Marathi govt jobs   »   Admit Card   »   MPSC Group B Combined Hall Ticket
Top Performing

[Download] MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र निघाले | MPSC Group B Combined Prelims Exam 2020-21 Hall Ticket Out

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र निघाले | MPSC Group B Combined Prelims Exam 2020-21 Hall Ticket Out: MPSC Group B Combined पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र 25 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) द्वारे जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र 22 जुलै 2021 रोजी जारी करण्यात आले. येथे, आम्ही MPSC Group B Combined Prelims Exam Hall Ticket (प्रवेशपत्र) आणि MPSC Group B Combined Prelims Exam 2020-21 (महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा) परीक्षांसाठी call letter आणि admit card (प्रवेश प्रमाणपत्र) डाउनलोड करण्याच्या चरणांची माहिती देत ​​आहोत.

MPSC Group B Combined Exam Admit Card 2021

MPSC Group B Combined Exam Admit Card 2021: महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group B-ASO, STI आणि PSI) संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. जाहिरात क्रमांक 05/2020, दिनांक 28 फेब्रुवारी, 2020 तसेच 4 ऑगस्ट, 2021 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार आयोगामार्फत शनिवार, दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ अंतर्गत ‘Admission Certificate’ या मेनूमध्ये तसेच आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Candidate’ अंतर्गत Download Admission Certificate’ या लिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

MPSC गट-ब (ASO, STI आणि PSI) संयुक्त पूर्व परीक्षेचे Hall Ticket चे प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group B Combined Prelims Exam Hall Ticket Details

मंडळ
महाराष्ट्र लोकसेवा आयोग Maharashtra Public Service Commission (MPSC)
चाचणीचे नाव (Exam Name)
गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Group B Combined Prelims Exam)
पूर्व परीक्षा तारीख (Prelims Exam Date) 4 सप्टेंबर, 2021
हॉल तिकिट तारीख (Hall Ticket Date) 25 ऑगस्ट 2021
स्थळ महाराष्ट्र

MPSC Group B Combined Prelims Exam 2020-21 Admit Card

गट-ब (MPSC Group B Combined Prelims Exam) संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2021 MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://mpsc.gov.in वर 25 ऑगस्ट 2021 रोजी जारी करण्यात आले आहे. MPSC Group B Combined Prelims Exam Admit Card डाउनलोड करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. तर सर्व पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून MPSC Group B Combined Prelims Exam 2020-21 परीक्षेसाठी त्यांचे पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

Download MPSC Combined Prelims Admit Card 2021 [Direct Link]

How to download MPSC Group B Combined Prelims Exam 2020-21 Admit Card?

MPSC Combined Prelims Exam (संयुक्त पूर्व परीक्षा) प्रीलिम्स परीक्षेसाठी Admit Card डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे: अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील नमूद करुन प्रवेश प्रमाणपत्राचा संक्षिप्त तपशील पाहता येईल. तसेच, प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंट करता येईल.

MPSC Combined Prelims Exam (संयुक्त पूर्व परीक्षा) परीक्षेसाठी डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खालील चरणांचे अनुसरण करू शकतात:

Step 1: MPSC – mpsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. किंवा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी वर नमूद केलेल्या थेट Link वर क्लिक करा.

Step 2: ‘ONLINE FACILITIES’ वर क्लिक करा

Step 3: ‘Admission Certificate’ या मेनू वर Click करा

Step 4: अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील नमूद करा

Step 5: ‘Click here to Login’ वर Click करा

Step 6: प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंट करा

Important Instructions for MPSC Combined Gr. B Prelims Exam 2020-21

  • परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळांवरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० करीता दिनांक ५ एप्रिल, २०२१ रोजी उपलब्ध करुन देण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी नियोजित परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजीच्या परीक्षेच्या प्रवेश प्रमाणपत्रासह परीक्षेस उपस्थित होणा-या उमेदवारांना परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.
  • परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
  • कोव्हिड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
  • आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन कर उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
  • प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल.

तुम्हला हेही बघायला आवढेल:

सहायक कक्ष अधिकारी (ASO) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF

राज्य कर निरीक्षक (STI) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF

पोलीस उपनिरीक्षक (PSI) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!

[Download] MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र निघाले | MPSC Group B Combined Prelims Exam Hall Ticket_4.1