Table of Contents
MPSC Rajyseva Main Exam 2019 Final Result Out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 13 ते 15 जुलै, 2019 या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2019 चा अंतिम निकाल निकाल दिनांक 29 सप्टेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर मुख्य परीक्षेत अंतिम निवडलेले उमेदवारांची यादी, Merit List व बैठक क्रमांकाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर म्हणजेच https://mpsc.gov.in/ वर आणि तसेच या लेखात देण्यात आले आहेत.
MPSC Rajyseva Main Exam Final Result Out | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल जाहीर
MPSC Rajyseva Main Exam 2019 Final Result Out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 13 ते 15 जुलै, 2019 या कालावधीत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2019 घेण्यात आली होती. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक ३१२३/२०२० प्रकरणी दिनांक 5 मे 2021 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक बीसीसी-२०२०/प्र.क.३२०/१६ ब दिनांक 5 जुलै, 2019 अन्वये भरतीप्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षीत असलेली पदे अराखीव (खुल्या) पदांमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. प्रस्तुत परीक्षेच्या एकूण 420 पदांचा सुधारित अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून दिनांक 28 सप्टेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकालाचे प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Rajyaseva Mains Exam Result 2019: Merit List | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल जाहीर: गुणवत्ता यादी
MPSC Rajyaseva Mains Exam Result 2019: Merit List: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 13 ते 15 जुलै, 2019 या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा – 2019 चा निकाल दिनांक 28 सप्टेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात आला असून अंतिम निवडलेले उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List) व बैठक क्रमांकाची यादी खालील PDF मध्ये पाहू शकता.
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकालाचे गुणवत्ता यादी (Merit List) पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रस्तुत अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईल मध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. (कृपया आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्रमांक ६.४.४ पहावी.)
MPSC Rajya Seva Mains Exam Result 2019: Final Selected Candidates List | अंतिम निवडलेल्या उमेदवारांची यादी
MPSC Rajya Seva Mains Exam Result 2019: Final Selected Candidates List: रिक्त जागांप्रमाणे शिफारस करण्यासाठी पात्र उमेदवारांची संपूर्ण यादी (Final Selected Candidates) खाली देण्यात आली आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 अंतिम निवडलेले उमेदवारांची लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Rajya Seva Mains Exam 2019 Exam Result: Toppers List
- श्री. चौगुले प्रसाद बसवेश्वर, बैठक क्रमांक PN008356 हे राज्यातून सर्वसाधारण वर्गवारीमधून पहिले आले आहेत.
- श्री. कुवर रोहन रघुनाथ, बैठक क्रमांक PN003234 मागास वर्गवारीमधून प्रथम आले आहेत. तसेच
- महिला वर्गवारीतून श्रीमती पाटील मानसी सुरेश बैठक क्रमांक PN001133 ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत.
MPSC Rajya Seva Mains Exam Cut Off 2019 | MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 गुणांची सीमारेषा
MPSC Rajya Seva Mains Exam Cut Off 2019: MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा – 2019 गुणांची सीमारेषा (Cut Off) खाली दिलेल्या Image मध्ये पाहू शकता.a
Also Read,
MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक 2021 | MPSC Exam Time Table 2021
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका 2021 डाउनलोड करा
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत उत्तरतालिका जाहीर
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल जाहीर
FAQs: MPSC Rajya Seva Mains Exam Result 2019
Q1. MPSC Rajyaseva Mains Exam 2019 चा निकाल लागला आहे का?
उत्तर होय, MPSC Rajyaseva Mains Exam 2019 निकाल 28 सप्टेंबर, 2021 रोजी लागला आहे.
Q2. MPSC Rajyaseva Mains Exam 2019 चा निकाल कसा तपासता येईल?
उत्तर उमेदवार वर दिलेल्या लिंकवरून MPSC Rajyaseva Mains Exam 2019 चा निकाल तपासू शकतात.
Q3. MPSC Rajyaseva Mains Exam 2019 चा निकाल किती वाजता जाहीर होईल?
उत्तर MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 चा निकाल 28 सप्टेंबर, 2021 रोजी संध्याकाळी जाहीर केला जाईल.
Q4. MPSC, Rajyaseva Mains Exam 2019 निकाल 2021 कधी जाहीर करेल?
उत्तर MPSC ने 28 सप्टेंबर, 2021 रोजी MPSC Rajyaseva Mains Exam 2019 जाहीर केला आहे.