Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Rajya Seva Mains Exam -...

MPSC Rajya Seva Mains Exam Dates Out 2021 | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा तारखा जाहीर 2021

MPSC Rajya Seva Mains Exam Dates Out 2021 | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा तारखा जाहीर 2021: MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या तारखा दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.

MPSC Rajya Seva Mains Exam Dates Out 2021 | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा – तारखा जाहीर

MPSC Rajya Seva Mains Exam Dates Out 2021: MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या तारखा आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सेवेची पूर्व परीक्षा दिनांक 21 मार्च 2021 रोजी घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा निकाल दिनांक 06 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला. राज्य सेवेची पूर्व परीक्षा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल जाहीर

MPSC Rajya Seva Mains Exam Dates 2021 | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा तारखा

MPSC Rajya Seva Mains Exam Dates 2021: MPSC तर्फे घेण्यात येणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020-21 दिनांक 04, 05 आणि 06 डिसेंबर 2021 रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येणार आहे.

MPSC Rajya Seva Mains Exam Dates 2021 – Vacancies | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा तारखा – रिक्त पदे 

MPSC Rajya Seva Mains Exam Dates 2021- Vacancies: आयोगाच्या माहितीनुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 मार्फत 200 पदे भरली जातील. या 200 पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे;

1. सहायक राज्यकर आयुक्त – गट अ – एकूण 10 पदे

2. उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गटविकास अधिकारी – गट अ – एकूण 7 पदे

3. सहायक आयुक्त / प्रकल्प अधिकारी – श्रेणी 2 गट अ – एकूण 1 पद

4. उद्योग उप संचालक, तांत्रिक- गट अ – एकूण 1 पद

5. सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता – गट अ – एकूण 2 पदे

6. उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा – गट ब (प्रशासन शाखा) –  एकूण 25 पदे

7. कक्ष अधिकारी – गट ब – एकूण 25 पदे

8. सहाय्यक गट विकास अधिकारी –  गट ब –  एकूण 12  पदे

9. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गट ब – एकूण 19 पदे

10. उपअधीक्षक अधीक्षक, भुमी अभिलेख, गट-ब – एकूण 6 पदे

11. उप अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट ब – एकूण 3 पदे

12. सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब – एकूण 1 पद

13. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब – एकूण 4 पदे

14. सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व तत्सम, गट ब – एकूण 11 पदे

15. नायब तहसीलदार, गट-ब – एकूण 73 पदे

MPSC Rajya Seva Mains Exam Dates Notification | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा जाहिरात

MPSC Rajya Seva Mains Exam Dates Notification: MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सुधारित जाहिरात दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सुधारित जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

राज्य सेवा मुख्य परीक्षा-2021 जाहिरात

MPSC Rajya Seva Mains Exam Dates -Application Form | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा – अर्ज 

MPSC Rajya Seva Mains Exam Dates -Application Form: MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 14 सप्टेंबर 2021 दुपारी 02 वाजल्यापासून ते दिनांक 28 सप्टेंबर 2021 रात्री 23:59 मिनिटांपर्यंत https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर आपला अर्ज भरावयाचा आहे. अर्जाचे शुल्क – अमागास वर्ग – रुपये 544/- आणि मागास वर्ग – रुपये 344/- इतके आहे. मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आणि निहित पद्धतीत अर्ज भरावे. MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा अर्ज Link

MPSC Rajya Seva Mains Exam Pattern | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा – परीक्षेचे स्वरूप

MPSC Rajya Seva Mains Exam Pattern: MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चे स्वरूप पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

MPSC राज्य सेवा परीक्षेचे स्वरूप

MPSC Rajya Seva Mains Exam Syllabus | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

MPSC Rajya Seva Mains Exam Syllabus – Download: MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तो अभ्यासक्रम डाऊनलोड करा.

MPSC राज्यसेवा परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम

MPSC Rajya Seva Mains Exam Cut Off | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा – Cut Off

MPSC Rajya Seva Mains Exam Cut Off: MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेचे 2015 ते 2019 पर्यंतचे विश्लेषण आणि कट ऑफ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

MPSC राज्य सेवा परीक्षा कट ऑफ

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेला पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा. Adda 247 मराठी लवकरच आपल्यासाठी आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज घेऊन येईल. तसेच Adda 247 मराठी मुख्य परीक्षेच्या तयारीत कायमच आपल्यासोबत राहील.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Exam Prime Test Pack
Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!

FAQs

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत का? 

होय. आयोगाकडून राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 केव्हा घेण्यात येईल? 

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 दिनांक 04, 05 आणि 06 डिसेंबर 2021 ला घेण्यात येईल.

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 किती पदांसाठी घेण्यात येणार आहे? 

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 द्वारे एकूण 200 पदे भरण्यात येतील

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 कोणत्या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येणार आहे?

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येणार आहे.