Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC भरती प्रक्रियेला वेग

MPSC भरती प्रक्रियेला वेग, 21000 जागा भरण्यात येणार

MPSC भरती प्रक्रियेला वेग

MPSC भरती प्रक्रियेला वेग: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील भरती प्रक्रियेला वेग मिळणार आहे. त्यामुळे तब्बल 21,000 जागा भरण्यात येणार आहेत. त्यातील बहुसंख्य जागा ह्या गट ब व क संवर्गातील आहेत. या लेखात आपण MPSCद्वारे राज्यात चालू असलेल्या भरतीप्रक्रिये बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

MPSC भरती प्रक्रियेला वेग: विहंगावलोकन 

MPSC भरती प्रक्रियेला वेग: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोग 
परीक्षेचे नाव MPSC अंतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षा
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव MPSC भरती प्रक्रियेला वेग
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in

MPSC भरती प्रक्रियेबद्दल अधिकृत बातमी 

MPSC भरती प्रक्रियेबद्दल अधिकृत बातमी दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी दै. लोकमत मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. MPSC द्वारे गेल्या वर्षभरात राजपत्रित गट अ ,ब तसेच अराजपत्रित गट ब व गट क च्या तब्बल 21000 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती चालू आहे. त्यातील सर्वाधिक 8000 जागा ह्या गट क मधील लिपिक पदाच्या आहेत. या सर्व पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यावर असून येत्या 8 महिन्यात ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली आहे.

MPSC भरती प्रक्रियेला वेग, 21000 जागा भरण्यात येणार_3.1

गट अ व ब मधील पदांचा तपशील 

गट अ व ब मधील पदांचा तपशील खालील तक्त्यात दिलेला आहे.

पद नाम  पदसंख्या 
वैद्यकीय शिक्षण 2000
सामान्य प्रशासन 1900
वित्त 1600
गृह 1184
सार्वजनिक आरोग्य 1000

मागील काही वर्षात सरळसेवा पद्धतीने भरण्यात आलेल्या पदांचा तपशील 

मागील काही वर्षात सरळसेवा पद्धतीने भरण्यात आलेल्या पदांचा तपशील खालील तक्त्यात दिलेला आहे.

वर्ष  पदसंख्या 
2015-16 6707
2016-17 4333
2017-18 9207
2018-19 5792
2019-20 3366

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC मधून किती पदांसाठी भरती प्रक्रिया चालू आहे?

MPSC मधून 21,000 पदांसाठी भरती प्रक्रिया चालू आहे.

MPSC भरती प्रक्रिया कधी पर्यंत पूर्ण होईल?

MPSC भरती प्रक्रिया येत्या 8 महिन्यात पूर्ण होईल.