Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Economy | पंचवार्षिक योजना

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण पंचवार्षिक योजना बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Economy (अर्थशास्त्र)
टॉपिक पंचवार्षिक योजना

पंचवार्षिक योजना 

भारतातील पंचवार्षिक योजना बद्दल माहिती खाली थोडक्यात दिली आहेत.

योजना क्रमांक कार्यकाळ अध्यक्ष / उपाध्यक्ष माहिती
1 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956
  • अध्यक्ष जवाहरलाल नेहरू
  • उपाध्यक्ष – गुलजारीलाल नंदा
  • उद्दिष्टे – 
  • राष्ट्रीय उत्पन्नात 2.1 % वार्षिक वाढ (एनएनपी आधारित)
  • कृषी क्षेत्राचा विकास (31% खर्च कृषी व सिंचन क्षेत्रावर)
  • चलनवाढ आटोक्यात आणणे
  • 1955-56 अखेर अन्नधान्य उत्पादन 61.6 MT करणे
  • योजनेचे साध्य –
  • राष्ट्रीय उत्पन्न – 3.6 % (वार्षिक वृद्धीदर)
  • चलनवाढीचा दर कमी झाला
  • अन्नधान्य उत्पादन – 66.9 MT
  • संथ औद्योगिक वाढ
  • सार्वजनिक खर्चाचे वितरण – 1) कृषी व सिंचन, 2) वाहतूक व दळणवळण, 3) सामाजिक सेवा
2 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961
  • अध्यक्ष – जवाहरलाल नेहरु
  • उपाध्यक्ष – टी टी कृष्णाम्माचारी
  • उद्दिष्ट-
  • 4.5% वार्षिक वृद्धीदर
  • वाहतूक व दळणवळण सर्वाधिक खर्च
  • साध्य
  • 4.2% वार्षिक वृद्धीदर
  • मोठ्या प्रमाणात चलनवाढ
  • अन्नधान्य उत्पादन – 82 mt
  • मध्यम औद्योगिक वाढ
3 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966
  • अध्यक्ष – जवाहरलाल नेहरु आणि लालबहादूर शास्त्री
  • उपाध्यक्ष – सी एम त्रिवेदी आणि अशोक मेहता
  • उद्दिष्टे –
  • 5.6% वार्षिक वृद्धीदर
  • सार्वजनिक खर्च – 1) वाहतूक व दळणवळण 2) उद्योग 3) कृषी व सिंचन
  • साध्य –
  • 2.8% वार्षिक वृद्धीदर
  • चलनवाढ झाली
  • अन्नधान्य उत्पादन घटले
तीन वार्षिक योजना (स्वावलंबन योजना) 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969
  • अध्यक्ष –इंदिरा गांधी
  • उपाध्यक्ष – अशोक मेहता आणि डी आर गाडगीळ
  • उद्दिष्टे –
  • 5% वार्षिक वृद्धीदर
  • दुष्काळ व युद्धातून सावरणे
  • साध्य –
  • वार्षिक वृद्धीदर -3.9%
  • चलनवाढ वाढदर आधी वाढला आणि नंतर उतरला
  • अन्नधान्य उत्पादन -94 mt
4 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974
  • अध्यक्ष –इंदिरा गांधी
  • उपाध्यक्ष – धनंजय गाडगीळ, सी.सुब्रमण्यम, दुर्गप्रसाद धर
  • उद्दिष्टे –
  • 5.7% वार्षिक वृद्धीदर (NDP आधारित)
  • सर्वाधिक खर्च कृषी व सिंचन आणि त्यानंतर उद्योग आणि वाहतूक दळणवळण.
  • संपत्ती व आर्थिक विकेंद्रीकरण आणि प्रादेशिक विकासावर भर
  • शिक्षण व मनुष्यबळ विकासावर भर
  • साध्य –
  • वार्षिक वृद्धीदर – 3.3% (10 व्या पंचवार्षिक योजने नुसार 2.05%)
  • अन्नधान्य उत्पादन – 104.7 Mt
  • चलनवाढ तीव्र
5 1 एप्रिल 1973 ते 31 मार्च 1978
  • अध्यक्ष –इंदिरा गांधी
  • उपाध्यक्ष – दुर्गप्रसाद धर, पी एन हक्सर
  • उद्दिष्टे –
  • 4.4% वार्षिक वृद्धीदर(GDP आधारित)
  • गरिबी हटाओ
  • सार्वजनिक खर्च -1) उद्योग 2)कृषी व सिंचन 3)ऊर्जा
  • साध्य –
  • वार्षिक वृद्धीदर -4.8%
  • भरमसाठ चलनवाढ (25%)
  • अन्नधान्य उत्पादन – 126mt
सरकती योजना 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980
  • अध्यक्ष – मोरारजी देसाई आणि चरणसिंग
  • उपाध्यक्ष – डी. टी. लकडावाला
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना (1978)
  • कामासाठी अन्न योजना (1979)
6 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985
  • अध्यक्ष –इंदिरा गांधी आणि राजीव गांधी
  • उपाध्यक्ष – एन डी तिवारी , शंकरराव चव्हाण आणि पी व्ही नरसिंहराव
  • उद्दिष्टे – 
