्या टीम ने तयार केलेली असून ती अंतिम नाहीत. आयोग येत्या काही दिवसात प्रथम उत्तरतालिका प्रकाशित करेलच. आमचा हा प्रयत्न तुम्हाला तुमचा स्कोर अंदाजे काढून पुढील तयारीला लागता येईल यासाठी उपयुक्त ठरेल अशी आम्हाला आहे. आयोगाची प्रथम उत्तरतालिका तुम्हाला लवकरच पुरविली जाईल. आपल्या पुढील अभ्यासासाठी आणि आयुष्यासाठी Adda-247 मराठी च्या संपूर्ण टीम कडून शुभेच्छा.

तुम्ही खालील ब्लॉग चा देखील उपयोग करू शकता 

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी

नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलम आणि परिशिष्ट

————————————————————————————————————————–

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

सह्याद्री MPSC Combine पूर्वपरीक्षा Revision बॅच | Marathi Live Classes By Adda247
सह्याद्री MPSC Combine पूर्वपरीक्षा Revision बॅच | Marathi Live Classes By Adda247

Sharing is caring!

MPSC Group B Combine Prelims Exam 2020-21: Question Paper Analysis and Answer Key | प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका_13.1