Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा...

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023, उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 महत्त्वाच्या सूचना

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 महत्त्वाच्या सूचना : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 साठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहे. MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 10 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. या लेखात आपण MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 महत्त्वाच्या सूचना बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 महत्त्वाच्या सूचना : विहंगावलोकन 

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 महत्त्वाच्या सूचना : विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023
लेखाचे नाव MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 महत्त्वाच्या सूचना
अधिकृत संकेतस्थळ  www.mpsc.gov.in

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 महत्त्वाच्या सूचना 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 साठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा- 2023 शनिवार, दिनांक 02 डिसेंबर, 2023 रोजी घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन दिनांक 02 डिसेंबर, 2023 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच रविवार, दिनांक 10 डिसेंबर, 2023 रोजी आयोजित करण्यात येईल. आज दिनांक 06 डिसेंबर 2023 रोजी या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर झाले आहे.

  1. प्रस्तुत परीक्षेकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे दिनांक 24 नोव्हेंबर, 2023 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सदर प्रवेश प्रमाणपत्रावर परीक्षेचा दिनांक 2 डिसेंबर, 2023 नमूद असून त्याआधारेच उमेदवारांना दिनांक 10 डिसेंबर, 2023 रोजी प्रवेश प्रमाणपत्रावर नमूद परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल.
  2. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
  3. उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination या सदराखाली उपलब्ध असलेल्या “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे” कृपया काळजीपूर्वक अवलोकन करावे.
  4.  परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास कोणत्याही कारणास्तव प्रवेश अनुज्ञेय नाही.
  5. ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  6. परीक्षा कक्षात मोबाईल, दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही.
  7.  परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.
  8. परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.
  9. पडताळणी/तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी/तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून उमेदवारी रद्द करण्यासह आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार उचित कारवाई करण्यात येईल.
  10.  परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पाकिंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
  11. प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
  12. उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.

  13. परीक्षा कालावधी संपल्यानंतर सोडविलेल्या प्रश्नांची (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या नमूद करण्याकरिता कोणताही अतिरिक्त वेळ देण्यात येणार नाही. 
  14. परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाची कारवाई केली जाईल. तसेच, प्रचलित नियम/कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल. 
  15. नवी मुंबई परीक्षा केंद्रावरील काही उमेदवारांची बैठक व्यवस्था प्रशासकीय कारणास्तव मुंबई शहरातील परीक्षा उपकेंद्रांवर करण्यात आली आहे. तथापि, सदर परीक्षा उपकेंद्रे नवी मुंबई परीक्षा केंद्राच्या अंतर्गतच असणार आहेत. परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा!

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 महत्त्वाच्या सूचना अधिकृत PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ठळक सूचना कधी जाहीर झाल्या?

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ठळक सूचना 07 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाल्या.

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ठळक सूचना बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ठळक सूचना बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.