  • 5.2% वार्षिक वृद्धीदर
  • सार्वजनिक खर्च – 1) ऊर्जा 2) कृषी व सिंचन 3) उद्योग
  • दारिद्र्य निर्मूलन
  • साध्य – 
  • वार्षिक वृद्धीदर -5.7%
  • अन्नधान्य उत्पादन – 145 mt
  • चलनवाढ आटोक्यात आली
  • औद्योगिक वृद्धीदर कमी
7 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990
  • अध्यक्ष – राजीव गांधी आणि व्ही पी सिंग
  • उपाध्यक्ष – मनमोहन सिंग , पी शिवशंकर , माधवसिंग सोळंकी आणि रामकृष्ण हेगडे
  • उद्दिष्टे –  
  • वार्षिक वृद्धीदर – 5%
  • सार्वजनिक खर्च – 1) ऊर्जा 2)कृषी व सिंचन 3) सामाजिक सेवा
  • साध्य – 
  • वार्षिक वृद्धीदर- 6%
  • अन्नधान्य उत्पादन – 171 mt
  • चलनवाढ वाढत गेली
8 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997
  • अध्यक्ष – नरसिंहराव आणि एच डी देवेगौडा
  • उपाध्यक्ष – प्रणब मुखर्जी आणि मधू दंडवते
  • उद्दिष्टे –  
  • मानवी विकासाला सर्वाधिक प्राधान्य
  • वार्षिक वृद्धीदर -5.6%
  • सार्वजनिक खर्च – 1) ऊर्जा 2) सामाजिक सेवा 3) कृषी व सिंचन
  • साध्य – 
  • वार्षिक वृद्धीदर – 6.7%
  • संरचनात्मक समायोजन सुधारणा
9 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002
  • अध्यक्ष –आय.के.गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी
  • उपाध्यक्ष – मधू दंडवते, जसवंत सिंग आणि के.सी.पंत
  • उद्दिष्टे –  
  • वार्षिक वृद्धीदर – 6.5%
  • सार्वजनिक खर्च – 1) उद्योग 2) ऊर्जा 3) सामाजिक सेवा
  • साध्य – 
  • वार्षिक वृद्धीदर – 5.5%
  • चलनवाढ कमी झाली
  • अन्नधान्य उत्पादन – 212 mt
10 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007
  • अध्यक्ष – अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग
  • उपाध्यक्ष – के सी पंत आणि मॉंटेकसिंग अहलुवालिया
  • उद्दिष्टे –  
  • वार्षिक वृद्धीदर – 7.9%
  • कृषी क्षेत्र- अर्थव्यवस्थेचे प्रेरक बळ आणि गाभा क्षेत्र
  • MDGs चा प्रभाव होता
  • सामाजिक, आर्थिक व लैंगिक सबलीकरण
  • राज्यांना विकासाचे मोजता येणारे लक्ष्य
  • 50 दशलक्ष रोजगारनिर्मिती
  • औद्योगिक उत्पादन 10% वृद्धीदर
  • सार्वजनिक खर्च – 1)सामाजिक सेवा 2) ऊर्जा 3)वाहतूक दळणवळण
  • साध्य – 
  • वार्षिक वृद्धीदर – 7.7%
  • औद्योगिक वृद्धीदर -8.2%
11 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012
  • अध्यक्ष –मनमोहन सिंग
  • उपाध्यक्ष – मॉंटेकसिंग अहलुवालिया
  • उद्दिष्टे –  
  • वार्षिक वृद्धीदर-9%
  • दरडोई जीडीपी वृद्धीदर – 7.6%
  • दारिद्र्य 10% ने कमी करणे
  • सुशिक्षित बेरोजगारी 5% च्या खाली आणणे
  • विद्यार्थ्यांची गळतीप्रमाण 20% वर आणणे
  • साक्षरता -85% करणे
  • साध्य – 
  • 92% खेड्यांना वीज
  • 70% बीपीएल लोकांना वीज
  • 69% भारतनिर्माण योजना पूर्ण
  • शिशू मृत्युदर – 40
  • मातामृत्यू दर – 167
12 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017
  • अध्यक्ष –मनमोहन सिंग (2017 पर्यंतच)
  • उपाध्यक्ष – मॉंटेकसिंग अहलुवालिया (2017 पर्यंतच)
  • उद्दिष्टे –   
  • जीडीपी वृद्धीदर 8.2%
  • कृषी वृद्धीदर – 4%
  • उत्पादन वृद्धीदर – 10%
  • दारिद्र्य 10% ने कमी करणे
  • 50 दशलक्ष रोजगार निर्मिती
  • सरासरी शैक्षणिक वर्षात 7 वर्षे वाढ
  • शैक्षणिक असमानता दूर करणे
  • साध्य – 
  • वृद्धीदर – 6.9%
  • शिशु मृत्युदर – 34 (2016)
  • माता मृत्यूदर – 130 (2016)
  • जननदर – 2.3 (2016)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली?

नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली.

राष्ट्रीय विकास आयोगाची स्थापना कधी झाली?

राष्ट्रीय विकास आयोगाची स्थापना 6 ऑगस्ट 1952 रोजी झाली.

नियोजन आयोगाचे सध्याचे मॉडेल काय आहे?

नियोजन आयोगाचे सध्याचे मॉडेल NITI आयोग आहे.