Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC Rajyaseva Update 2022
Top Performing

MPSC Rajyaseva Update 2022, Now Main Exam is Descriptive in Nature, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची होणार

MPSC Rajyaseva Update 2022: Maharashtra PSC has decided to make the State Service Main Examination Descriptive and a press release in this regard has been published on the Commission’s website. On 08th July 2022 MPSC declares that Implementation of the new Exam Pattern of MPSC Rajyaseva Mains is from 2023.

Recently, It has been decided to qualify the General Studies Paper No. 2 (CSAT) in the Maharashtra Public Service Commission’s State Prelims Examination, for which a condition of at least 33% marks is prescribed. The merit list for the State Service Main Examination will be prepared on the basis of the marks in Paper No. 1 of the candidates who get at least 33% marks in this paper. Get Complete information about MPSC Rajyaseva Update 2022 in this article.

MPSC Rajyaseva Update 2022
Category Latest Alert
Exam Conducted By MPSC
Exam Name MPSC Rajyaseva Exam
Blog Name MPSC Rajyaseva Update 2022

MPSC Rajyaseva Update 2022

MPSC Rajyaseva Update 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी गट अ ची पदभरती MPSC Rajyaseva परीक्षेमार्फत होत असते. राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय याआधी घेण्यात आला होता पण काही संघटनांनी मागणी केली हा वर्णनात्मक पेपर 2024 किंवा 2025 पासून घेण्यात यावा पण याला MPSC ने नकार दिला आहे व राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची 2023 पासून होणार असे सांगितले. यासंबंधी एक प्रसिद्धीपत्रक MPSC ने 08 जून 2022 रोजी जाहीर केले. MPSC ने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय दिनांक 24 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. अलीकडेच MPSC Rajyaseva Prelims मध्ये 2 पेपर असतात एक सामान्य अध्ययन व दुसरा CSAT आता या पेपर पद्धतीत थोडा बदल करण्यात आला आहे. आज या लेखात आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या या MPSC Rajyaseva Update 2022 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

MPSC Rajyaseva Update 2022: Main Exam is Descriptive in Nature  | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची होणार

MPSC Rajyaseva Update 2022: Main Exam is Descriptive in Nature: उपजिल्हाधिकारी गट अ, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (नि शस्त्र ) गट अ, सहायक राज्यकार आयुक्त गट अ, गट विकास अधिकारी गट अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, उद्योग उप संचालक (तांत्रिक गट अ), सहायक कामगार आयुक्त गट अ, उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (प्रशासन शाखा), कक्षा अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब, सहायक गट विकास अधिकारी गट ब, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब, उप अधीक्षक भूमी अभिलेख गट ब, उप अधीक्षक राज्य उद्पादन शुल्क गट ब, कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी गट ब, सरकारी कामगार अधिकारी गट ब, उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ, मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-अ आणि मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-ब या पदांसाठी राज्यसेवा परीक्षा होत असते. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) सन 2023 पासून होणार आहे असे MPSC ने दिनांक 08 जुलै 2022 रोजी जाहीर केले.

MPSC Rajyaseva Update

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबत आयोगाकडून खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. 2023 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची होणार आहे. त्यामध्ये एकूण 09 पेपर असतील. राज्यसेवा मुख्य परीक्षेचे विषय व त्यांचे गुण खालील तक्त्यात दिले आहे. सोबतच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण MPSC ने जाहीर केलेली नोटीस पाहू शकता.

पेपर  गुण
अहार्ताकारी पेपर
भाषा पेपर 1 – मराठी 300 (25% गुणांसह अहार्ताकारी)
भाषा पेपर 2 – इंग्रजी 300 (25% गुणांसह अहार्ताकारी)
गुणवत्ता यादीकरिता विचारात घ्यायचे पेपर
निबंध (मराठी किवा इंग्रजी मध्यम 250
सामान्य अध्ययन पेपर 1 250
सामान्य अध्ययन पेपर 2 250
सामान्य अध्ययन पेपर 3 250
सामान्य अध्ययन पेपर 4 250
वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 250
वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2 250
एकूण गुण 1750
मुलाखत 275
एकूण गुण 2025

Click here to view MPSC Notice of Main Exam is Descriptive in Nature

NOTE

वैकल्पिक विषय खाली देण्यात आले आहेत.

MPSC Rajyaseva Update 2022
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा वैकल्पिक विषय

MPSC Rajyaseva Update 2022: CSAT is Qualifing in Nature

आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी किमान 33% गुणांची अट अर्हता प्राप्त करण्यासाठी विहित करण्यात येत आहे. या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितले आहे. ही नोटीस डाउनलोड करण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC Rajyaseva Update 2022
MPSC Rajyaseva Update

Click here to Download MPSC Rajyaseva Update 2022

MPSC Rajyaseva Exam 2022 Selection Procedure | निवड प्रक्रिया

MPSC Rajyaseva Exam Selection Procedure: प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्प्यामध्ये घेण्यात येईल :

  1. पूर्व परीक्षा गुण 400 (ज्यात पेपर 1 च्या गुणांवरून मुख्य परीक्षेस बोलावण्यात येईल.)
  2. मुख्य परीक्षा गुण 1750
  3. मुलाखत गुण 275
  • राज्य सेवा पूर्व परीक्षा 2023 च्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या आणि पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये अर्हता व अन्य अटींची विहित दिनांकास किंवा त्यापूर्वी पुर्तता करणा-या उमदेवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.
  • मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळाव्दारे फक्त ऑनलाईन पध्दतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करणे आवश्यक राहील.
  • पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगास अर्जाद्वारे सादर केलेल्या माहितीच्या आधारेच मुख्य परीक्षेकरीता आवश्यक अर्ज/माहिती विहित पध्दतीने सादर करता येईल.

Also Read:

FAQs: MPSC Rajyaseva Update 2022, Now Main Exam is Descriptive in Nature

Q1. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची होणार आहे का?

Ans. होय, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची होणार आहे.

Q2. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेस किती गुण असतील?

Ans. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेस एकूण 1750 गुण असतील.

Q3. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेतील मुलाखत किती गुणांची असेल?

Ans. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेतील मुलाखत 275 गुणांची असेल.

Q4. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय जाहीर झाले आहे का?

Ans. होय, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय जाहीर झाले आहे ते तुम्ही वर लेखात पाहू शकता.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Daily Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MPSC www.mpsc.gov.in

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

MPSC Rajyaseva Update 2022, Now Main Exam is Descriptive in Nature, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची होणार_7.1